मुख्य सामग्रीवर वगळा

हवामान बदल आणि माणूस प्राण्याची झोप!

 हवामान बदल हा सध्याच्या घडीचा मानवी आयुष्यातला एक सगळ्यात ज्यास्त चर्चिला जाणारा विषय झाला आहे. मागच्या काही दशकांपर्यन्त हवामान बदलाबद्दल इतकी जागरूकता नव्हती जितकी आज आहे. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, ओला व कोरडा दुष्काळ, हिमछादीत प्रदेशातला बर्फ वितळणे, अंटाऱ्टिका आणि आर्टिक भागातले ग्लेशीयर्स वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, पुर येणे, अवकाळी पाऊस येणे अश्या एक ना अनेक बाबी जगभरात घडू लागल्या आहेत. हवामान बदलाचा थेट परिणाम तर आता मानवी जीवनावर होणार आहे. थेट बोलायचं झाल्यास हवामान बदलामुळे माणसांच्या जीवन पद्धतीवरच याचा परिणाम होणार आहे. मनुष्य प्राण्याची झोप यामुळे कमी होणार आहे.

कोपनहेगन विद्यापीठातल्या केलटन मायनर यांनी या संदर्भात ६८ देशांमधल्या ४८,००० लोकांच्या झोप घेण्याबद्दलचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी त्या व्यक्तींच्या हातावर म्हणजे रिस्टबँड बांधून त्याच्या झोपेबद्दल ची माहिती ट्रॅक करून, त्यानुसार निष्कर्ष काढले आहेत. आणि हे निष्कर्ष चक्रावून टाकणारे आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार २०९९ पर्यन्त एका साधारण व्यक्तीची झोप ही दर वर्षी ५० ते ५८ तास इतकी कमी होईल. म्हणजे दर रात्रीचा हिशोब केला तर दर रात्री १० मिनिटे या या वेगाने माणसांची झोप कमी होत जाईल. म्हणजे हवामान बदलामुळे माणसांची झोप दिवसेंदिवस कमी कमी होत जाईल. अजून एक अचंबित करणारं निरीक्षण म्हणजे जे लोक विकसनशील देशांमध्ये राहतात त्यांच्यावर हवामान बदलामुळे प्रतिकूल परिणाम होईल आणि त्यांच्या झोपेवर इतर विकसित देशांमधल्या लोकांच्या झोपेपेक्षा ज्यास्त परिणाम होईल.

भविष्यामध्ये साधारण एक प्रौढ व्यक्ति रात्री उशिरा झोपेल आणि सकाळी लवकर उठेल, म्हणजे त्याची झोप दिवसेंदिवस कमी कमी होत जाईल. तसंच ज्या दिवशी उष्ण तापमान असेल त्या दिवशी ती प्रौढ व्यक्ति कमी वेळ झोपेल. याचं वैद्यकीय कारण थक्क करणारं आहे. माणसाला झोप लागण्यासाठी त्याच्या शरीराचं कोअर टेंपरेचर हे कमी व्हावं लागतं. पण ज्या दिवशी वातावरणातलं तापमान ज्यास्त असेल त्या दिवशी ज्यास्त तापमानामुळे शरीरातलं कोअर टेंपरेचर कमी होणार नाही आणि याचा थेट परिणाम होऊन झोप कमी कमी होत जाईल. ‘वन अर्थ’ या नियतकालीकामध्ये वरील निरीक्षण मायनर यांनी मांडले आहेत.  

 

यातलं अजून एक महत्वाचं निरीक्षण म्हणजे वेगवेगळे ऋतु, लोकसंख्या आणि वेगवेगळ्या प्रदेशातलं हवामान याचा परिणाम होऊन त्याची परिणीती कमी झोप लागण्यामध्ये होईल. हवामान बदलामुळे तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम होईल.

हवामान बदलामुळे बाकी घटकांवरसुद्धा परिणाम होणार आहे. दक्षिण आशियामध्ये मान्सूनचा पाऊस ज्या प्रमाणात पडत होता त्याची वारंवारिता बदलत चालली आहे किंवा कमी होत चालली आहे. म्हणजे समसमान प्रमाणात पाऊस पडत नाहीच. तापमान वाढीमुळे जर हिमालय वितळला, तर त्यातून उगम पावणाऱ्या नद्याना पुर येतील आणि यामुळे समुद्राची पातळी वाढेल, तसंच ओला दुष्काळ पडेल. कदाचित दुसऱ्या भागात तर कोरडा दुष्काळ पडेल, पाण्यासाठी वणवण फिरावं लागेल. म्हणजे एकीकडे पुर तर दुसरीकडे पाणीच नाही, असे महाभयंकर परिणाम उद्भवतील आणि खरंच ही विचार करायला लावणारी बाब आहे. या शतकाच्या शेवटापर्यंत पृथ्वीचं तापमान हे २ डिग्री सेल्सिअस ते ६ डिग्री सेल्सिअस इतकं वाढण्याची शक्यता आहे.    

जागतिक तापमान वाढ ही खऱ्या अर्थाने सुरू झाली ती औद्योगीक क्रांतीनंतरच... याचं कारण मानवी हस्तक्षेपामुळे हरित वायु उत्सर्जनाचं प्रमाण प्रचंड वाढलं. १९५० नंतर ते अधिक प्रमाणात वाढू लागलं. उद्योगधंद्याना, कारखान्याना काम करण्यासाठी ऊर्जेची गरज भासली. त्यामुळे कोळसा आणि तेल या दोन ऊर्जा साधनाची गरज मोठ्या प्रमाणात वाढू लागली. शिवाय वाहन उद्योगांच्या भरभराटीमुळे अतिरिक्त ताण संसाधनांवर पडू लागला. हे तेल नावाचं शस्त्र वापरुन आखाती देशांनी तर याचा पुरेपूर फायदा घेतला. महासत्ता असणाऱ्या अमेरिकेने तर आखाती देशांकडून तेल विकत घेण्यापेक्षा आपण स्वतःच तेल उत्पादन करुयात असं ठरवलं आणि आज अमेरिका सौदी अरेबियाला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश बनला आहे.

मूळ मुद्यावर यायचं झाल्यास हवामान बदल आणि माणूस प्राण्याची झोप यांचामद्धे नक्की काय संबंध आहे हे वरील विवेचनावरून लक्षात येईल... म्हणूनच आताच मानव प्रजातीला झोपेतून जागं होण्यासाठी ही योग्य वेळ आहे अन्यथा आपण विनाशाकडे चाललो आहोत हे आता आपल्याला लक्षात आलं असेल. गंभीर होऊन मानवाने शाश्वत उर्जेचा ध्यास घेऊन मार्गक्रमण केलं तर कुठे सकारात्मक बदल घडून हवामान बदलाचा प्रश्न आणि त्याचे परिणाम याचा दाह कमी होईल.

सुधारण्यासाठी हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे, मानवाने यावर विचार करावा आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे कृती करावी.

 

निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेकडे आपोआपच गेली. अत्