इराकजवळ जैविक अस्त्र आहेत आणि इराक (सद्दाम
हुसेन) त्यांचा वापर करेल असं अमेरिकेने जगाला पटवल्यानंतर अमेरिकेने आणि तीच्या
मित्र राष्ट्रानी इराकवर हल्ला केला. साल होतं २००३! साधारण २००१ च्या सुमारास ९/११
चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला झाल्यानंतर अफगाणिस्तान मध्ये अमेरिका आणि मित्र
राष्ट्रानी ओसामा बिन लादेनला आणि इतर अल कायदाच्या दहशतवादयाना पकडण्यासाठी Operation Enduring
Freedom सुरू केलं. यात तालिबानचा पाडाव झाला.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज
बुश यांनी २००३ मध्ये अमेरिका इराकवर हल्ला करेल आणि सद्दाम हुसेनची इराकवरची
सत्ता नेस्तनाबूत करेल असा पण केला. त्याला कारण देण्यात आलं की अमेरिकेत ९/११ चा
हल्ला झाला त्याचा इराक आणि सद्दाम हुसेनशी संबंध आहे आणि म्हणून अमेरिकेने आणि
मित्र राष्ट्रानी Operation Iraqi Freedom सुरू केलं. सद्दाम जैविक अस्त्र बनवतोय
आणि तो आता ती वापरणार आहे असा जागतिक समुदायाचा समज करून घेण्यामागे अमेरिका आहे हे
चित्र स्पष्ट दिसत होतं. शेवटी जैविक अस्त्र कुठेच सापडली नाहीत. सद्दाम हुसेन
जवळपास ९ महीने (अंडरग्राऊंड फॅसिलिटीमध्ये) तिक्रीत इथे लपून बसला होता. पण शेवटी
तो सापडला. सद्दामला पकडण्यासाठी जे ऑपरेशन आखण्यात आलं त्याला नाव देण्यात आलं Operation
Red Dawn! शेवटी सद्दामला पकडलं आणि त्याच्यावर खटला चालवून त्याला २००६
मध्ये फाशी देण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा