मुख्य सामग्रीवर वगळा

डोकं चक्रावून टाकणारे हे आहेत ५ विरोधाभास!

 मानवी जग हे विरोधाभासांनी व्यापून गेलं आहे... आजही जगात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपण फक्त अनुभव घेऊ शकतो, पण त्या मूर्त स्वरुपात आम्हाला दाखवा असं जर कोणी सांगितलं तर आपल्याला दाखवता येणार नाहीत. म्हणजे आपल्याला कोणी जर सांगितलं की आजूबाजूला हवा आहे का किंवा प्राणवायू आहे का तर आपण पटकन म्हणू हो आहे पण तो जर दाखवायची वेळ आली तर मात्र त्याचं रूप आपल्याला दिसणार नाही पण अनुभवता येईल. ही झाली एक गोष्ट... अश्याच प्रकारे आज अनेक गोष्टी अश्या आहेत ज्या विरोधाभासी आहेत, ज्याला तर्कसंगती काहीच नाही. त्या अस्तित्वात आहेत का आणि कश्या आहेत याबद्दल सुद्धा आपल्याला ठोस अश्या स्वरूपाचं कारण देणं अवघड आहे. असे महत्वाचे 5 विरोधाभास आहेत, अमान्य तर्क किंवा ज्याला आपण पॅराडॉक्स असं म्हणू शकतो या बद्दल आपण आज जाणून घेऊयात.

1.लायर्स पॅराडॉक्स (Liar’s Paradox)

म्हणजे एखादी व्यक्ति म्हणत असेल की ती नेहमी खोटं बोलते, तर ती जे बोलते आहे त्याला आपण ती व्यक्ति खोटं बोलते आहे असं विधान नाही करू शकत... म्हणजे ती व्यक्तिचं तिच्या तोंडून सांगते आहे की ती नेहमी खोटं बोलते आहे हेही तीच सांगते आहे म्हणजे ती असं बोलून हेच सिद्ध करते आहे की ती जे बोलते आहे ते खोटं नाही, अर्थात ती सत्यच बोलते आहे ... म्हणजे तिच्या बोलण्यात विरोधाभास आहे. याला लायर्स पॅराडॉक्स असं आपण म्हणू शकतो.

2.ओम्निपोटन्स पॅराडॉक्स (Omnipotence Paradox)

ओम्निपोटन्सचा अर्थ होतो सर्वशक्तिमान... यानुसार देव हा सर्वशक्तिमान आहे. आणि देव असा मोठा दगड निर्माण करू शकतात की तो जगात कोणीच उचलू शकत नाही, खुद्द देव पण नाही. पण इथे आपण म्हणतो आहोत की देव तर सर्व शक्तिमान आहे, मग तो दगड उचलू शकत नसेल तर तो शक्तिवान आहे तरी कसा? याउलट जर देवाने असा दगड निर्माण केला आहे की तो दगड देव उचलू शकतो... म्हणजे देव असा दगड निर्माण करू शकत नाही की जो कोणीच उचलू शकणार नाही, म्हणजे दोन्ही विधानं परस्पर विरोधी आहेत, म्हणजेच विरोधाभासी आहेत. याला ओम्निपोटन्स पॅराडॉक्स असं म्हणतात.

 3. पॅराडॉक्स ऑफ द कोर्ट (Paradox of the Court)

   पॅराडॉक्स ऑफ द कोर्ट हा विरोधाभास न्यायपालिकेशी निगडीत आहे. एकदा एका मुलाला वकिलीचं शिक्षण घेऊन वकील बनायच असतं. पण त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात. तो एका प्राध्यापकाकडे जातो आणि त्यांना सांगतो, की मला वकिलीचं शिक्षण द्या, पण माझ्याकडे पैसे नाहीत. मुलगा प्राध्यापकांना म्हणतो की तो जी पहिली केस लढवेल आणि ती केस जिंकेल त्यातून तो प्राध्यापकला त्यांची फी देईल. प्राध्यापक हो म्हणतात आणि त्याला वकिलीचं शिक्षण देतात. तो परीक्षेत उत्तीर्ण होऊन वकील बनतो. पण तो एकही केस लढवत नाही. प्राध्यापक त्याला त्यांची फी मागतात. आधी ठरल्यानुसार केस लढवून जिंकली तरच तो फी देणार असतो. शेवटी प्राध्यापक कोर्टात त्या मुलावर खटला दाखल करतात. प्राध्यापक म्हणतात मी ही केस जिंकलो तरीही त्याला मला पैसे द्यावे लागतील आणि मी केस हरलो तरीसुद्धा त्याला मलाच पैसे द्यावे लागतील. यावर तो मुलगा म्हणतो की मला प्राध्यापकाना  पैसे द्यायची गरजच नाही, मी केस जिंकलो तरीही आणि हरलो तरीही अश्या प्रकारे प्राध्यापक आणि मुलगा दोघेही इथे विरोधाभास निर्माण करतात.

4.ग्रँडफादर पॅराडॉक्स (Grandfather Paradox)

हा विरोधाभास टाइम ट्रॅवलशी संबंधित आहे. या विरोधाभासानुसार जर एखादी व्यक्ति तिच्या आजोबांना भूतकाळात भेटायला गेली आणि तिने तिच्या आजोबांना मारलं, तर तिच्या वडिलांचासुद्धा जन्म होणार नाही आणि त्या व्यक्तीचासुद्धा जन्म होणार नाही. असं घडुच शकत नाही. त्यामुळे हे शक्य नाही. जर त्या व्यक्तीचा जन्मच झाला नाही तर ति व्यक्ति तरी भूतकालात जाऊन कसं काय कोणाला मारू शकते... हा विरोधाभास इथे आहे.

5.स्मूलियन पॅराडॉक्स (Smullyan’s Paradox)

हा एक चमत्कारिक विरोधाभास आहे. असं समजूया की A B आणि C हे तीन मित्र वाळवंटात सहलीला म्हणून जातात. काही कारणास्तव A आणि B ला C आवडत नाही. आता A आणि B त्यांच्या स्वतंत्र इच्छेनुसार C मारण्याची योजना आखतात. A ही व्यक्ति C च्या पाण्याच्या बाटलीत विष घालते. यामुळे सहलीत फिरायला गेल्यानंतर तहान लागल्यावर विष टाकलेलं पाणी पिऊन C च मृत्यू होईल. ही A ची योजना B ला माहिती नाही. B त्याच्यानुसार C ला मारण्याची योजना तयार करतो. यानुसार तो A च्या पाण्याच्या बाटलीला भोक पडतो, जेणेकरून पाणी वाहून, संपून जाऊन आणि डिहायड्रेशनने C चा मृत्यू होईल. योजना तयार झाल्यानंतर तिघेही आपआपल्या प्रवासाला स्वतंत्रपणे निघतात. पुढे C चा पाणी न मिळाल्याने मृत्यू होतो. यानंतर पोलिस येतात, पंचनामा करतात आणि त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहतो की या C च्या मृत्युला जबाबदार कोणाला धरायचं? आता A म्हणतो C ने मी पाण्याच्या बाटलीत विसळलेलं विष प्यायलाच नाही, म्हणून मी गुन्हेगार नाही... आता एकडे B म्हणतो मी C ला भरलेल्या पाण्याच्या बाटलीला भोक पाडल्यामुळे त्याला मी विष पिण्यापासून वाचवलं. यासगळ्या खटाटोपीत C चा तर मृत्यू झाला तर आता खरा गुन्हेगार कोण हा प्रश्न कायद्यासमोर उभा राहतो आणि इथे विरोधाभास निर्माण होतो.

तर असे हे पाच विरोधाभास आहेत... ज्याच्याबद्दल तर्क लावणं हे केवळ कठीण काम आहे. माणसाने या पाच गोष्टींबद्दल विचार केला तरीसुद्धा त्याचं डोकं चक्रावून जाईल किंवा त्याला तर्क लावता येणार नाही... त्याचं मन बुचकळ्यात पडेल आणि त्याची बुद्धी काम करेनाशी होईल. आहेत की नाही हे विरोधाभास विचार करायला लावणारे...!

-निखिल कासखेडीकर 

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे.)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह