मुख्य सामग्रीवर वगळा

यूक्रेन ने बुडवली रशियाची सगळ्यात ताकदवान युद्धनौका!

 

रशिया आणि यूक्रेन यांच्यामधलं युद्ध अजूनही सुरू आहे. २४ फेब्रुवारी २०२२ ला रशियाने यूक्रेनमध्ये सैन्य पाठवलं. सुरवातीला रशियन सैन्याने आगेकूच केली पण सद्य परिस्थितीत यूक्रेन रशियाशी चिवटपणे लढत आहे. आपल्याला वाटेल रशियासारखी मोठी लष्करी ताकद यूक्रेनशी आरामात लढत असेल... म्हणजे आपल्याला वाटेल रशिया क्रूर पद्धतीने यूक्रेनमध्ये शिरला आणि आता यूक्रेनचा नायनाट करतो आहे. ही गोष्ट पूर्ण खरी नसून थोडी खरी आहे... याचं कारण यूक्रेनच्या मदतीला अमेरिका आणि तिचे मित्रदेश धावून आले आहेत. त्यामुळे या युद्धरूपी चित्रपटातले व्हिलन फक्त रशियानसून यूक्रेन, अमेरिका आणि तिचे मित्रराष्ट्रसुद्धा आहेत. याचा समान दोष हा यूक्रेन आणि अमेरिका यांना पण तेवढाच आहे. काही दिवसांपूर्वी यूक्रेनने अमेरिकेच्या मदतीने रशियाचे ब्लॅक सी फ्लिट मधले फ्लॅगशिप म्हणजेच नेतृत्व करणारे आणि सगळ्यात ताकदवान असं जहाज ‘मॉस्कव्हा’ हे काळ्या समुद्रात बुडवलं.

ओडेसा या प्रांताच्या जवळ काळ्या समुद्रात साधारण १२० किमी दूर असताना ‘मॉस्कव्हा’ वर दोन मिसाईल्स डागल्या नंतर काही वेळाने रशियाचे जहाज समुद्रात बुडाले आणि त्याला जलसमाधी मिळाली... अमेरिकेने यावर थेट भाष्य करणं टाळलं आहे. अमेरिकेचा परराष्ट्र विभागाचा प्रवक्ता एवढंच म्हणाला की यूक्रेनने ‘मॉस्कव्हा’ वर दोन मिसाईल्स डागल्या आणि ते जहाज बुडाले, यासाठी रशियाच्या जहाजाचं स्थान नक्की कुठे होतं आणि ते कुठे निघालं होतं याबद्दल  अमेरिकेच्या गुप्तचर संस्थानी यूक्रेनियन मिलिटरीला माहिती पुरवली पण या जहाजाच्या हल्ल्यात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता.

‘मॉस्कव्हा’ हे रशियाच्या ब्लॅक सी फ्लिट मधलं सगळ्यात मोठं, नेतृत्व करणारं, म्हणजे ज्या जहाजावर साधारणतः कमांडिंग ऑफिसर (अँडमिरल) असतो आणि तो आदेश देत असतो या प्रकारची ही युद्धनौका  होती. यूक्रेनवर जेंव्हा रशियाने चढाई करायला सैन्य पाठवलं त्या वेळेस या जहाजाने प्रथम यूक्रेनकडे काळ्या समुद्रात कुच केलं...  ते ‘सेवास्तोपोल’ इथून निघालं होतं. १४ एप्रिल २०२२ ला या बद्दल माहिती मिळताच या युद्धनौकेवर यूक्रेनच्या सैन्याकडून दोन R – 360 नेपच्यून अॅंटी शिप मिसाईल्स डागण्यात आल्या. याउलट रशियाने याबद्दल मॉस्कव्हा युद्धनौका यूक्रेनच्या हल्ल्यात बुडाली नसून त्या युद्धनौकेवर त्याच्या दारुगोळ्याला आग लागली म्हणून ते बुडालं हे कारण दिल आहे. अर्थात ते बहुतेक तितकस खरं नाही. यूक्रेनने सांगितल्यानुसार ओडेसा या भागातून जमिनीवरून मारा करणाऱ्या लॉंनचर वरुन या मिसाईल्स डागण्यात आल्या होत्या. मॉस्कव्हा ही युद्धनौका आकाराने प्रचंड होती... या जहाजाची लांबी होती १८६ मीटर इतकी... या जहाजावर ५१० इतका कर्मचारीवर्ग (Crew) होता. रशियाने मॉस्कव्हा बद्दल सांगताना म्हटलं आहे की हे जहाज खराब वातावरणामुळे आणि खवळलेल्या समुद्रमुळे वादळामुळे बुडाले आहे. रशियाने अधिकृतपणे मृतांची आकडेवारी जारी केली, त्यात म्हटलं की १ कर्मचारी मृत पावला आहे तर २७ जण मिसिंग आहेत... तर यूक्रेनकडून सांगण्यात आलं की बरेच कर्मचारी यात मृत पावले आहेत.

रशियाच्या पुतीन यांनी यूक्रेनला वॉर्निंग दिली आहे, यूक्रेनने आणि अमेरिकेने युद्धं थांबवलं नाही तर रशिया यूक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करेल. बेलारूस हा देश तसा रशियाच्या बाजूने उभं राहणारा... पण बेलारूसच्या अध्यक्ष असलेल्या आलेक्झानडर ल्युकाशेनको यांनी सांगितले की अण्वस्त्र हल्ला करणं  म्हणजे सगळीकडे विनाशच विनाश... आणि याची प्रचंड किमत आपल्याला मोजावी लागेल... अर्थात ल्युकाशेनको पुढे हेसुद्धा म्हणाले आहेत की यूक्रेनचे अध्यक्ष झेलेनसकी आणि अमेरिकेचे बायडन यांनी ठरवलं तर ते हे युद्ध काही वेळातच संपेल... यामधला सुचक इशारा म्हणजे अमेरिकेने यूक्रेनला मदत करणं थांबवाव आणि झेलेनसकी यांनी ताबडतोब शरणागती पत्करावी. अमेरिका तर यूक्रेनला भरमसाठ निधी देत आहे. बायडन यांनी ३३ बिलियन डॉलरची सैनिकी आणि आर्थिक मदत देण्याकसाठी अमेरिकन कॉँग्रेसला विनंती केली आहे. अमेरिका म्हणते यूक्रेनला लष्करी मदत देणं म्हणजे आम्ही रशियावर हल्ला करत नाही... हे तितकसं बरोबर नाही, याचं कारण अमेरिकेच्या एकूण पाच मिलिटरी साहित्य तयार करणाऱ्या आणि पुरवणाऱ्या कंपन्यांकडून ही शस्त्रास्त्र अमेरिका यूक्रेनला देणार म्हणजे अश्या प्रकारची लष्करी मदत अमेरिका करणार आहे आणि करतेसुद्धा आहे. सुज्ञ लोकानी यावरून काय तो अर्थ काढावा... याचा अर्थ रशिया बरोबर आहे असं नाही, तर यूक्रेनचं काय चुकत आहे आणि अमेरिका कसं शस्त्रास्त्र स्पर्धेला खतपाणी घालत आहे हे यावरून समजेल.. रशिया यूक्रेन युद्ध लवकर थांबाव आणि दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी होऊन शांततेच्या मार्गाने चर्चा करून हा प्रश्न सोडवावा ... एवढीच अपेक्षा...!

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...