मुख्य सामग्रीवर वगळा

अखेर यूक्रेनचा युरोपीय महासंघाचा सदस्य बनण्याचा मार्ग मोकळा!

 रशिया – यूक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर यूक्रेनसाठी आणि यूक्रेनवासीयांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. रशिया - यूक्रेन संघर्ष फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाल्यानंतर साधारणतः आठवडयाभरात यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेनस्की यांनी युरोपीय महासंघाचा सदस्य म्हणून यूक्रेनला मान्यता मिळावी यासाठी अर्ज केला होता. त्यात हेसुद्धा म्हटलं होतं की आम्हाला महासंघाचं सदस्यत्व तातडीने पाहिजे आहे. यावर युरोपीय महासंघाने विचार करून निर्णय देऊ असं यूक्रेन सरकारला सांगितलं होतं. अर्थात युरोपीय महासंघाचा सदस्य बनण्यासाठी एक प्रक्रिया असते, आणि कडक कायदे असतात, तसंच एखादा देश सदस्य बनण्यासाठी त्याला महासंघाचे नियम पाळावे लागतात आणि अश्या नियमांची पूर्तता केल्यानंतरच सदस्यत्व मिळण्याचा मार्ग सुकर होतो. ही प्रक्रिया जरी सोपी वाटत असली तरी कायदेशीर प्रक्रिया असल्यामुळे अनेक वर्ष यात खर्ची होऊ शकतात.

या संगळ्यामागे खूप मोठं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे ते समजून घेतलं पाहिजे. रशियाला इतिहासतलं गतवैभव प्राप्त करून घेण्यासाठी आणि एकसंध रशियासाठी जे देश पूर्वीच्या सोव्हिएत महासंगात होते आणि जे १९९१ ला सोव्हिएत महासंघाचं विघटन होऊन वेगळे आणि स्वतंत्र झाले त्यांना परत रशियाच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी पुतीन प्रयत्नशील आहेत. थोडक्यात पुतीन यांना “अखंड रशिया,” एकसंध रशियाची निर्मिती करायची आहे. दूसरा मुद्दा म्हणजे रशियाला नाटोचा विस्तार पूर्व युरोप मध्ये आणि खास करून जे पूर्वीचे सोव्हिएत प्रजासत्ताक देश होते तिथे करू द्यायचा नाही... आणि यासाठीच तर रशियाने यूक्रेनवर आक्रमण केलं. रशिया –यूक्रेन संघर्ष नवा नाही. २०१४ मध्येसुद्धा क्रायमिया या यूक्रेनमधल्या प्रांतावर रशियाने स्वारी केली होती आणि त्याला रशियाचा भाग म्हणून घोषितही करून टाकलं. आजची परिस्थिति वेगळी आहे. युक्रेनला एक स्वायत्त देश म्हणून स्वतःला सिद्ध करायचं आहे. त्याला रशियाचा अमल नको आहे.

युरोपीय महासंघ हा आर्थिक आणि राजकीय असा युरोपातल्या २७ देशांचा महासंघ आहे. महासंघाचं “युरो” नावाचं स्वतःचं चलन आहे. युरोपीय महासंघातल्या देशांमध्ये वस्तु, सेवा आणि पैसा यांचा मुक्त वावर आहे... म्हणजे कुठलही बंधन नाही. त्याचप्रमाणे महासंघातल्या सदस्य देशांमधल्या लोकाना युरोपीय देशांमध्ये कुठेही राहण्याचा आणि नोकरी-व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. हे सगळे आर्थिक फायदे आहेत. तसंच एखाद्या गरीब युरोपीय देशाला अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि आर्थिक मदत जारी करण्यासाठी, तसंच महासंघातल्या इतर देशांच्या विकसित अर्थव्यवस्थानबरोबर मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत करण्याचं धोरण अग्रस्थानी आहे. हे सगळे आर्थिक फायदे आहेत.

या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे महासंघाचं सदस्यत्व मिळाल्यानंतर विकासाच्या दिशेने वाटचाल करत येते, आर्थिक उन्नती होते, देशातल्या नागरिकांचं जीवनमान सुधारतं.. हे सगळं मान्य आहे. पण इथे सदस्यत्व मिळण्यासाठी बऱ्याच काळ जावा लागतो, ही खरी अडचण आहे. आणि तोच मोठा प्रश्न यूक्रेनसमोर आहे. यूक्रेनबरोबर मोलडोवा आणि जॉर्जिया या देशानीसुद्धा महासंघाचं सदस्यत्व मिळावं यासाठी अर्ज केला आहे. काही असे देश जे युरोपीय संघात नुकतेच सामील झाले त्यांना सदस्यत्व मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागली. यात समावेश होतो तो बल्गेरिया, रोमानिया आणि क्रोएशिया या देशांचा. या देशाना १० ते १२ वर्ष सदस्यत्व मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. तर अल्बानिया, नॉर्थ मॅसेडोंनीया, मोनटेनिग्रो आणि सरबिया हे देश तर प्रतीक्षा यादीत अनेक वर्ष झाले आहेत. युक्रेन ने सदस्यत्वासाठी अर्ज केल्याचं कळताच बाल्कन देश जे या प्रतीक्षा यादीत आहेत त्यांनी युरोपीय महासंघाला आणि युक्रेनला इशारा दिला आहे. कारण अर्थातच या देशाना आतापर्यंत सदस्यत्व मिळालं नाही आणि इतक्या पटकन सदस्यत्व युक्रेनला मिळू शकतं, या गोष्टीचा राग त्या देशांमध्ये आहे. तुर्कस्तानचं उदाहरण घ्यायचं झाल्यास १९९९ पासून युरोपीय महासंगाचं सदस्यत्व मिळावं यासाठी प्रबळ उमेदवार म्हणून तुर्कस्तानकडे पाहिलं जायचं पण तुर्कस्तानचं मानवी हक्कांचं ट्रॅक रेकॉर्ड फारसं चांगलं नाही असं कारण देऊन त्याची सदस्यत्वसाठीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.   

युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष “उरसूला फॉन दे लेयेन” म्हणाल्या की युक्रेनला सर्व स्तरावर सुधारणा कराव्या लागतील. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, मानवी हक्क सुधारणा, तसंच भ्रष्टाचार थांबवणे या सगळ्या गोष्टींचा समावेश हा या सुधारणांचा भाग आहे.

युरोपीय महासंघामद्धे यासाठी मतदान घेण्यात आलं. “युरोपीयन युनियन ट्रीटी” या करारानुसार कलम २ अन्वये काही आवश्यक अटींची पूर्तता ज्या देशाला महासंघाचं सदस्य बनायचं आहे त्याला करावी लागते. या कलमानुसार स्वातंत्र्य, लोकशाही, समता आणि कायदा आणि सुव्यवस्था, मानवी हक्कांप्रती आदर, त्याच प्रमाणे अल्पसंख्याक समाजाप्रती आदर या गोष्टींची आणि स्त्री-पुरुष समानता, त्यांचे हक्क या मूल्यांची पूर्तता या कलमा अन्वये करणं आवश्यक आहे.

युरोपीय संसदेमद्धे युक्रेनला उमेदवार बनवून त्याला सदस्यत्व द्यावं असा ठराव ५२९ विरुद्ध ४५ इतक्या मतांनी मंजूर झाला. तर १४ सदस्य या मतदाना दरम्यान अनुपस्थित राहिले. फ्रांस हा महासंघातला एक अत्यंत महत्वाचा देश... फ्रांसने युरोपीय महासंघाचा विस्तार करण्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका घेतली आहे. म्हणजे फ्रान्सचा यूक्रेनला पाठिंबा आहे, हे यावरून स्पष्ट होतं.

शेवटी सांगायचं म्हणजे युक्रेनला केंव्हा सदस्यत्व मिळेल त्यावर बऱ्याचश्या गोष्टी अवलंबून आहेत. जर लवकर सदस्यत्व मिळालं तर त्याचा परिणाम रशिया – युक्रेन यांच्या संघर्षाच्या निकालावर होईल. तसंच जर युरोपीय महासंघाचं सदस्यत्व मिळायला उशीर होणार असेल तर रशिया - युक्रेन यांच्यामधला संघर्ष दीर्घकाळ चालेल. अशी चिन्ह आहेत. आगामी काळात याबद्दल पूर्ण चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे.

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...