मुख्य सामग्रीवर वगळा

या कारणामुळे दिली उत्तर कोरियाने पाकिस्तानला ताकीद!

 तसे अगदी कुख्यात कारणांसाठी प्रसिद्ध असलेले दोन देश म्हणजे उत्तर कोरिया आणि पाकिस्तान... दोन्हीही देश एकमेकांपेक्षा कमी नाही. दोन्हीही देश अण्वस्त्रधारी... ! पाकिस्तान आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले ते ‘७० च्या दशकात. समाजवादी देशांबरोबर युती करण्यासाठी म्हणून पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फीकार भुट्टो हे उत्तर कोरियाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते. पाकिस्तान – उत्तर कोरिया संबंध हे एका वेगळ्याच कारणामुळे दृढ झाले ते म्हणजे उत्तर कोरियाने पाकिस्तानला अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरवले तेंव्हा. इराण - इराक युदधमद्धे उत्तर कोरिया आणि पाकिस्तानने इराणला पाठिंबा दिला होता. हा झाला इतिहास... ! पण वर्तमानात तर उत्तर कोरिया हा पाकिस्तानवर एका वेगळ्याच कारणासाठी नाखुश आहे. ते कारण म्हणजे दारू... इथे तर असं म्हणण्याला जागा आहे की एकविसाव्या शतकात केवळ दारुमुळे दोन देशांचे संबंध बिघडू शकतात असं हे पहिलच उदाहरण आहे. तुम्हाला हे सगळं वाचल्यानंतर गंमत वाटेल पण हे असं घडलं आहे.

उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांचे डिप्लोमॅटीक लेव्हलवर संबंध आहेत. इस्लामाबाद इथे उत्तर कोरियाचा दूतावास आहे तर प्योंगयंगमध्ये पाकिस्तानचा दूतावास आहे. असे हे राजनईक स्तरावर संबंध आहेत. मागच्या काही वर्षात घडलेल्या घटनांमुळे उत्तर कोरियाबरोबरचे पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. त्यात आता नवीन भर पडली आहे. ७ मार्च २०२२ रोजी, पाकिस्तानच्या इस्लामाबाद इथे असलेल्या उत्तर कोरियाच्या दूतावासावर पाकिस्तानी पोलिसानी छापे टाकले. कारण काय तर, उत्तर कोरियन अधिकारी पाकिस्तानमध्ये दारू स्मगल करत होते, अनैतिकदृष्ट्या दारू आणत होते. पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यानी उत्तर कोरियन दुतावासातील अधिकाऱ्याना दमदाटी करून, गुन्हा नोंदवून, त्यांना हातकड्या घालून चौकशी केली. बंदुकीचासुद्धा धाक दाखवला.

२०१६ आणि २०१७ ला अश्याच काहिशा घटना घडल्या होत्या. १० पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यानी उत्तर कोरियाच्या पाकिस्तानमधल्या, इस्लामाबाद मधल्या राजदूताचं घर फोडून, अनधिकृतरीत्या आत प्रवेश करून राजदूतला पकडलं तसंच त्याच्या पत्नीला दम दिला, धाक दाखवला, छळ केला आणि चौकशी केली. याचं कारण देण्यात आलं की या राजदूताने अनधिकृतरित्या दारू पाकिस्तानमध्ये आयात केली होती म्हणून.

७ मार्च २०२२ ला जी घटना घडली, म्हणजे पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यानी जे छापे टाकले त्यामागे जे कारण देण्यात आला ते सरासर खोटं होतं, असं नंतर लक्षात आलं. म्हणजे पाकिस्तानी सूत्राना टीप मिळाली होती की उत्तर कोरियाच्या दुतावासात अगदी भरपूर प्रमाणात दारू अनधिकृतरित्या आणली आहे... पण ही माहिती खोटी निघाली. यावर पाकिस्तानचा अंतरिम मंत्री रशीद खान याने घडलेल्या प्रसंगाबाबत माफी मागितली. आणि मान्य केलं की काहीतरी चुकीची बातमी, टीप पाकिस्तानी सूत्राना मिळाली होती. यावर उत्तर कोरियाच्या दुतावासाने एक पत्रक जारी केलं. त्यात त्यांनी म्हटलं की ज्या पाकिस्तानी अधिकाऱ्यानी हे सत्र चालवलं म्हणजे चौकशी केली, धाक दाखवला त्याबद्दल त्यांनी बिनशर्त माफी मागावी, त्यांना निलंबित करण्यात यावं आणि उत्तर कोरियाचा इस्लामाबाद इथला दूतावास ही सर्वस्वी उत्तर कोरिया सरकारची अधिकृत जागा आहे, तसंच ती जागा स्वतंत्र आहे, यावर अश्या पद्धतीने पाकिस्तानी अधिकारी प्रवेश करू शकत नाहीत. उत्तर कोरियाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली, तसंच पाकिस्तानला ताकीद दिली की अश्या पद्धतीने पाकिस्तान यांच्याशी वागू शकत नाही. हा ‘व्हिएन्ना कंनव्हेनशनचा’ सरळ सरळ भंग आहे, आणि यासाठी उत्तर कोरिया दाद मागेल.

गोष्ट इथेच थांबत नाही... आता तर कहानी मे ट्विस्ट म्हणजे या प्रकरणाबद्दलची धक्कादायक बाब समोर आली. त्यानुसार पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्याना उत्तर कोरियाच्या दूतावसावर छापे टाकून, तिथून जर दारू निघाली तर ती स्वतःकडे  घेऊन खुल्या बाजारात त्याची विक्री करायची होती, अन त्यातून पैसे कमवायचे होते... म्हणजे पैसे मिळवण्याचं साधन म्हणून पोलिस अधिकारी अश्या पद्धतीने थेट दूतावसावर छापे टाकत होते.

या घडलेल्या सर्व प्रकरणामुळे पाकिस्तानची उरली सुरली विश्वासार्हता संपुष्टात आली, आणि जागतिक माध्यमांसमोर पाकिस्तानचं नाक कापलं गेलं. शेवटी उत्तर कोरियासारख्या मित्रदेशाने पाकिस्तानला ताकीद दिली, यावर पाकिस्तानने विचार करावा.

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेकडे आपोआपच गेली. अत्