मुख्य सामग्रीवर वगळा

चीन उभारतोय कंबोडिया मध्ये नौसेनेचा तळ!

 हळूहळू चीन सगळ्या जगाची डोकेदुखी बनत चालला आहे. कोरोना ही तर सध्याच्या आधुनिक जगाला चीनची देणगी...! पण चीन हे मान्य करत नाही. चीन इतर देशांना कर्ज देतो, हे जरी खरं असलं तरीसुद्धा त्याची वसुलीसुद्धा व्यवस्थित करून घेतो. पण काही वेळा तर ज्या देशाना मदत करायची त्या देशाना वाऱ्यावर सोडून देतो. याचं चांगलं आणि ताजं उदाहरण म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंकेची आर्थिक अवस्था! या दोन्हीही देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली  आहे आणि दोन्ही देशांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्याबद्दल रोज बातम्या येत आहेत. दोन्हीही देशांमध्ये सरकारला देशातील जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. लोक  सरकारविरुद्ध निदर्शन करत आहेत आणि मोर्चे काढत आहेत. हे झालं आर्थिक घटकांच्या बाबतीत. चीन जगात स्वतःचा दबदबा वाढावा आणि अमेरिकेची जागा आपण घ्यावी याबद्दल स्वप्न पाहतो आहे. ज्यात काही गैर नाही. अमेरिकेप्रमाणे जगामध्ये आपले परकीय जमिनीवर तळ उभे करावे अशी चीनची सुप्त इछा आहे. दक्षिण चीनी समुद्रात आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये अमेरिकेला शह देण्यासाठी म्हणून चीन पावलं उचलतो आहे. त्यासाठी चीनने कंबोडियाला हाताशी धरलं आहे आणि चीन तीथे आपल्या नौसेनेचा तळ उभं करतो आहे.     

एकविसावं शतक हे आशियाचं असेल असा दावा नेहमी केला जातो. म्हणजे आशिया खंडातले देश जगाचं नेतृत्व करतील हे सांगण्याचा त्यामागचा उद्देश... अर्थात आशियातले देश म्हणजे चीन आणि भारत हे तर प्रादेशिक सत्ता म्हणून उदयाला येत आहेत. विसाव्या शतकापर्यंत रणभूमीवर समोरा समोर येऊन युद्ध खेळली जात. पण आता आर्थिक ताकद ज्या देशाकडे ती बनेल महासत्ता, इथे हे संगण्याचा हा उद्देश! चीनरूपी महाकाय ड्रॅगन आपल्या अर्थव्यवस्थेच्या जोरावर स्वतःची सैनिकी शक्ति वाढवतो आहे. म्हणजे अगदी काल पर्यन्त ज्या देशाची सैनिकी क्षमता मोठी आणि आर्थिक स्थिति दुय्यम तो देश महासत्ता म्हणण्यास पात्र होता... आज परिस्थिति  बदलली आहे आणि ज्या देशाची आर्थिक स्थिति उत्तम आणि सैनिकी क्षमता जरी अफाट नसली तरीसुद्धा तो देश महासत्ता बनू शकतो. म्हणून एक गोष्ट नमूद करायची म्हणजे वर दिलेल्या पहिल्या कॅटॅगरीतला देश म्हणजे अमेरिका तर दुसऱ्या कॅटॅगरीतला देश हा जगातला ताकदवान देश, म्हणजे चीनचं नाव आपण या प्रसंगी घेऊ शकतो.

प्लॅनेट लॅब पिबीएस यांच्या आणि अमेरिकी सरकारने सॅटेलाइटने घेतलेल्या फोटोमद्धे हे स्पष्ट दिसत आहे की चीन थायलंडच्या आखातात, कंबोडियाच्या दक्षिण प्रांत असलेल्या ठिकाणी म्हणजे ‘रिम’ (Ream) मध्ये एक नौसेनेचा एक गुप्त तळ उभारतो आहे. पण याबद्दल कंबोडिया सरकारला आणि अधिकाऱ्याना विचारण्यात आलं त्यावेळेस या संबंधित लष्करी अधिकाऱ्यानी असं काहीही नसल्याचा दावा केला आहे. तसंच हे सुद्धा सांगितलं की हा कुठलाही तळ नसून इथे फक्त बंदराच्या विस्ताराचं काम चालू आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार कंबोडियाचा रिम तळ हा केवळ आणि केवळ चीनच्या नौसेनेकरीताचा तळ आहे, असं सांगितलं आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार रिमचा नौसेना तळ हा तीस वर्षाकरीता कंबोडियाने चीनला वापरायला दिला आहे. अश्या प्रकारचा एक गुप्त करार कंबोडिया आणि चीन यांच्यामध्ये झाला आहे.

अमेरिकेचं पॅसिफिक आरमार अति पूर्वेकडच्या देशांबरोबर एका दशकापुरवीपर्यंत नियमितपणे नौदल सराव करायचा. अमेरिकेने तर रिम तळावर कंबोडिया आणि अमेरिकेचा जॉइंट बेस बनवला होता. या गोष्टीला एक दशक झालं. अमेरिकेने वेळोवेळी कंबोडियन सरकारला या तळाच्या  देखभालीसाठी आम्ही उत्सुक आहोत असं सांगितलं... या संदर्भात कुठल्याही प्रस्तावाला कंबोडियन सरकारने उत्तर दिले नाही. उलट अमेरिकेने अर्थ सहाय्य दिलेल्या रिमवरच्या बिल्डिंग्स जमीनदोस्त केल्या.

जर या तळावरचं काम पूर्ण झालं तर दक्षिण चीनी समुद्रात आणि प्रशांत महासागरात चीनला लक्ष्य ठेवण्यासाठी सोपं जाईल. रिमचा तळ हा चीनचा परकीय देशातला दूसरा नौसेनेचा तळ बनू शकतो. चीनचा एकमेव परकीय जमीनिवरचा नौसेनेचा तळ हा आफ्रिकेत ‘जिबोटी’ इथे आहे. अमेरिकेसकट ऑस्ट्रेलियानेसुद्धा याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचा असा आरोप आहे की चीन आणि कंबोडिया त्यांच्यापासून गोष्टी लपवत आहेत. यासगळ्या प्रसंगामुळे अमेरिका आणि कंबोडिया यांच्यामधले संबंध बिघडले आहेत. अमेरिकेने तर असे आरोप केले आहेत की चीन ची पीपल्स लिबरेशन आर्मी प्रत्यक्षपणे रिम तळावर बांधकामाचं काम करते आहे. याचा अर्थ हा की चीन तिथे स्वतःचा सैनिकी तळ उभा करतो आहे.

भविष्यात अमेरिकेप्रमाणे चीन जर स्वतःचे तळ उभारणार असेल तर ही एक चिंता वाढवणारी बातमी आहे. यावर Quad सदस्य देश काय भूमिका घेतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. भारतासारखा देश चीनच्या या रिम तळाबद्दल काय भूमिका घेतो आणि काय प्रतिक्रिया देतो घेतो हे बघावं लागेल.

 

निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...