अमेरिका इराकमधून बाहेर पडली. अमेरिका मागची तेवीस वर्ष या ना त्या कारणाने इराकवर शासन करत होती. आता अमेरिकेच्या अनुपस्थितीत याचा थेट फायदा या एका देशाला होणार आहे. आणि तो देश म्हणजे इराण... इराण हा शीया पंथीय बहुल देश आहे, हे तर सर्वश्रुत आहेच. पण इराक मध्येसुद्धा मुख्यकरून जनता शीया पंथीय आहे. म्हणजे अंदाजे साठ टक्के जनता शीया आहे. सद्दाम हुसेनचा बाथ पक्ष इराकमध्ये सत्तेत होता. हा बाथ पक्ष सुन्नी बहुल होता. स्वतः सद्दाम हुसेन हा सुन्नी मुस्लिम होता. यात गुंतागुंत म्हणजे इराक मधली जनता शीया होती पण त्यांच्यावर शासन करणारे इराकमधले हे अल्पसंख्यांक असलेले सुन्नी पंथीय लोक होते. इस्राइल आणि अमेरिकेने २०२६ च्या फेब्रुवारी महिन्यात इराणवर हवाई हल्ले केले. अमेरिकेने इराणविरुद्ध सुरू केलेल्या ऑपरेशनला नाव दिलं Operation Epic Fury तर इस्राइलने कोडनेम दिलं Operation Roaring Lion. इराणने प्रत्युत्तर पण दिले पण ते तोकडे होते. सुरवातीला अमेरिका आणि इस्राइल इराणवर वरचढ होतील असं दिसत होतं आणि अगदी काही दिवसात किंवा महिन्यात इराण नमतं घेईल असं वाटत होतं. पण इराण ने अमेरिकेविरुद्ध...
इराकजवळ जैविक अस्त्र आहेत आणि इराक (सद्दाम हुसेन) त्यांचा वापर करेल असं अमेरिकेने जगाला पटवल्यानंतर अमेरिकेने आणि तीच्या मित्र राष्ट्रानी इराकवर हल्ला केला. साल होतं २००३! साधारण २००१ च्या सुमारास ९/११ चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला झाल्यानंतर अफगाणिस्तान मध्ये अमेरिका आणि मित्र राष्ट्रानी ओसामा बिन लादेनला आणि इतर अल कायदाच्या दहशतवादयाना पकडण्यासाठी Operation Enduring Freedom सुरू केलं. यात तालिबानचा पाडाव झाला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २००३ मध्ये अमेरिका इराकवर हल्ला करेल आणि सद्दाम हुसेनची इराकवरची सत्ता नेस्तनाबूत करेल असा पण केला. त्याला कारण देण्यात आलं की अमेरिकेत ९/११ चा हल्ला झाला त्याचा इराक आणि सद्दाम हुसेनशी संबंध आहे आणि म्हणून अमेरिकेने आणि मित्र राष्ट्रानी Operation Iraqi Freedom सुरू केलं. सद्दाम जैविक अस्त्र बनवतोय आणि तो आता ती वापरणार आहे असा जागतिक समुदायाचा समज करून घेण्यामागे अमेरिका आहे हे चित्र स्पष्ट दिसत होतं. शेवटी जैविक अस्त्र कुठेच सापडली नाहीत. सद्दाम हुसेन जवळपास ९ महीने (अंडरग्राऊंड फॅसिलिटीमध्ये)...