मुख्य सामग्रीवर वगळा

अमेरिकन आयडॉल – टीव्ही वरचा एक यशस्वी प्रयोग!

 हॉलीवूडचं जागतिक मनोरंजन क्षेत्रात योगदान केवळ मोठ आहे. आपल्या इथेही म्हणजे भारतात बॉलीवूड आहेच की... पण इथे खेदाने नमूद करावं लागतं की बॉलीवूडमध्ये जे चित्रपट निघाले किंवा अजूनही निघत आहेत त्यातल्या चित्रपटाची कधी थीम तर कधी गाणी, तर कधी संगीत, तर कधी पटकथा इत्यादि अनेक गोष्टी या हॉलीवूड मधल्या चित्रपटांची नक्कल करून बनवली जातात. नक्कल करणं हा काही गंभीर गुन्हा नाही पण मग ओरिजिनल स्वरूप असलेलं का  आपल्याकडे तयार होत नाही? म्हणजे एखादी नवी कल्पना का आपल्याकडे सुचत नाही, का आपल्याला परदेशी चित्रपटांची किंवा टी व्ही वरच्या कार्यक्रमांची नक्कल करावी लागते. हा खरं तर चर्चेचा आणि वाद्विवादाचासुद्धा विषय आहे. त्यात न गेलेलच बरं...! असो. तर अमेरिकेत छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेला आणि सगळ्यात ज्यास्त पाहिला गेलेला कार्यक्रम म्हणजे अमेरिकन आयडॉल हा...! हा कार्यक्रम आजच्याच दिवशी जवळपास २० वर्षांपूर्वी म्हणजे ११ जुन २००२ ला प्रथम प्रसारित झाला. थोडक्यात हा कार्यक्रम म्हणजे ऑन टीव्ही गाण्याची स्पर्धा असा होता.   

हा कार्यक्रम अमेरिकेत खूप लोकप्रिय झाला. तो फॉक्स चॅनेलवर अमेरीकेत २००२ ते २०१६ या कालावधी दरम्यान प्रसारित झाला. अश्या पद्धतीच्या  कार्यक्रमाचा लोक् प्रथमच आस्वाद घेत होते. हा कार्यक्रम सुरू होण्याची एक रंजक सफर आहे. अमेरिकन आयडॉल हा कार्यक्रम ब्रिटनच्या पॉप आयडॉल कार्यक्रमावर बेतलेला आहे. हा आश्चर्याचा धक्का काहीना हे वाचल्यावर बसेल... पण खरी गंमत तर पुढे आहे. ब्रिटिश पॉप आयडॉल हा कार्यक्रम तर न्यूझीलंडच्या पॉपस्टार्स या कार्यक्रमावरून घेण्यात आला आहे. सायमन फ्यूलर या ब्रिटिश निर्मात्याने पॉप स्टार्स आणि अमेरिकन आयडॉल हे कार्यक्रम टी व्ही आणले. हे सगळं श्रेय त्याला जातं. टीव्ही निर्माता नायगेल लीथगो याने ऑस्ट्रेलियामध्ये या गाण्यांच्या स्पर्धेचा कार्यक्रम पाहिला आणि त्याने ब्रिटनमध्ये असाच कार्यक्रम आणायचं ठरवलं. फ्यूलर तर कार्यक्रम पाहून प्रभावित झाला. त्याला ३ किंवा ४ जजेस असणं, त्यांनी ऑडिशन घेणं, त्यातून स्पर्धकांची निवड करणं हे सगळं जाम आवडलं ...! हे सगळं निर्मात्यांसाठी नवीनच होतं. फ्यूलरने अमेरिकन आयडॉल कार्यक्रम उत्कंठावर्धक बनवण्यासाठी काही गोष्टी त्यात समाविष्ट केल्या. कार्यक्रम बघणाऱ्या लोकानी स्पर्धकाना टेलिफोनद्वारे मतदान करायचं... तसंच क्यामेऱ्यामागे काय गोष्टी चालल्या आहेत, त्यातलं आजच्या भाषेत बोलायचं झाल्यास ‘बिहाइनड द सीन्स’ काय चालू आहे, तसंच टेक्स्ट मेसेज आणि वेबसाइटवर जाऊन मतदान करणे या गोष्टी समाविष्ट केल्या.  याबद्दल टीव्ही वर दाखवणे अश्या गोष्टींचा प्रथमच समावेश करण्यात आला.

सुरवातीच्या कार्यक्रमांमद्धे परीक्षक देशभर फिरून कोण टॅलेंटेड गायक आहे, त्यांचा शोध घ्यायचे, पण नंतर तो फॉरमॅट बदलला. अमेरिकन आयडॉल कार्यक्रमात सुरवातीला स्पर्धकांचं  वय १६ ते २४ वर्ष ठरवून अश्यानाच संधि देण्यात आली. पण नंतर नियमांमध्ये बदल करून वयोमार्यादा १५ ते २८ करण्यात आली. स्पर्धक लोकप्रिय झालेली गाणी म्हणून दाखवायची आणि त्यातून मग आयडॉल निवडला जायचा. असं कार्यकामचं स्वरूप होतं.

२००१ मध्ये फ्यूलर, कोवेल आणि जोन्स यांनी पॉप आयडॉल कार्यक्रमाचा फॉरमॅट अमेरिकेत विकायचा ठरवला, पण त्यात त्यानं यश आला नाही. टीव्ही निर्माते अश्या प्रकारच्या कार्यक्रमांबद्दल नकारात्मक पवित्रा घेत होते. थोडक्यात ते या कल्पनेने इम्प्रेस झाले नाहीत. खुद्द ज्या फॉक्स चॅनेलवर पुढे जाऊन अमेरिकेत पसिद्ध झाला त्याच्याच निर्मात्यानी सुरवातीला अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचं प्रपोजल परत पाठवलं. अमेरिकन आयडॉलचे २००२ ते २०१६ दरम्यान २० सीजन्स झाले. यातले होस्ट्, स्पर्धक, परीक्षक पुढे जाऊन प्रचंड प्रसिद्ध झाले.

असं जरी असलं तरीसुद्धा सुरू झाल्यानंतर काही वर्षानी कार्यक्रमाचे रेटिंगस आणि त्याचा  प्रेक्षकवर्ग कमी झाले. टीव्ही वरच्या प्रेक्षकाना सतत काही तरी नवीन हवं असतं किंवा जरा हटके कार्यक्रम पाहायची इछा होते आणि मग पुढे तर सवयच होते. पण हे एका ठराविक काळा पर्यन्त.. नंतर जर एखादा कार्यक्रम सतत दाखवला गेला तर त्यामध्ये तोचतोचपणा येतो आणि मग त्याचा प्रेक्षकाना कंटाळा यायला लागतो. म्हणून कुठेतरी थांबणं आवश्यक असतं.

या अमेरिकन आयडॉल कार्यक्रमावरून नंतर आपल्याकडे इंडियन आयडॉल हा कार्यक्रम सुरू झाला. त्याचेही बरेच सीजन्स झाले. अमेरिकन आयडॉल या कार्यक्रमाचे अधिकार २०१८ पासून एबीसी या अमेरिकन वाहिनीने खरेदी केले आणि त्याचे नवीन सीजन्स सुरू झाले. ते आजही सुरू आहेत. एबीसी वर पहिल्यांदा २०१८ ला हा कार्यक्रम सुरू झाला. अमेरिकन आयडॉलचे अधे-मधे परीक्षक बदलले तसंच कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणजे होस्ट् सुद्धा बदलले पण कायम राहिला तो कार्यक्रम आणि त्याची संकल्पना... ! अश्या कार्यक्रमाला अमेरिकन टीव्ही वर येऊन आज २० वर्ष झाली आणि त्याची जादू सगळ्यांच्या मनावर घर करून राहिली.


-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

  युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्ध...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...