मुख्य सामग्रीवर वगळा

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

 मुक्त व्यापार.

व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे.

मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाहरणार्थ, व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे म्हणतात कि दोन देशांनी व्यापार करताना आयात केलेल्या वस्तूंवर कर लादले पाहिजेत, आणि निर्यात होणा-या वस्तूंवर अनुदान दिले पाहिजे. प्रत्यक्ष पाहता ह्या गोष्टी सदा सर्वकाळ शक्य नाहीत. म्हणजेच मुक्त व्यापारात हि कररुपी बंधने अजिबात नसतात, या संकल्पना पाश्चिमात्य जगाने अगदी सहज स्वीकारलेल्या आहेत, आणि त्यांचा असा दावा आहे कि मुक्त व्यापारामुळेच आमचे भले झाले आहे, आमची भरभराट झाली, प्रगती झाली ई. दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारा मुक्त प्रवेश. व्यापारी संरक्षणाच्या बाजूचे लोक म्हणतात कि असा प्रवेश जर दिला तर मग आमच्या उद्योगांचे काय होईल, आणि आम्ही स्पर्धेत नाही टिकलो तर आम्हाला आमचे उद्योगधंदे बंद करावे लागतील. या तीव्र स्वरूपाच्या स्पर्धेला या सगळ्या संरक्षणाच्या बाजूने असणार्या मंडळींचा बाजारातील मुक्त प्रवेशाला विरोष आहे. या उलट मुक्त व्यापाराच्या बाजूने बोलणारे म्हणतात कि कुठल्याही बंधनानशिवाय चालणारा व्यापार हा खरं व्यापार आहे, ज्यात दोघांचेहि हित आहे.

प्रोफ. जगदीश भगवती म्हणजे मुक्त व्यापाराचे कट्टर समर्थक आणि जागतिकीकरणाच्या बाजूने त्याला उचलून देणारे अर्थतज्ञ. इथे एक गोष्ट सांगायची म्हणजे, जे लोक मुक्त व्यापाराला विरोध करतात त्यांना मग त्यांच्या विरुद्ध विचारांचे लोक Anti-globalist किंवा Anti-Capitalist अश्या प्रकारची विशेषणे वापरतात. प्रोफ. जगदीश भगवती आपल्या Free Trade Today या पुस्तकात म्हणतात कि मुक्त व्यापार हि काळाची गरज आहे, आणि मुक्त व्यापारामुळेच देशांचे परिणामी सा-या जगाचे कल्याण होणार आहे आणि त्यातच आपले हित सामावले आहे. याउलट नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ प्रोफ. जोसेफ स्टीग्लीत्झ आपल्या Fair Trade for All पुस्तकात बरोबर उलट मत मांडतात. त्यांच्या मते आज मुक्त व्यापारामुळे देशांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ते सांगतात कि मुक्त व्यापार विकसित देशांना फायदेशीर ठरला तरी विकसनशील देशांना तो म्हणावा तसा फायदेशीर ठरताना दिसत नाही. यात पर्यावरणाला धोका पोहचवणारे अनेक उद्योग उभे रहात आहेत, या सगळ्यांचा सामना अनेक देशांनी एकत्र कसा कारायचा? हा कळीचा मुद्दा आहे. प्रोफ. जोसेफ स्टीग्लीत्झ म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नाही तर ते खुद्ध वल्ड बँकेत प्रमुख अर्थतज्ञ होते. म्हणजे त्यांच्या मतांना आज किंमत हि आहेच. गंमत म्हणजे प्रोफ. भगवती आणि प्रोफ. स्टीग्लीत्झ हे एकमेकांचे विरोधक असणारे मात्र एकाच कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत.

आज मुक्त व्यापार एका नव्या दिशेने जाताना आपल्याला पहिला मिळेल. मुक्त व्यापारातील पुढचे पाउल म्हणजे मुक्त व्यापाराचे करार. हे करार दोन देशात किंवा अनेक देशात मिळूनसुद्धा होऊ शकतात. यामध्ये एकमेकांनी आतापर्यंत वस्तूंवर लादलेले कर रद्द करणे मग या अनेक वस्तू असतील अथवा ठराविक वस्तु असतील, तसेच मुक्त व्यापार क्षेत्र घोषित करणे आणि आयात निर्यातीला चालना देणे अश्या प्रकारच्या ठरावांचा समावेश असतो.

मुक्त व्यापाराची संकल्पना प्रकाशात येण्याचे करण म्हणजे अॅडम स्मिथ चे The Wealth of Nations हा ग्रंथ. ह्या पुस्तकाला अर्थशास्त्रात एक परमोच्च असे स्थान आहे. अश्या ह्या मुक्त व्यापार संकल्पनेला येणारा काळ उज्वल आहे करण अनेक देश मुक्त व्यापारचे समर्थन करत आहेत आणि स्वताच्या अर्थव्यवस्था जगाला खुल्या करत आहेत.

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...