मुख्य सामग्रीवर वगळा

इलहान ओमर, वादविवाद आणि भारत!

 इलहान ओमर या अमेरिकी कॉँग्रेसवूमन! म्हणजे अमेरिकेतल्या एक राजकारणी...! त्या मिनेसोटा या अमेरिकेतल्या प्रांताचं प्रतिनिधित्व करतात. त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत. ओमर या अमेरिकी कॉँग्रेसमधल्या पहिल्या सोमाली -अमेरिकन महिला राजकारणी आहेत आणि पहिल्या मुस्लिम महिला राजकारणी आहेत. त्यांच्याबद्दल आज बोलायचं कारण काय? असा प्रश्न सहाजिकच विचारला जाऊ शकतो. त्याचं कारण पण विशेष आहे. या ओमर बाईनी अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेजेन्टटेटीव्ह मध्ये भारताविरुद्ध ठराव मांडला आहे. काय आहे हा ठराव? ओमर यांचं म्हणण आहे की भारतामध्ये सतत आणि सारख मानवी हक्कांचं उल्लंघन होतं आहे. त्यांच्या मते भारतातल्या मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, दलित तसंच आदिवासी आणि इतर अल्पसंख्याक समाजामधल्या लोकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे. हा ठराव ओमर यांनी अमेरिकी कॉँग्रेसवूमेन रशिदा तालिब आणि युआन वर्गा यांच्या मदतीने हाऊसमध्ये मांडला आहे.

ओमर यांनी भारताला “कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न” या इतर देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी हा ठराव मांडला आहे. याचा अर्थ काय? हे जाणून घेण्यासाठी “कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न” हा काय प्रकार आहे हे जाणून घेऊयात! कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न म्हणजे अमेरिकी राष्ट्रपतीच्या अधिकृत अधिकाराअंतर्गत, अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवाने, ज्या देशाने ‘इंटरनॅशनल रीलीजियस फ्रीडम अॅक्ट’ या कायद्यानुसार ज्या देशाने अल्पसंख्याक समाजाच्या मानवी हक्कांचं उल्लंघन केलं आहे अश्या देशाला कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न या वर्गवारीत समावेश करण्याचा अधिकार प्राप्त होतो. अल्पसंख्याक समाजाच्या मानवी हक्कांचं उल्लंघन म्हणजे त्यामध्ये टॉर्चर, अमानविय शिक्षा, विचार न करता डांबून ठेवणे, लोकाना अक्षरशः गायब करणे म्हणजे किडण्याप करून नाहीस करणे इत्यादि गोष्टी ज्या देशात होत असतील त्या देशावर आर्थिक निर्बंध लादण्याचा अधिकार अमेरिकेला प्राप्त होतो. अर्थात इथे हे नमूद करायला पाहिजे की अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवाना हा ठराव मानणं आणि त्यानुसार कारवाई करणं बंधनकारक नाही. 

भारताचा या अश्या प्रकारच्या देशांच्या यादीत समावेश करावा जेणेकरून भारतावर निर्बंध लादता येतील असा विचार या ठरावामागे आहे हे स्पष्ट आहे. या यादीतले इतर देश म्हणजे कोमोरोस, क्युबा, निकारागवा आणि रशिया हे आहेत. या प्रकारच्या ठरावामद्धे असा उल्लेख आहे की भारताचा सलग तीन वर्ष या कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न यादीत समावेश करावा आणि भारतावर निर्बंध लादावेत. हा ठराव अमेरिकेच्या फॉरिन अफेअर्स कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर काय तो निर्णय होईल. आता थोडं ओमर यांच्याविषयी बोलूयात.

इलहान ओमर आणि वादविवाद हे समीकरणच आहे. ओमर यांचा जन्म आफ्रिकेतल्या सोमालिया देशातल्या मोगादीशू इथला. वडील सोमाली सैन्य दलात होते. ओमर यांच्या आईंचं निधन इलहान २ वर्षाच्या असताना झालं. इलहान यांना मग त्यांच्या आजोबानी आणि वडीलानी सांभाळलं. सोमालियात गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर तिथून ओमर कुटुंबाने सोमालीया सोडून अमेरिकेत आश्रय  घेतला. हे साल होतं १९९५! पुढे शिक्षण, आणि राजकारणातला प्रवेश असा त्यांचा सगळा प्रवास या दरम्यान झाला. इलहान यांचे आजोबा अमेरिकेत कधी कधी राजकीय सभांना जायचे तेंव्हा इलहान या त्यांच्यासोबत जायच्या... ! इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला चालना मिळाली असं आपण म्हणू शकतो.

इलहान ओमर आणि वादविवाद हे समीकरण आहे हे म्हणण्यामागे ठोस स्वरूपात तश्या गोष्टी घडल्या आहेत. ओमर यांनी सौदी अरेबिया तसंच चीन मधल्या अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने बोलताना मानवी हक्कांचं या दोन देशांकडून उल्लंघन होत आहे असे आरोप केले. त्यांनी सिरियातल्या आसाद रेजीम (सरकार) वर टीका केली. त्यानी ट्रंप यांच्यावर टीका केली आणि इराणच्या बाजूने बोलताना मत व्यक्त केलं, थोडक्यात इराणच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा दिला. हे झालं मानवी हक्कांविषयी. ओमर यानी इजराईलच्या पॅलेस्टाईन धोरणावर वेळोवेळी टीका केली आहे. त्यांचा अमेरिकेतल्या ज्यू लॉबीला विरोध आहे आणि एकूणच इस्राइलला विरोध आहे. तसंच LGBTQ समाजाला त्यांनी पाठिंबा दिलं आहे, मग ते पॅलेस्टाईन गट का असेना. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर कडाडून टीकासुद्धा त्यांनी केली आहे. त्यांच्या मते अमेरिकेला इतके मिलिटरी बेसेस ते पण जगात सगळीकडे असण्याचा काय उपयोग आहे... कर भरणाऱ्यांचा पैसा हा मिलिटरीसाठी वापरला जातो, म्हणून इलहान यांनी या अमेरिकेच्या सैनिकी धोरणावर टीका केली आहे.

हे सगळं एका बाजूला ठेवून ओमर यांच्या भारताविषयी भूमिका पाहुयात... ! जेंव्हा जेंव्हा भारताबद्दल अमेरिकेत कॉँग्रेशनल हिअरिंग चा मुद्दा उपस्थित झाला तेंव्हा तेंव्हा इलहान ओमर यांनी भारताच्या धोरणबद्दल निषेध नोंदवला तसंच खोचकपणे भारताविरुद्ध भूमिका घेतली. हे त्यांचे पूर्वग्रहदूषित म्हणजे बायस मत होते. भारत पाकिस्तान मुद्द्यावर ओमर यांनी सतत पाकिस्तानची बाजू उचलून धरली. पाकिस्तानच्या मानवी हक्क धोरणांबद्दल का ओमर बोलल्या नाहीत? का पाकिस्तान मध्ये अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने भूमिका घेतली नाही... ? जसे भारतामध्ये अल्पसंख्याक आहेत तसेच पाकिस्तानमध्येही आहेत मग भारताला वेगळी ट्रीटमेंट आणि पाकिस्तानला वेगळी ट्रीटमेंट अशी भूमिका का... ? हे अनाकलनीय आहे. बरं कहर म्हणजे एप्रिल महिन्यात ओमर बाई पाकव्याप्त काश्मीरला भेट देऊन आल्या आणि भारताविरुद्ध गरळ ओकली. भारताने त्यांच्या या भेटीबद्दल कडक शब्दात निषेध नोंदवला आणि याबद्दल आक्षेप सुद्धा घेतला आहे.

इलहान ओमर यांचं द्वेषाचं राजकारण यातून दिसून येत. एकीकडे मानवी हक्कांबद्दल सजग असणाऱ्या ओमर दुसरीकडे मानवी हक्क डावलले जात आहेत अश्या पाकिस्तानबद्दल गप्प तसंच, भारतालाच यावर सुनवणे आणि सतत भारताविरुद्ध भूमिका घेणे हे कितपत योग्य आहे हे त्यांनीच ठरवावे. शेवटी सांगायचं म्हणजे भारताला नामोहरम करणे ही भूमिका सोडून उघड्या डोळ्यांनी जर ओमर यांनी पाहिलं तर त्यांची भूमिका ही कशी पूर्वग्रहदूषित आहे हे त्यांच्याच लक्षात येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची भूमिका ही अमेरिकेची भूमिका नाही. असं जरी असलं तरी भारत – अमेरिका संबंध मजबूत होत असताना भारताबद्दल अश्या प्रकारच्या पूर्वग्रहदूषित मत व्यक्त करणाऱ्या अमेरिकी राजकारण्यांच्या भूमिकेवर अमेरिकी प्रशासनाने लक्ष घालावं.   

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...