मुख्य सामग्रीवर वगळा

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

 नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट  आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.  जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं  होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेकडे आपोआपच गेली. अत्यंत समृद्ध देश अशी अमेरिकेची आजवरची ख्याती आहे. अश्या या अमेरिकेच्या नासाने नुकतंच ऑस्ट्रेलियन स्पेस सेंटर वरुन “ब्लॅक ब्रांट” हे रॉकेट प्रक्षेपित केलं.

१९९५ नंतर प्रथमच नासाने ‘अर्नहेम स्पेस सेंटर’ मधून व्यावसायिक रॉकेट प्रक्षेपित केलं. ऑस्ट्रेलियाच्या ‘नुलहुंबय’ या जागेवरून हे रॉकेट प्रक्षेपित केलं. या भागात ऑस्ट्रेलियाचे मूल निवासी लोक म्हणजे ‘अबोरीजनल’  लोक राहतात. या भागात ‘गुमताज’ जमातीचे लोक राहतात. या रॉकेटबद्दल सांगायचं म्हणजे अमेरिकेतल्या विस्कॉनसिन विद्यापीठाने एक्सरे क्वांनटंम कॅलॉरीमीटर विकसित केले आहे. प्रतिकूल हवामानामुळे फक्त तासभर उशिराने रॉकेटचं प्रक्षेपण झालं, बाकी या प्रक्षेपणात कुठलीही समस्या आली नाही. ऑस्ट्रेलियात २५ वर्षानंतर प्रथमच अश्या प्रकारचं रॉकेट प्रक्षेपण झालं आहे. या प्रक्षेपणामुळे खगोलीय विज्ञानाचा अभ्यास केला जाणार आहे. अश्या प्रकारचं संशोधन फक्त दक्षिण गोलार्धातूनच करता येतं आणि म्हणूनच अश्या अभ्यासाठी हे प्रक्षेपण महत्वाचं असेल आणि यासाठीच ऑस्ट्रेलियाची निवड झाली. हे रॉकेट प्रक्षेपणानंतर फक्त १० सेकंदच डोळ्यांनी पाहता आले इतक्या वेगाने ते आकाशात झेपावले.

हे रॉकेट ४३० मिलियन प्रकाश वर्ष दुर असलेल्या ताऱ्यांचा आणि ग्रहांचा अभ्यास करणार आहे. तसंच आपल्या आकाशगंगेचासुद्धा अभ्यास करणार आहे. असे कुठले ग्रह अवकाशात आहेत जिथे मानवी वस्ती होऊ शकते हेसुद्धा या अभ्यासात कळणार आहे. आपली आकाशगंगा ‘अल्फा सेंटरी’ कशी आहे हे या अभ्यासात कळणार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास या रॉकेटवर एक मोठा एक्सरे कॅमेरा लावला आहे जो कक्षेत फिरताना चित्र टिपून घेणार आहे. तसंच हे रॉकेट ३०० किमी प्रती तास या वेगाने अवकाशात फिरणार आहे.

नासाकडून अर्नहेम स्पेस सेंटर मधून एकूण तीन अश्या प्रकारे रॉकेटचं प्रक्षेपण होणार आहे. त्या शृंखलेतलं हे पहिलं प्रक्षेपण होतं. दुसरं प्रक्षेपण हे ४ जुलैला होणार असून त्याचं नाव आहे सिस्टीन (SISTINE)! या सिस्टीन प्रक्षेपणात मुख्यत्वेकरून अल्ट्राव्हायोलेट किरणांचा अवकाशात फिरणाऱ्या ग्रहांच्या वातावरणावर काय परिणाम होतो आहे हे अभ्यासलं जाणार आहे. तिसरं आणि या शृंखलेतलं शेवटचं प्रक्षेपण हे १२ जुलैला होणार आहे. या मिशनच नाव आहे ड्यूस (DEUCE)... या अंतर्गत सिस्टीन मिशनमध्ये  जे ग्रह शोधले आहेत त्यांच्यावर एक्सट्रिम   अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या संदर्भात अभ्यास केला जाणार आहे.

नासाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. नील आर्मस्ट्रॉंग हे ते पहिले अंतराळवीर ज्यानी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. आणि इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. हे होतं नासाचं अपोलो मिशन... कारण कुठल्याही माणसाने अश्या प्रकारे म्हणजे मानवजातीने इतर ग्रहांवर आपण जाऊ शकू अशी कल्पनाही केली नसेल, इतकं मोठं यश नासाने संपादन केलं. नासा आता मंगळवार सुद्धा अंतराळविराना पाठवण्याच्या बेतात आहे. हेच काय तर, नासाने महत्वाकांक्षी असा अरटेमिस प्रोग्राम ठरवला आहे. ज्यात चंद्राच्या दक्षिण भागात पहिली महिला आणि पुरुष यांना पाठवण्याचा बेत आहे. हे मिशन असणार आहे २०२४ सालचं!

मानव प्राणी आकाशापासून आता अवकशापर्यंत पोहोचतो आहे. ही विज्ञानाची करामत आहे... पण याचं श्रेय हे माणूस नावाच्या बुद्धिमान प्राण्याला जातं. अंतराळात पोहोचण्यासाठी जे तंत्रज्ञान आवश्यक आहे ते विकसित करणं याला प्रचंड वेळ पूर्वी खर्ची व्हायचा पण सद्यस्थितीत ज्या गतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित होतं आहे त्याची कल्पना केली जाऊ शकत नाही. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ हे आता विज्ञानाचं प्रमुख अंग बनलं आहे. भविष्यात तंत्रज्ञान विकसित होण्याची गती आपल्या कल्पनेपलीकडे जाईल अशी परिस्थिति आहे. भारतासारख्या देशात आपली इस्रो अंतराळ संस्थासुद्धा नवनवीन क्षितिज गाठते आहे. इस्रोकडे सुद्धा नवीन मिशन्स तयार आहेत. मग ते चंद्रयान असो किंवा मंगलयान असो. आतापर्यन्त फक्त सरकारी स्तरावरच अवकाश कार्यक्रम हाती घेतला जायचा. पण सरकारी आणि खाजगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपल्याला कमी वेळात उंच झेप या अवकाश क्षेत्रात घेता येत आहे. या नवीन अंतराळ युगासाठी आपण तयार होऊया...!

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...