मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रीसचं काय होणार?

ग्रीस हा दक्षिण पूर्व युरोप मधला देश. या देशाला हेलनिक रिपब्लिक असं म्हणतात. ग्रीस ही  पाश्चिमात्य संस्कृतीची आद्यभूमी! ग्रीक संस्कृती ही पूर्वापार चालत आलेली संस्कृती आहे. ग्रीसची जगाला महान देणगी आहे. ग्रीसने जगाला लोकशाही, तत्वज्ञान, साहित्य, ऑलिम्पिक खेळ, पाश्चिमात्य नाटक आणि राजकारण या सगळ्याची ओळख करून दिली. जिथे सॉक्रेटीस, प्लेटो आणि अॅरिस्टॉटल सारख्या महान व्यक्ती एकेकाळी समाजाला दिशा देत होत्या ती भूमी म्हणजे ग्रीकांची भूमी. जिथे हिरोडोटस आणि थुसीडाइड्स सारखे महान इतिहासकार होऊन गेले त्यांची भूमी म्हणजे ग्रीस. सर्वच क्षेत्रात सरस कामगिरी बजावणाऱ्या ग्रीसबद्दल खूप सांगण्यासारखे आहे. पण ग्रीसची आजची परिस्थिती काही चांगली नाही. आर्थिक दिवाळखोरी घोषित करावी लागणार की काय या चिंतेत सारे ग्रीसवासी सापडले आहेत. कारणही तसंच आहे.    अमेरिकेत २००८ साली आर्थिक महामंदी आली तेंव्हापासून ग्रीसमध्ये याची कुणकुण  लागली. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनुसार जेवढी जागतिक महामंदी ग्रीसच्या आर्थिक समस्येला जबाबदार आहे तेवढाच ग्रीस सुद्धा सद्य परिस्थितीला जबाबदार आहे. ग्रीसबद्दल आज बोलायचं कार

सौदी अरेबियाचे भविष्य अंधारात?

‘तेल’ भूमी म्हणजे सौदी अरेबिया! जगातला सगळ्यात ज्यास्त तेल उत्पादन करणारा देश म्हणून सौदी अरेबियाचं नाव घेतल जायचं. सौदी अरेबियाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या देशाला दिलं गेल्याचं इतिहासातलं हे एकमेव उदाहरण! इब्न सौद यांच्या नावावरून या देशाला सौदी अरेबिया असं नाव पडलं. या तेलसंपन्न देशाने तेलाच्या जोरावर जगातल्या सगळ्या देशांना एके काळी वेठीस धरल होतं. वेळेप्रसंगी तेलाचा अस्त्र म्हणून वापर केला. दोन मोठ्या तेल संकटांचा हा देश साक्षीदार आहे. एक म्हणजे १९७३ ला झालेलं तेल संकट आणि दुसरं म्हणजे १९७९ झालेलं तेल संकट. अमेरिका आणि तिचे सहकारी युरोपीय देश यांना सौदी अरेबियाने या तेल संकटांमध्ये चांगलाच धडा शिकवला, इतका की अमेरिकेसकट या देशांनी सौदीचा धसकाच घेतला. अशी ही सौदी अरेबियाची महती! पण या तेल संपन्न देशात आता वेगळेच वारे वाहू लागले आहेत. पूर्वीसारखं तेल आता साथ देईल कि नाही याची शंका येत आहे. याचं कारण म्हणजे सौदी अरेबियाची बिकट झालेली आर्थिक परिस्थिती. सौदी अरेबियाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याचं कारण जगातल्या तेल बाजारात