मुख्य सामग्रीवर वगळा

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

 अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं.

अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP, म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसना विमान उडवत असताना UAV आढळून आले त्याची त्यांनी नोंद ठेवली. अश्या उडत्या गोष्टींसदर्भात कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देता येऊ शकत नाही, अश्या या गोष्टी होत्या. कुठे त्रिकोणी आकाराची वस्तु दिसली तर कुठे गोल वस्तु उडताना दिसली अश्या प्रकारच्या या सगळ्या केसेस आहेत.

विमान उडवताना विमानाला धोका उत्पन्न होऊ शकतो अथवा विमान उडवताना एखादी वस्तु मध्ये आली आणि त्यामुळे विमानाच्या मार्गात अडथळा आल्यास त्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते आणि म्हणून वारंवार जर अश्या गोष्टी घडत असतील तर ते संबंधित एजेंसीला कळवण आवश्यक आहे ही त्यामागची भावना आहे. याचं रीतसर व्हिडिओ फुटेज पेंटयागॉनला आधी सादर करण्यात आलं होतं. आणि त्याच संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती. अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांच्यानुसार अश्या UFO किंवा काही वस्तु आढळलयास पायलट्सनी त्वरित त्या घटना संरक्षण खात्याला किंवा संबंधित अॅथोरिटीला कळवाव्यात जेणेकरून त्या संदर्भात संरक्षण विभागाकडे त्याची नोंद ठेवली जाईल. या संदर्भात हे दिशा निर्देश जारी करण्यात आले आहेत.

संबंधित बैठक ही १७ मे २०२२ ला पार पडली. आंद्रे कार्सन या इंडियानाच्या हाऊस रिपरेजेनटिटीव्हनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. बैठकीआधी कार्सन यांनी ट्विट करत सांगितलं होतं की अमेरिकन कॉँग्रेसमद्धे UFO संदर्भात अशी बैठक मागच्या ५० वर्षात झाली नव्हती हे समीकरण आता बदलेल... या UAP मुळे काही धोका उत्पन्न होऊ शकतो का तसंच या आकाशात उडणाऱ्या वस्तूंमुळे अमेरिकेच्या सुरक्षेला काही धोका उत्पन्न होऊ शकतो का, त्यामुळे काही नुकसान होऊ शकतं का हा महत्वाचा मुद्दा यावेळी चर्चिला गेला.

अमेरिकेमध्ये नेवाडा प्रांतामद्धे एरिया ५१ नावाचा भाग आहे म्हणजे असं नाव त्याला दिल गेलं आहे, तिथे एलियन्स, त्यानंतर समस्त UFO प्रकरणावर संशोधन चालतं... लोकानी या एरियामध्ये जायला प्रशासनाने बंदी घातली आहे. अमेरिकेमध्ये अश्या अनेक कम्युयनीटीजच आहेत ज्याना वाटतं आहे की या एरिया ५१ मध्ये नक्की काहीतरी रहस्यमय संशोधन चालतं आणि त्याची माहिती अमेरिकन सरकारला सामान्य व्यक्तिपासून दडवायची आहे किंवा सांगायची नाही... अमेरिकेत अनेक कॉन्सपिरसी थेयरीज मानणाऱ्या या अनेक गटाना वाटतं आहे की या विश्वात आपण एकटे नाहीत, या विश्वात एलियन्स आहेतच अशी तर या गटांची ठाम समजूत आहे.

अमेरिकेच्या इतिहासात मागच्या ५० वर्षात हे पाहिल्यादाच घडत आहे की अमेरिकन प्रशासन पुढाकार घेऊन UFO संदर्भात बैठक घेत आहे, चौकशी करत आहे... मग प्रश्न उभा राहतो की अमेरिकन प्रशासनाला खरंच याबद्दल काही ठोस स्वरूपात पुरावे मिळाले आहेत का? आणि मग असं असेल तर अमेरिकन प्रशासन यावर काय भूमिका घेईल...? अनेक प्रश्न आहेत पण येणाऱ्या काळात याबद्दल खुलासे होतीलच... तो पर्यन्त आपण एलियन्स बद्दलच्या सुरस आणि चुरस कथा ऐकुयात!   

 

निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन!

  दहशतवाद हा जगाला आज नवीन राहिलेला नाही. ९/११ च्या हल्ल्यानंतर सगळे जग जागं झालं. भारतासारख्या देशाने दहशतवाद फार पूर्वीच काश्मीर च्या निमित्ताने पाहिलेला आहे. जगात आज अनेक विषय ज्वलंत आहेत, मग ते राजकीय असो अथवा आर्थिक किंवा सामाजिक . दहशतवाद हा विषय जवळपास या तीनही विषयांशी निगडीत आहे आणि त्याचा सामना नाईलाजाने सैनिकी कारवाईनेच करावा लागतो. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. काही निरपराध लोकसुद्धा प्रसंगी मारले जातात. पण सैनिकी कारवाई हा शेवटचा पर्याय असतो.   आता पर्यंत जगात अनेक सैनिकी कारवाया गाजल्या. त्यातल्या काही प्रसिद्ध पण झाल्या. यात दुस-या  महायुद्धातल्या कारवायांचा सुद्धा समावेश आहे. काही कारवाया शीतयुद्धात गाजल्या. काही मोजक्या कारवायांबद्दल सांगायचं झाल्यास ह्या सैनिकी कारवाया काही मिनिटांच्या होत्या, त्यातलीच एक म्हणजे डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन! इटलीच्या एलिट  म्हणजेच सर्वोत्तम कमांडोंच्या मदतीने केलेली अमेरिकेच्या नाटोस्थित एका सर्वोच्च सैनिकी अधिका-याला वाचवायची कारवाई. या एका विशेष युनिटने भाग घेतला. या युनिटचे नाव - इटालीअन अँटी टेरोरीस्त नुक्लिव ओपेरातीव से