अमेरिका इराकमधून बाहेर पडली. अमेरिका मागची तेवीस वर्ष या ना त्या कारणाने इराकवर शासन करत होती. आता अमेरिकेच्या अनुपस्थितीत याचा थेट फायदा या एका देशाला होणार आहे. आणि तो देश म्हणजे इराण... इराण हा शीया पंथीय बहुल देश आहे, हे तर सर्वश्रुत आहेच. पण इराक मध्येसुद्धा मुख्यकरून जनता शीया पंथीय आहे. म्हणजे अंदाजे साठ टक्के जनता शीया आहे. सद्दाम हुसेनचा बाथ पक्ष इराकमध्ये सत्तेत होता. हा बाथ पक्ष सुन्नी बहुल होता. स्वतः सद्दाम हुसेन हा सुन्नी मुस्लिम होता. यात गुंतागुंत म्हणजे इराक मधली जनता शीया होती पण त्यांच्यावर शासन करणारे इराकमधले हे अल्पसंख्यांक असलेले सुन्नी पंथीय लोक होते.
इस्राइल आणि अमेरिकेने २०२६ च्या
फेब्रुवारी महिन्यात इराणवर हवाई हल्ले केले. अमेरिकेने इराणविरुद्ध सुरू केलेल्या
ऑपरेशनला नाव दिलं Operation Epic Fury तर इस्राइलने कोडनेम दिलं Operation
Roaring Lion. इराणने
प्रत्युत्तर पण दिले पण ते तोकडे होते. सुरवातीला अमेरिका आणि इस्राइल इराणवर वरचढ
होतील असं दिसत होतं आणि अगदी काही दिवसात किंवा महिन्यात इराण नमतं घेईल असं वाटत
होतं. पण इराण ने अमेरिकेविरुद्ध जो काही
कडवा प्रतिकार केला आहे त्यावरून फासे उलटे पडून अमेरिकेवर युद्ध हरण्याची नामुष्की
येते की काय अशी परिस्थिति आता आहे. इराणने आखातातल्या अमेरिकेच्या मित्र
देशांच्या अखत्यारीत असलेल्या अमेरिकेच्या मिलिटरी बेसेसना टार्गेट केलं आहे.
त्यामुळे इराण आणि त्या बरोबर इराकरूपी कटकट
अमेरिकेला नकोशी झाली. अर्थात अमेरिकेने इराकमधून माघार घेणे हा निर्णय काही एका रात्रीत
झाला नाही. अमेरिका आणि इराक यांच्या मधल्या सरकारांनी २०२४ मध्ये संयुक्तपणे
घेतलेला निर्णय आहे. अमेरिका इराकमधून बाहेर पडल्यामुळे इराण तिथे प्रत्यक्ष
रित्या शक्ति प्रदर्शन करून सूत्र ताब्यात घेण्याची शक्यता आहे. याचं कारण इराक
मध्ये अमेरिकेचा प्रेझेंस होता. तो एकदा गेल्यानंतर इराण त्यांच्या प्रॉक्सि मिलिशियांची
फौज तयार करून मध्य पूर्वेत पश्चिमी देशाना आव्हान निर्माण करत आहे. इराण समर्थित मिलिशियाज
म्हणजे हिजबूल्ला, हमास, होऊथी या गटांना आता त्यांची सत्ता प्रस्थापित करण्याची आणि
विरोध मोडून काढण्यासाठीची वाट मोकळी झाली आहे. इराक हे इराणसाठीचं मोठं निर्यातीसाठीचं
मार्केट आहे. हा झाला आर्थिक भाग. इराणला आता त्यांच्या सीमारेषेवर प्रत्यक्ष कोणीही
विरोध करायला नसल्याने लक्ष् ठेवणं सुकर झालं आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा