मुख्य सामग्रीवर वगळा

वँग यी भेटले... आता पुढे काय?

 बऱ्याच खटाटोपीनंतर अपेक्षित असलेली, पण आधी न ठरलेली अशी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची प्रस्तावित ‘भारत भेट’ एकदाची झाली. असा उल्लेख करायचं कारण म्हणजे वँग यी यांची भारत भेट ही आधी ठरलेली नव्हती, पण शक्यता वर्तवण्यात येत होती की दक्षिण आशिया भेटीवर असलेले वँग यी हे भारत भेटीवर येतील. दोन्हीही देशांनी म्हणजे, भारत आणि चीनने या बद्दल अधिकृतपणे न बोलणच  पसंत केलं. याला एक पार्श्वभूमी आहे ती म्हणजे २०२० च्या गलवान संघर्षाची... आतापर्यन्त गलवान संघर्षानंतर जवळपास १५ वेळा भारत आणि चीन यांच्या दरम्यान लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणजे कॉर्प्स कमांडर्स स्तरावर बैठकी झाल्या होत्या. त्यात प्रगती झाली नाही. आणि म्हणून सैनिकी बैठकीपेक्षा, राजकीय बैठकांमधून काही फलनिष्पत्ती होते का, याचा  ऊहापोह करायचा होता आणि म्हणूनच या बैठक झाल्या. नेमकं सांगायचं म्हणजे वँग यी हे दक्षिण आशियाच्या दौऱ्यावर होते. म्हणजे ते पाकिस्तान आणि अफगानिस्तान इथल्या बैठका आटपून भारत भेटीवर आले होते.

पण वँग यी यांचं भारत भेटीवर येण्याचं कारण काय? थेट बोलायचं झाल्यास भारत आणि चीन द्विपक्षीय संबंध सुधारणे आणि त्यांना सामान्य स्तरावर आणणे हा या बैठकी मागचा मूळ हेतु होता. फार महत्वाच्या घडामोडी या बैठकीत घड्ल्या. म्हणजे सुरवातीला चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी हे भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भेटले. या बैठकीत डोवाल यांनी यी यांना भारत चीन सीमारेषेवर शांतता प्रस्थापित होण्यासाठी चीनने प्रयत्न करावेत असं सांगितलं. जो पर्यन्त चीन आपले सैनिक LAC वरुन मागे घेत नाही आणि चीनी सैनिक त्यांच्या आधीच्या ठिकाणावर जात नाहीत तो पर्यन्त भारत चीन शांतता वार्ता सफल होऊ शकत नाहीत असं सांगितलं. यी यांनी दुसरी भेट घेतली ती होती भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची... जयशंकर यांनीसुद्धा वँग यी यांना सांगितलं की भारत चीन सीमेवर शांतता प्रस्थापित होण्यासाठी चीनने आपले सैनिक तिथून मागे घेणं गरजेचं आहे. यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर, भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी यांच्या बरोबर पत्रकार परिषद घेतली आणि त्यात हे ठसवून सांगितलं की भारताला शांतता हवी आहे पण चीनने काही गोष्टींची पूर्तता केल्यासच आपल्याला पुढे जाता येईल.

जयशंकर यांनी परिषदेत भारताचे चीन बरोबर संबंध हे ‘वर्क इंन प्रोग्रेस’ आहेत असं सांगितलं. म्हणजे संबंध सुधारण्याच काम चालू आहे, पण पूर्ण यश आलं नाही अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे, असा अर्थ त्यातून निर्देशित होतो. तसंच जयशंकर यांनी हे ठासून सांगितलं की भारत चीन संबंध सद्य परिस्थितीत नॉर्मल नाहीत.  वँग यी यांच्या भेटीमागे अजूनसुद्धा काही कारणं होती. ती म्हणजे सध्याच्या रशिया- यूक्रेन युद्धात चीनच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा. तसंच भारताने अमेरिकेच्या दबावाखाली येऊ नये. चीन सरकारच्या मुखपत्रात म्हणजे ‘ग्लोबल टाइम्स’ मधल्या लेखाने  तर भारताने रशिया-यूक्रेन युद्धात तटस्थ भूमिका घेतल्याबद्दल भारताचं अभिनंदन करून चीन मोकळा झाला. तसंच परत एकदा हिन्दी चीनी भाई भाई ची रि ओढली होती. चीनने भारताच्या भूमिकेची स्तुति केली. आणि भारत चीन यांनी एकत्र येण्याचा आणि एकत्र काम करण्याचा सल्ला दिला. वँग यी यांच्या भेटीचं अजून एक कारण म्हणजे जी-२०, ब्रिक्स आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन यांचं यजमान पद चिनकडे आहे म्हणजे चीनमध्ये या तीन गटांच्या बैठका होणार आहेत, यासाठी श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षपणे या तीनही बैठकाना उपस्थित राहावे यासाठी खास जिनपिंग यांचा खलिता घेऊनच ते आले होते.

यादरम्यान वँग यी यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल याना चीन भेटीचे निमंत्रण दिले. एक महत्वाची बाब इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, वँग यी यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. पण मोदी यांनी यी यांची भेट घेतली नाही. याबद्दल भारताने बोलण्याचे टाळले. याचा अर्थ सरळ आहे, मोदींनी यी यांची भेट घेण्याचं टाळलं... भारत ‘गलवान’ प्रसंग विसरलेला नाही, चीनने विश्वासघात केला... पण हा पूर्वीचा भारत नाही, हे कळण्यासाठी मोदी यांनी भेट नाकारणं म्हणजे एक मोठं डिप्लोमॅटीक पाऊल आहे. हे ठळकपणे इथे जाणवतं. यातून चीनला योग्य तो संदेश जाईल... भारताने भक्कम भूमिका घेतली आहे याचं हे द्योतक आहे इतकंच म्हणावस वाटतं.

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन!

  दहशतवाद हा जगाला आज नवीन राहिलेला नाही. ९/११ च्या हल्ल्यानंतर सगळे जग जागं झालं. भारतासारख्या देशाने दहशतवाद फार पूर्वीच काश्मीर च्या निमित्ताने पाहिलेला आहे. जगात आज अनेक विषय ज्वलंत आहेत, मग ते राजकीय असो अथवा आर्थिक किंवा सामाजिक . दहशतवाद हा विषय जवळपास या तीनही विषयांशी निगडीत आहे आणि त्याचा सामना नाईलाजाने सैनिकी कारवाईनेच करावा लागतो. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. काही निरपराध लोकसुद्धा प्रसंगी मारले जातात. पण सैनिकी कारवाई हा शेवटचा पर्याय असतो.   आता पर्यंत जगात अनेक सैनिकी कारवाया गाजल्या. त्यातल्या काही प्रसिद्ध पण झाल्या. यात दुस-या  महायुद्धातल्या कारवायांचा सुद्धा समावेश आहे. काही कारवाया शीतयुद्धात गाजल्या. काही मोजक्या कारवायांबद्दल सांगायचं झाल्यास ह्या सैनिकी कारवाया काही मिनिटांच्या होत्या, त्यातलीच एक म्हणजे डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन! इटलीच्या एलिट  म्हणजेच सर्वोत्तम कमांडोंच्या मदतीने केलेली अमेरिकेच्या नाटोस्थित एका सर्वोच्च सैनिकी अधिका-याला वाचवायची कारवाई. या एका विशेष युनिटने भाग घेतला. या युनिटचे नाव - इटालीअन अँटी टेरोरीस्त नुक्लिव ओपेरातीव से