मुख्य सामग्रीवर वगळा

रशिया- जर्मनी चर्चा!


 जर्मनीचे परराष्ट्र मंत्री वाडंफुल आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हारोव हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर एकत्र भेटले. खरं तर अश्या द्विपक्षीय बैठका अश्या मोठ्या समेटमद्धे किंवा आंतरराष्ट्रीय संघटनांच्या चर्चेच्या दरम्यान होत असतात. पण नुकतीच रशिया आणि जर्मनी यांच्यामध्ये जी चर्चा झाली तीला महत्व आहे.

रशियाबरोबरची ही भेट जर्मनीच्या विनंतीवरून झाली. याला तितकंच महत्वाचं कारण आहे. रशिया युक्रेन यांच्यामधला संघर्ष २०२२ पासून सुरू झाला. या संघर्षाची झळ रशियाला बसली तशी ती युरोपलाही बसली. जर्मनीची अर्थव्यवस्था ही युरोपमधली त्यातल्यात्यात स्थिर अर्थव्यवस्था म्हणायला हवी. पण जसं २०२२ ला रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाला त्यामुळे याचा प्रत्यक्ष फटका जर्मन अर्थव्यवस्थेला बसला. जर्मनी रशियाकडून जवळपास ५०% टक्के खनिज तेल आणि वायु आयात करत होता. पण रशिया युक्रेन युद्धामुळे या तेल आणि वायु पुरवठ्यावर मर्यादा आल्या. याचा परिणाम म्हणजे जर्मनीने रशियाकडून तेल आयात जवळपास बंदच केली, म्हणजे ९९ % कमी केली. आणि मग जर्मनीने तेल आणि वायु आयातीसाठी पर्यायी मार्ग शोधले.

सध्या जर्मनी नोर्वे, नेदरलंड मार्गे त्यांच्याकडून तेल आणि वायु आयात करत आहे. रशियावर अमेरिका आणि युरोपीय महासंघाने लादलेल्या निर्बंधामूळे जर्मनी तेल आणि वायु रशियाकडून आयात करू शकत नाही. पर्यायी देश म्हणून युनायटेड किंगडम, अमेरिका आणि भारताकडून जर्मनी तेल आयात करत आहे.

रशिया युक्रेन युद्धाची व्याप्ती वाढली तर त्याचा थेट फटका युरोपला आणि त्यातही जर्मनीला बसणार आहे. आणि म्हणून जर्मनीला त्यांच्या ऊर्जा क्षेत्रातल्या संकटावर तोडगा काढण्यासाठी युद्ध थांबणं आवश्यक आहे. जर्मनीला रशिया नेटो (NATO) यांच्यामधला थेट संघर्ष वाढल्यावर जर्मनीची अर्थव्यवस्था कोलमडू शकते याची जाणीव आहे आणि खात्रीसुद्धा आहे. यासाठीच रशिया आणि जर्मनी यांच्यामध्ये परराष्ट्र स्तरावर चर्चा होण्याला महत्व आहे. यातला अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशिया आणि जर्मनी यांच्यामधली ही प्रथमच आणि तिसुद्धा दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री यांची थेट भेट होण्याला महत्व आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...