जर्मनीचे परराष्ट्र मंत्री वाडंफुल आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हारोव हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर एकत्र भेटले. खरं तर अश्या द्विपक्षीय बैठका अश्या मोठ्या समेटमद्धे किंवा आंतरराष्ट्रीय संघटनांच्या चर्चेच्या दरम्यान होत असतात. पण नुकतीच रशिया आणि जर्मनी यांच्यामध्ये जी चर्चा झाली तीला महत्व आहे. रशियाबरोबरची ही भेट जर्मनीच्या विनंतीवरून झाली. याला तितकंच महत्वाचं कारण आहे. रशिया युक्रेन यांच्यामधला संघर्ष २०२२ पासून सुरू झाला. या संघर्षाची झळ रशियाला बसली तशी ती युरोपलाही बसली. जर्मनीची अर्थव्यवस्था ही युरोपमधली त्यातल्यात्यात स्थिर अर्थव्यवस्था म्हणायला हवी. पण जसं २०२२ ला रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाला त्यामुळे याचा प्रत्यक्ष फटका जर्मन अर्थव्यवस्थेला बसला. जर्मनी रशियाकडून जवळपास ५०% टक्के खनिज तेल आणि वायु आयात करत होता. पण रशिया युक्रेन युद्धामुळे या तेल आणि वायु पुरवठ्यावर मर्यादा आल्या. याचा परिणाम म्हणजे जर्मनीने रशियाकडून तेल आयात जवळपास बंदच केली, म्हणजे ९९ % कमी केली. आणि मग जर्मनीने तेल आणि वायु आयातीसाठी पर्यायी मार्ग शोधले. सध्या जर्मनी नोर...
चालू जागतिक घडामोडींचा अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक परिचय...