मुख्य सामग्रीवर वगळा

अर्थशास्त्रातील विचारप्रवाह- 1

 मर्कनटॅलीजमचा उदय !

 

ब-याच लोकांना अर्थशास्त्र म्हणजे फारच काहीतरी भयंकर वाटतं. काही अंशी ते खरं जरी असलं तरी अगदी ते न कळण्या इतपत अवघड नाही. हं जर आपण अर्थशास्त्रात गणित आणि संख्याशात्राचा वापर करून मोडेल्स तयार करायची म्हटलं तर ते थोडं अवघड काम आहे. अर्थशास्त्राचे अनेक प्रकार आहेत, अंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, व्यष्टी अर्थशास्त्र (Micro Economics), समष्टी अर्थशास्त्र (Macro Economics), गणितीय अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र ई. आता अर्थाशास्त्राचे वेगवेगळे प्रकार आहेत असं म्हटल्यावर त्यात विविध विचारप्रवाहसुद्धा आलेच.

 

यातलाच एक प्रमुख विचार प्रवाह म्हणजे मर्कनटॅलीजम ! मर्कनटॅलीजम हा प्रकार सोळावे शतक ते अठरावे शतक या दरम्यान मुख्यत्वेकरून युरोपात लोकप्रिय झाला. या मर्कनटॅलीस्ट लोकांचे साचेबद्ध असे विचार होते. व्यापार करून सोने चांदी भरपूर प्रमाणात साठवून श्रीमंत होण्याकडे त्यांचा कल होता. मर्कनटॅलीजमच्या वैशिष्ट्यांमध्ये अनेक गोष्टी सांगता येतील. यात वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या वसाहती निर्माण करणे, मक्तेदारी निर्माण करणे, त्याच प्रमाणे निर्यातीला अनुदान देणे आणि आयातीवर निर्बंध लादणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. मक्तेदारी म्हणजे एकाच व्यक्तीने अथवा एकाच कंपनीने एखादी वस्तू तयार करणे आणि ती बाजारात विकणे. आजच्या भाषेत सांगायचे झालं तर अर्थशास्त्रात Protectionism चा प्रसार प्रचार करणे.

 

मर्कनटॅलीजम चा प्रमुख उद्देश म्हणजे पाहिजे तशी आणि पाहिजे तिथून संपत्ती गोळा करणे आणि त्यातून मग देशाचे रहाटगाड चालवणे. आता हि संपत्ती कुठून गोळा करायची तर आपल्या देशाच्या वसाहतींमधून. यात अजून एक डावपेच म्हणजे सोनं चांदी तर मिळवायचं पण हि संपत्ती या वसाहतींच्या बाहेर जायला नको म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादायचे. अत्यंत योग्य उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याच देशाचे उदाहरण देता येईल. ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं. ते आले भारतात कशासाठी तर व्यापारासाठी, मग इथे त्यांनी इस्ट इंडिया कंपनीचा कारभार सुरु केला, हळू हळू इस्ट इंडिया कंपनी बंद केली आणि मग व्यापार सोडून मग समजा भारताला वसाहत बनवलं तर काय हरकत आहे, असा विचार मग पुढे आला. त्यात राजसत्ता आली, गुलामी आली, शिक्षणपद्धती आली, अश्या अनेक गोष्टींचा अंतर्भाव झाला आणि एक प्रकारची सरमिसळ होऊन आधुनिक भारताचा उदय झाला. या संदर्भात दादाभाई नवरोजी यांची Drain Theory हे अत्यंत बोलके उदाहरण आपल्यासमोर आहे.

मर्कनटॅलीजम चा उदय हा प्रथम फ्रांस मध्ये झाला. मर्कनटॅलीस्ट विचारांमध्ये महत्वाचे योगदान दिले असे म्हणजे टोमास मन, जोन लॉक, विलीअम पेटी, डेविड हुम आणि रिचर्ड कँटीलान. यातले सगळेच थोर अर्थतज्ञ होते. विलीअम पेटी म्हणजे ज्याने अर्थशास्त्रामध्ये गणिताचा वापर केला. या सगळ्या मंडळींचं योगदान महत्वाचे आहे. पण कालांतराने यांना विरोध करणारे अर्थशास्त्राच्या इतिहासात अजरामर होणार होते. या विरोध करणाऱ्या व्यक्तींचे हेच म्हणणं होतं कि व्यापारावर बंधने लावून व्यापार कधीच करता येणार नाही आणि ते योग्यही होणार नाही. ट्रेड सरप्लस असणे हे कसं चुकीचं आहे हे मग या इतर महान लोकांनी जगाला दाखवून तर दिलच पण पटवूनही दिलं. असं हे मर्कनटॅलीजम काही काळापुरता जगभर पसरल आणि मग यांना विरोध सुरु झाला आणि त्यांची जागा आता फिजीओक्रॅत्सनी घेतली.

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...