मुख्य सामग्रीवर वगळा

व्हेटो पॉवर – आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता गाजवण्यासाठी वापरलं जाणारं साधन!

 जागतिक राजकारणात सतत काही ना काही उलथापालथी चालू असतात. कधी कुठे कोणी युद्ध करतात, तर कधी सीमावादावरुन दोन देश आमने सामने येतात, तर दोन शेजारी एकमेकांशी भांडायला लागतात. यातून कधी कधी तर परिसीमा गाठली जाते आणि त्याचं रूपांतर युद्धजन्य परिस्थितीत होतं... बरं कूटनीतीद्वारे किंवा चर्चेद्वारे प्रश्न सुटले तर ठीक अन्यथा युद्ध हाच पर्याय उरतो. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महत्वाचा  आणि धगधगता विषय गाजतोय तो म्हणजे रशिया- युक्रेन यांच्यामधलं युद्ध. बरं समजा युद्ध झालं तरी चर्चेद्वारे समोरा समोर बसून वाटाघाटी करण उचित ठरतं. अन्यथा जर आपला विरोधी देश आपल्यावर हावी झाला आणि प्रश्न चर्चेद्वारे सुटू शकत होता, तरीसुद्धा आपण विरोधकाची परीक्षा पहिली आणि जर त्याच कारणासाठी आपण युद्ध थांबवून चर्चा करण्याची तयारी दर्शवली तर विरोधी राष्ट्राकडुन आपली जर जीवितहानी, वित्तहानी झाली असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि मग हे शहाणपण आधीच का सुचलं नाही असा सवालही उपस्थित होतो आणि तो रास्त आहे. वर जे म्हटलेलं आहे त्याबद्दल तंतोतंत खरी परिस्थिती ही रशिया आणि युक्रेन बाबतीत आहे. तर आंतरराष्ट्रीय राजकारणात अश्या चर्चेसाठी संयुक्त राष्ट्र या संस्थेच्या रूपाने एक व्यासपीठ आहे. आणि या व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर ताकदवान देश स्वतच्या मागण्या पुढे ठेवण्यासाठी आणि न आवडलेल्या पर्यायला विरोध करण्यासाठी आणि आपलं म्हणण मांडण्यासाठी व्हेटो पॉवर चा उपयोग करतात.

दुसऱ्या महायुदधानंतर म्हणजे १९४५ ला संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. या संस्थेचा उद्देशच मुळी युद्ध टाळणे आणि चर्चेद्वारा प्रश्न सोडवण हा आहे. दुसऱ्या महयुद्धाची दाहकता, झालेली जीवित आणि वित्तहानी बघता तसंच अणुबॉम्बचा झालेला वापर बघता अशी युद्ध होऊ नये कारण चुकूनही अणुबॉम्बचा वापर झाला तर अखी मानवजात नष्ट होईल अशी भीती तेंव्हाही होती आणि आजही आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही शांततेद्वारे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. संयुक्त राष्ट्राचं चार्टर पाहिलं तर परमनंट आणि नॉनपरमनंट मेंबर्स म्हणजे सदस्य राष्ट्र, यांच्या मध्ये व्हेटो पॉवर हा महत्वाचा मुद्दा अश्या सदस्यांचा मधला फरक दर्शवतो. चार्टर मधलं आर्टिकल २७(३) असं अधोरेखित करतं की परिषदेच्या कामकाजात महत्वाचे निर्णय स्थायी सदस्य राष्ट्रांच्या मतदानाच्या अधिकारानुसार घेण्यात यावेत. स्थायी सदस्य राष्ट्र हे त्यांचे इंटरेस्ट जपण्यासाठी तसच एखादा महत्वाचा विषय असेल त्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी व्हेटो अधिकार वापरू शकत होते. १९४६ पासून २०२० पर्यन्त जवळ जवळ २९३ वेळा व्हेटो अधिकार वापरण्यात आला आहे. व्हेटोचा सगळ्यात ज्यास्त वापर आतापर्यंत रशियाने केला, जवळपास १४३ वेळा व्हेटो वापरला. त्याच्या खालोखाल क्रमांक लागतो तो अमेरिकेचा... अमेरिकेने व्हेटोचा वापर ८३ वेळा केला आहे.

सुरक्षा परिषदेची रचना पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की, १० देश हे अस्थायी सदस्य राष्ट्र असतात तर ५ देश स्थायी सदस्य राष्ट्र आहेत. हे ५ स्थायी सदस्य कोणते तर अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रांस! एखादा निर्णय घेत असताना जर १५ सदस्य राष्ट्रांपैकी ९ सदस्य राष्ट्रानी त्याला होकार दर्शविला तर हा निर्णय पारित झाला असं समजून तो इतर सदस्य राष्ट्राना बंधनकारक आहे. तसंच जर एखादा ठराव पारित करत असताना ठरावाचा विरोध करणारा अस्थायी सदस्य असेल तर तो मतदान न करता अनुपस्थित राहू शकतो, किंवा मतदान करणं टाळू शकतो. आता जर ५ स्थायी सदस्य राष्ट्रांपैकी एखाद स्थायी सदस्य राष्ट्र असेल आणि त्यांना ठराव पारित होऊ नये असं वाटत असेल तर असा सदस्य व्हेटो अधिकार वापरू शकतो, म्हणजेच विरोध करू शकतो. हा विशेषअधिकार सुरक्षा परिषदेत फक्त ५ स्थायी सदस्य राष्ट्राना आहे आणि या ५ सदस्य राष्ट्रांचा वर उल्लेख केला आहे.

भारत, व्हेटो (नकाराधिकार) आणि स्थायी सदस्यत्व-

भारत हा संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्य राष्ट्र आहे. म्हणजे १९४५ पासून ते आज पर्यन्त! भारत संयुक्त राष्ट्रांचं सगळ्या नियमावलीचं पालन करणारा देश आहे. पण अजूनही भारताला स्थायी सदस्यत्व आणि त्याबरोबरच व्हेटो अधिकार देण्यात अमेरिकेला रस नाही... म्हणजे एकवेळ स्थायी सदस्यत्व चालू शकतं पण व्हेटो मात्र नाही दिला जाऊ शकणार या मताचा अमेरिका आहे. भारताच्या बाजूने सध्याच्या घडीला भक्कमपणे उभा राहणारा आणि मदत करणारा हा फ्रांस आहे. भारताबरोबर असे अजून ३ राष्ट्र आहेत ज्याना स्थायी सदस्यत्व आणि व्हेटो अधिकार हवा आहे. ते देश म्हणजे जपान, जर्मनी आणि ब्राझील! या राष्ट्रांचा समूह हा G-4 या नावाने ओळखला जातो. या ४ राष्ट्राना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा हव्या आहेत.

व्हेटो वापरुन आपले हितसंबंध जपण्यासाठी चीनसारखा आणि रशियासारखे देश पुढे आहे. तर सुरक्षा परिषदेत दुसऱ्या बाजूला अमेरिका, फ्रांस आणि ब्रिटनसारखे देश आहेत. मागच्या काही वर्षांपासून अशी फुट पडलेली आहे.

भारतासारख्या देशाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं ही काळाची गरज आहे आणि नुसताच स्थायी सदस्यत्व नाही तर त्याबरोबर व्हेटो अधिकारसुद्धा मिळावा. तरच सुरक्षा परिषदेत खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी, सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील आणि एका सशक्त सुदृढ जगाकडे आपण वाटचाल करू, अन्यथा ठराविक राष्ट्रांच्या हातात व्हेटो पॉवर सारख्या गोष्टी म्हणजे नुसत्याच सत्ता गाजवण्याचं साधन किंवा फार फार तर त्या राष्ट्रांच्या हातातलं स्वार्थासाठी उपयोगाला येणारं साधन बनून राहील...!

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

  युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्ध...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...