मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गाम्बियाची लोकशाहीकडे वाटचाल!

गाम्बिया एक आकारमानाने छोटासा पश्चिम अफ्रिकन देश. उत्तर, पूर्व आणि दक्षिण बाजूंनी सेनेगल या देशाने वेढलेला आणि पश्चिमेला अटलांटिक महासागराचा किनारा. गाम्बियाबद्दल तसं आज बोलायचं कारण म्हणजे गाम्बियाची लोकशाहीकडे सुरु असलेली वाटचाल. गाम्बियाचं अधिकृत नांव इस्लामिक रिपब्लिक ऑफ गाम्बिया! तसं ते झालं २०१५ साली. साधारणतः अफ्रिकन देशांमध्ये एकाधिकारशाही रुजलेली आहे. यादवीचा सगळ्या अफ्रिकन देशांना जणू शापच आहे. त्यात कहर म्हणजे सैनिकी हुकुमशाहीचे अस्तित्व! जोडीला कमालीचे दारिद्र्य, अविकसितता, हलाखीचे जीवन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहाही दिशांना गुलामगिरीचा काळा इतिहास. हे सगळं असं आयुष्य जगणं म्हणजे कठीणच. एकूणच अफ्रिका खंडातले देश मागासलेले आहेत. आर्थिक विकास कुठेच झाला नाही. आर्थिक विकास झाला नसल्यामुळे हुकुमशाहांचे फावले. सैनिकी बळावर सत्ता काबीज करणे आणि सामान्य जनतेला दारिद्र्यात ठेवणे अशी ही हुकुमशाहीची तेवढीच काय ती देणगी! विकसित राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणावर मदत घायची आणि ती सगळी मदत सामान्य जनतेला वेठीस धरण्यासाठी शस्त्रास्त्रांच्या रुपात वापरायची. हे ह्यांचे उद्य

चीनचा जळफळाट !

आं तरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेतली अध्यक्षपदाची निवडणूक या विषयावर खूपच चर्चा झाली. कारण जे वाटलंही नव्हतं असे परिणाम बाहेर आले. खुद्द ट्रम्प यांना स्वप्नांत देखील वाटलं नव्हतं की ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत निवडून येतील. विशेषतः अमेरिकेतली प्रसारमाध्यमे हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने कौल देत होती. एक वेळ अशी आली होती की मेनस्ट्रीम मिडिया हिलरी यांच्या बाजूने जणू उभाच होता. कसे ट्रम्प यांना बदनाम करता येईल याचीच अमेरिकी मिडिया वाट पाहत होता. ट्रम्प कसे आहेत? त्यांचा राजकारणातला अनुभव किती? किंवा त्यांना रशियाने निवडून येण्यास मदत केली का? हे इथे सर्वतोपरी वेगळे मुद्दे! शेवटी ट्रम्प यांच्या बाजूने निकाल आला. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची त्यांनी नुकतीच शपथ घेतली. अमेरिकेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. हे सगळं काही ठीक असल तरी, एका देशाला मात्र ट्रम्प राष्ट्रपती म्हणून पचनी पडत नाहीयेत. तो देश म्हणजे महाकाय चीन! याचं कारणही तसंच आहे. दक्षिण चीनी समुद्रात अमेरिकेचे धोरण बदलण्याची शक्यता. ओबामांच्या काळात मागची आठ वर्ष अमेरिकेने वेट अँड वॉच असे धोरण ठेवले होते, प्रसंग

ओबामांची आठ वर्ष!

बराक हुसेन ओबामा...अमेरिकेच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होऊन इतिहास घडवणारा राष्ट्रपती. त्यांचा कार्यकाल या २० जानेवारीला संपतो आहे. त्यांनी यशस्वीरीत्या दोन टर्म पूर्ण केल्या आहेत. राष्ट्रपती म्हणून दोनदा कार्यकाल पूर्ण करणे आणि तो यशस्वीरीत्या पूर्ण करणे यामध्ये फरक करणे आवश्यक आहे. ओबामांची कारकीर्द पाहता त्याकडे एक अत्यंत संतुलित प्रतिक्रिया द्यायची असल्यास संमिश्र अशीच द्यावी लागेल. ओबामा सत्तेत आले तेंव्हाचा कालावधी आठ वर्षापूर्वीचा. तेंव्हा इराक आणि अफगाणिस्तान युद्धाची जोरदार चर्चा होती. आधीचे राष्ट्रपती धाकटे बुश साहेब यांनी युद्ध सुरु केले ते दोन देशात अफगाणिस्तानात आणि इराकमध्ये. अफगाणिस्तानचे युद्ध हे ओसामाला पकडण्यासाठी होते तर इराकमध्ये वेपन्स ऑफ मास डीष्ट्रक्शन आहेत म्हणून. २००१ ला वल्ड ट्रेड सेंटर पाडून अल कायदाने अमेरिकेला आणि परिणामी जगाला मोठा हादरा दिला. यातून सावरण्यासाठी काही तरी केले पाहिजे या इर्षेने पेटून धाकट्या बुश साहेबांनी अफगाणिस्तानात मित्र राष्ट्रांसोबत अमेरिकी फौजा घुसवल्या. हे कमी म्हणून की काय सद्दामला इराक़मध्ये पकडण्यासाठीसुद्धा अमेरिकी

रशियन हेरखात्याचे पुनरुत्थान!

हेरांबद्दल आणि हेरकथांबद्दल सामान्य व्यक्तीला सतत आकर्षण वाटत आल आहे. आपल्याला सर्वाना परिचित अश्या इयान फ्लेमिंगच्या “जेम्स बॉंड” या पात्राबद्दल, एकंदरीतच जनमानसात खूपच कुतूहल आहे. अश्या हेरगिरीच्या घटना प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा घडत असतात. फक्त त्या अगदी बॉंडपटातल्या सारख्याच घडतील असं नाही. हेर विश्वातली अशीच एक महत्वाची घटना घडली थेट अमेरिकेत, आणि ती पण रशियन हेरांकडून. यांवर अमेरिकेच्या सी आय ए ने, एक मोठा अहवालच बनवला आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत थेट हस्तक्षेप करून राष्ट्रपती होऊ घातलेले डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी केले असा आरोप निश्चित करून, ३५ रशियन मुत्सद्द्यांना त्यांच्या कुटुंबासकट परत रशियात धाडले. अमेरिकेतल्या  राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणूकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. त्यात राष्ट्रपतीपदासाठी दोन प्रमुख उमेदवार होते, डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून  तर हिलरी क्लिंटन डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणुकीत उभे होते. अमेरिकी प्रसार माध्यमांनी हिलरी क्लिंटन निवडून येणार असे जोरकसपणे सांगितले. थोडक्यात निवडणुकीत हिलरींची हवा होती, पण झाले उलट