मुख्य सामग्रीवर वगळा

बोस्नियन युद्ध, स्कॉट ओ’ ग्रॅडी आणि ‘ऑपरेशन डीनाय फ्लाइट’

 दुसऱ्या महायुद्धानंतर जगात रक्तरंजित संघर्ष कुठला झाला असेल तर तो आहे बोस्निया आणि हरजेगोविना आणि सरबिया (Bosnia, Herzegovina आणि Serbia ही देशांची नावं) या देशांमधला! १९९२ ला बोस्नियन युद्धाला सुरवात झाली, हा संघर्ष तीन वर्ष चालला आणि १९९५ ला संपुष्टात आला. आधुनिक युगातलं भयंकर युद्ध जगाने अनुभवलं. युद्ध थांबत नाही हे पाहताच, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून नाटोवर (NATO-North Atlantic Treaty Organisation)  दबाव वाढला आणि युद्धात हस्तक्षेप करून हा संघर्ष ताबडतोप थांबावा यासाठी नाटोच्या फौजाना पाचारण करण्यात आलं. बोस्नियन युद्ध सुरू असताना बोस्नियन सरबियन (Serbian) मिलिटरी विमानानी बोस्नियन सरकार आणि बोस्नियन - क्रोएशियन (Croatia- हे देशाचं नाव)      फौजांविरुद्ध कारवाई करू नये यासाठी नाटोकडे जबाबदारी देण्यात आली. आणि याचाच एक भाग म्हणून ‘नो फ्लाय झोन’ (म्हणजे कुठलही विमान त्या हवाई हद्दीतून उडू नये) जाहीर करावा यासाठी नाटो फौजानी या मोहिमेला नाव दिलं ‘ऑपरेशन डीनाय फ्लाइट’! त्यादृष्टिने मोहिमेचा भाग म्हणून नाटोच्या ५५५ फायटर स्क्वाड्रनच्या दोन एफ-१६ लढाउ विमानानी इटलीच्या ‘अवियानो’ हवाई तळावरून पेट्रोलिंगसाठी (म्हणजे आकाशात टेहळणी करायसाठी) उड्डाण केलं... तो दिवस होता... २ जून १९९५! यातल्या एका एफ-१६ विमानाचा पायलट होता कॅप्टन स्कॉट ओ’ ग्रॅडी!

बोस्नियन सर्ब (Serb) आर्मीने या नाटोच्या विमानांवर हल्ला करण्यासाठी आणि जमिनीवरून हवेत मारा  करण्यासाठी मिसाईल (क्षेपणास्त्र)  तयारच ठेवली होती. सुरवातीला हे एफ-१६ उडत असताना त्याला कुठलीही वॉर्निंग न देता बोस्नियन आर्मीने क्षेपणास्त्र सोडण्यासाठी त्यांचं रडार   चालू केले, आणि या ‘सॅम’ (SAM-Surface to Air Missile, म्हणजे जमिनीवरून आकाशात मार करणारे क्षेपणास्त्र) ने स्कॉट ओ’ ग्रॅडी च्या विमानावर दोन क्षेपणास्त्र सोडली, बरं हे करत असताना, ग्रॅडी चं विमान मिसाईलच्या टप्प्यात येऊ दिल, म्हणजे अगदी क्षेपणास्त्र सोडण्याच्या यंत्राच्या वर येऊ दिलं, आणि त्याला कुठलीही पूर्वसूचना न देता त्याच्या विमानाला टिपलं... या पैकी एक क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते ग्रॅडीच्या एफ-१६ विमानावर वर आदळल. या पेट्रोलिंग (टेहळणी करण्याच्या) ड्युटीवर असलेलं दुसरं एफ-१६ मिसाईलच्या तडाख्यातून बचावलं. पण ग्रॅडी चं विमान कोसळल. दुसऱ्या एफ-१६ विमानाच्या पायलटला ग्रॅडी चं विमान खाली पडताना दिसलं. पण त्याला ग्रॅडीचं प्याऱ्याशूट कुठेही दिसलं नाही. इकडे ग्रॅडी विमानातून इजेक्ट (म्हणजे विमानाबाहेर हवेतच बाहेर पडण्यासाठीची व्यवस्था) केल्यानंतर तो शत्रूच्या भूमीवर पडला. त्याने त्याच्या १३ किलोच्या सरव्हायवल (Survival) बॅगला (जीवंत राहण्यासाठी आवश्यक असणारी आणि सैनिकांसाठी सर्व गरजेच्या वस्तु असलेली बॅग) घेऊन तिथून पळ काढला आणि तो एका जागी लपून बसला. त्याने जीवंत राहण्यासाठी झाडाची पाने, गवत आणि कीटक –अळ्या खाल्या. त्याने प्लॅस्टिक बॅग मध्ये जमवलेलं पावसाचं पाणी तो पित होता. त्याला तसं खडतर प्रशिक्षण देण्यात आलं होतं. आणि ग्रॅडीने त्याचं युद्धकौशल्यसुद्धा वापरलं. त्याने ६ दिवस असेच काढले. त्याच्याकडे रेडियो सेट होता पण त्याचा संपर्क नाटो बेसला (नाटोचा सैनिकी तळ) होत नव्हता.

अखेर त्याचे रेडियो यंत्रणेद्वारे सिग्नल नाटो बेसवरच्या (तळावरच्या) अधिकाऱ्यानी ओळखले. आणि शेवटी संपर्क प्रस्थापित झाला. ग्रॅडी म्हणाला, ‘धीस इज बशर ५२’, आय अॅम अलाइव्ह अँड आय निड हेल्प.’ त्याची ओळख पडताळून ती पटल्यानंतर नाटो कमांडर्सनी त्यासाठी रेस्क्यू प्लान  तयार केला. (त्याला शत्रूच्या जागेतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी योजना आखली)

मरीन कॉर्प्सचा (Marine Corps) कर्नल ब्रेंट याच्याकडे रेस्क्यू प्लॅनच्या मोहिमेची सूत्र सोपवली गेली. अमेरिकेची एडरीयटीक समुद्रात (Adriatic Sea) असलेली युद्धनौका ‘युएसएस केसर्ग’ (USS Kearsarge) वरुन चार स्टॅलियन जातीची हेलिकॉप्टरस आणि त्यात ५१ मरिन्स आणि दोन फायटर जेट्स अश्यानी या गुप्त मिशनवर कारवाईसाठी उड्डाण केलं. अखेर ग्रॅडीचा सिग्नल कुठून येतो आहे ती जागा ट्रेस करून (माहीत करून, शोध घेऊन)  तिथे सैनिकानी मार्गक्रमण केलं. सुरवतीला एक स्टॅलियन जातीचं हेलिकॉप्टर उतरलं त्यातून २० मरिन्स (अमेरिकन सैनिक) उतरले त्यांनी त्यांच्या पोजीशन्स घेतल्या, त्या पाठोपाठ दुसरं स्टॅलियन जातीचं हेलिकॉप्टर उतरलं, त्यात २० मरिन्स नी अक्षरशः ग्रॅडीलं आत ओढलं... उतरलेले मरिन्स परत एकेक करत चपळाईने स्टॅलियन जातीच्या हेलिकॉप्टर मध्ये परत येऊन बसले, सगळ सुरक्षित आहे हे बघून क्षणार्धात हेलिकॉप्टरस हवेत उडाले. हे सगळं मिशन विद्युत गतीने पार पडलं. म्हणजे नेमकं सांगायचं झाल्यास केवळ ७ मिनिटांमद्धे रेस्क्यू मिशन म्हणजे ग्रॅडीला शत्रूच्या भूमीतून सुरक्षित बाहेर काढण्याची योजना पार पडली. सकाळी ७.१५ ला ग्रॅडीला रेस्क्यू केल्या नंतर, वाचवल्या नंतर पुढे ३० मिनिटानी ते समुद्रात युएसएस केसर्ग जवळ उडत होते. स्थानिक प्रमाणवेळेनुसार ७.३० ला ग्रॅडी ‘केसर्ग’ युद्धनौकेवर परतला होता. तारीख होती, ८ जून १९९५! इतिहासात आजच्याच दिवशी हे जबरदस्त मिशन यशस्वीरित्या पार पडलं.    

ग्रॅडीला त्याच्या मिशनसाठी ‘ब्रॉन्झ स्टार’ आणि परपल हार्ट’ ही पदक मिळाली. कॅप्टन ग्रॅडीने १९८९ ते २००१ अशी १२ वर्ष अमेरिकेच्या वायु दलात सेवा बजावली. आणि नंतर तो निवृत्त झाला. असं म्हटलं जातं की २००१ साली हॉलीवूड मध्ये आलेला ‘बिहाइन्ड एनिमि लाईन्स’ हा प्रसिद्ध सिनेमा कॅप्टन ग्रॅडीच्या आयुष्यावर आणि त्याच्या मिशनवर आधारलेला आहे. अश्या प्रसंगानी वेळोवेळी हे सिद्ध होत आहे की अमेरिकेची सैन्यदलं आपल्या कामात अत्यंत निपुण आहेत, जगज्जेते आहेत. कारण अमेरिका महासत्ता आहे.

 

निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन!

  दहशतवाद हा जगाला आज नवीन राहिलेला नाही. ९/११ च्या हल्ल्यानंतर सगळे जग जागं झालं. भारतासारख्या देशाने दहशतवाद फार पूर्वीच काश्मीर च्या निमित्ताने पाहिलेला आहे. जगात आज अनेक विषय ज्वलंत आहेत, मग ते राजकीय असो अथवा आर्थिक किंवा सामाजिक . दहशतवाद हा विषय जवळपास या तीनही विषयांशी निगडीत आहे आणि त्याचा सामना नाईलाजाने सैनिकी कारवाईनेच करावा लागतो. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. काही निरपराध लोकसुद्धा प्रसंगी मारले जातात. पण सैनिकी कारवाई हा शेवटचा पर्याय असतो.   आता पर्यंत जगात अनेक सैनिकी कारवाया गाजल्या. त्यातल्या काही प्रसिद्ध पण झाल्या. यात दुस-या  महायुद्धातल्या कारवायांचा सुद्धा समावेश आहे. काही कारवाया शीतयुद्धात गाजल्या. काही मोजक्या कारवायांबद्दल सांगायचं झाल्यास ह्या सैनिकी कारवाया काही मिनिटांच्या होत्या, त्यातलीच एक म्हणजे डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन! इटलीच्या एलिट  म्हणजेच सर्वोत्तम कमांडोंच्या मदतीने केलेली अमेरिकेच्या नाटोस्थित एका सर्वोच्च सैनिकी अधिका-याला वाचवायची कारवाई. या एका विशेष युनिटने भाग घेतला. या युनिटचे नाव - इटालीअन अँटी टेरोरीस्त नुक्लिव ओपेरातीव से