मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय विमान अपहरणात तालिबानचा सहभाग...!

  दिनांक 24 डिसेंबर 1999... वेळ संध्याकाळी 5.20 ... नाताळच्या आधीचा दिवस...थंडीत गुरफटलेली ती एक नवी दिल्लीतली संध्याकाळ होती.. उन्हं कललेल होत नि साऊथ ब्लॉकमधील आपल्या कार्यालातून निघत असतांनाच परराष्ट्रमंत्री श्री जसवंत सिंह यांच्या टेबलावरचा फोन खणखणला.. आजूबाजूच्या शांत वातावरणात त्यांना तो आवाज फारच मोठा वाटला.. त्यांनी रिसिव्हर उचलून कानाला लावला... ‘ इंडियन एयरलाईन्सच्या  आपल्या IC 814 या काठमांडू ते नवी दिल्ली विमानाचे अपहरण झाले आहे ’ ..पलीकडून काळजीयुक्त आवाजात कोणीतरी सांगत होत. ही बातमी कानावर पडताच ते चिंताग्रस्त झाले.... ही अपहरणाची बातमी त्यांना अशुभ वाटू लागली... यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे त्यांना कळत नव्हते. या अपहारणमागे कोणाचा हात आहे हे स्पष्ट होत नव्हतं. पण जसाजसा वेळ गेला , तसतशी अधिक माहिती येऊ लागली.. एक निश्चित होत , या सगळ्यामागे तालिबानचा हात आहे... तालिबान म्हणजे त्यावेळेस अफगाणिस्तानात ज्यांचं शासन होतं ती मंडळी... पण त्यांच्या बरोबर भारताचे कुठलेच राजनैतिक संबंध नव्हते...    नक्की काय झालं... ? 24 डिसेंबर 1999 ला संध्याकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह

'ए ब्युटीफुल मायिंड' अर्थात जॉन नॅश !

  काल सगळ्या आंतरराष्ट्रीय मिडीया वर एक दु:खद बातमी झळकून गेली. बातमी होती, एक व्यक्ती आणि त्याच्या पत्नीचा अमेरिकेतल्या न्यू जर्सीमध्ये कार अपघातात मृत्यू. ही व्यक्ती म्हणजे जॉन नॅश. जॉन नॅश बद्दल फारस लोकांना माहिती असण्याच कारण नाही. जॉन नॅश हे नाव मुळात अर्थशास्त्राशी निगडीत असलेल. तसंच गणितीय जगात सुद्धा हे नाव परिचित असेल. पण सामान्य माणसाला हे नाव नवीन आहे. आता हा जॉन नॅश कोण? असा काही लोकांना प्रश्न पडला असेल. जॉन नॅश ही तशी असामान्य बुद्दीमात्तेची व्यक्ती. त्यांच्या घरात पहिल्यापासून शिक्षणाला उत्तेजन देण्याचे वातावरण होते. आई वडील दोघेही शिकलेले. सुरवातीला पिट्सबर्ग विद्यापीठात शिक्षण घेऊन मग जॉन यांनी गणिताकडे आपली गाडी वळवली. त्याधी त्यांनी रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले. मग पुढे जाऊन प्रीन्स्टन या नामांकित विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 'गेम थिअरी' विकसित केली. याच त्यांच्या गेम थिअरीला अर्थशास्त्रातले 'नोबेल' मिळाले. हि गेम थिअरी व्युव्हात्मक निर्णयाशी जोडली गेली आहे. या गेम थिअरीत दोन अत्यंत हुशार व रॅशनल निर्णय घेणा-या व्यक्ती एकमेकांशी सहकार्य आणि संघर्षा

अर्थशास्त्रातील विचारप्रवाह - २

  फिजीओक्रॅटस चे योगदान !   मर्कनटॅलीजमच्या विरुध्द जाणारा आणि अर्थशास्त्रात एक मुलभूत स्वरूपाचे योगदान देणारा विचार प्रवाह म्हणजे फिजीओक्रसी. हा विचार प्रवाह फ्रांस मध्ये साधारणतः अठराव्या शतकात उदयास आला. झालं अस कि मर्कनटॅलीजमची हवा ओसरू लागल्यानंतर तसच मर्कनटॅलीजमच्या नियमांचा जवळपास कंटाळा आल्यानंतर फिजीओक्रसी या वेगळ्या वाटणाऱ्या आर्थिक विचारांनी लोकांचे लक्ष वेधले. लोकांना आता सोनं चांदी गोळा करा , वसाहती स्थापन करा , संपत्ती कमवा , व्यापारावर बंधने लादा या सगळ्या गोष्टींचा अगदी कंटाळा आला होता. यातून आपली सुटका कशी होईल आणि एक नवीन आर्थिक पद्धती कशी आणता येईल यासाठी मग प्रयत्न सुरु झाले. गम्मत म्हणजे या फिजीओक्रॅटसना स्वतःला अर्थतज्ञ म्हणून घ्यायला खूप आवडे.   मर्कनटॅलीजमच्या विरुध्द आवाज उठवणारा आणि आम्हाला बंधनातून मुक्त करा असा जणू नाराच देणारी व्यक्ती म्हणजे गुर्ने. याला फिजीओक्रॅटस चळवळीचा आघाडीचा नेता म्हणता येईल. त्याची वाक्य इतिहासात खूपच प्रसिद्ध झाली आणि त्याच्या या ब्रीद्वाक्याने आधुनिक अर्थशास्त्राचा पाया रचला असं आपण म्हणू शकतो. हे ब्रीदवाक्य म्हणजे ' ल

अर्थशास्त्रातील विचारप्रवाह- 1

  मर्कनटॅलीजमचा उदय !   ब-याच लोकांना अर्थशास्त्र म्हणजे फारच काहीतरी भयंकर वाटतं. काही अंशी ते खरं जरी असलं तरी अगदी ते न कळण्या इतपत अवघड नाही. हं जर आपण अर्थशास्त्रात गणित आणि संख्याशात्राचा वापर करून मोडेल्स तयार करायची म्हटलं तर ते थोडं अवघड काम आहे. अर्थशास्त्राचे अनेक प्रकार आहेत , अंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र , व्यष्टी अर्थशास्त्र ( Micro Economics), समष्टी अर्थशास्त्र ( Macro Economics), गणितीय अर्थशास्त्र , सार्वजनिक अर्थशास्त्र ई. आता अर्था शास्त्राचे वेगवेगळे प्रकार आहेत असं म्हटल्यावर त्यात विविध विचारप्रवाहसुद्धा आलेच.   यातलाच एक प्रमुख विचार प्रवाह म्हणजे मर्कनटॅलीजम ! मर्कनटॅलीजम हा प्रकार सोळावे शतक ते अठरावे शतक या दरम्यान मुख्यत्वेकरून युरोपात लोकप्रिय झाला. या मर्कनटॅलीस्ट लोकांचे साचेबद्ध असे विचार होते. व्यापार करून सोने चांदी भरपूर प्रमाणात साठवून श्रीमंत होण्याकडे त्यांचा कल होता. मर्कनटॅलीजमच्या वैशिष्ट्यांमध्ये अनेक गोष्टी सांगता येतील. यात वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या वसाहती निर्माण करणे , मक्तेदारी निर्माण करणे , त्याच प्रमाणे निर्यातीला अनुदान देणे आण

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाहरणार

आधुनिक व्यापारातील संकल्पना -1

  व्यापारातील संरक्षण !   दोन देशांचा एकमेकांशी व्यापार ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील एक मुलभूत स्वरुपाची संकल्पना आहे. व्यापाराचे महत्व तसे जुनेच. फरक एवढाच आहे कि पूर्वी व्यापार हा समुद्र मार्गाने व्हायचा तर आज तो हवाईमार्गानेपण होतो. अनेक तज्ञांना असे पुरावे मिळाले आहेत कि भारताचा व्यापार अगदी पार इजिप्त पर्यंत पसरला होता. तिथे अनेक वस्तू उत्खननात सापडल्या आहेत आणि त्या वस्तूंवरून , त्या अस्सल भारतीय आहेत , असे समजते. आपल्या सगळ्यांना पूर्वी सिल्क रुट नामक एक मार्ग होता , ज्याने आपला आणि मध्य आशिया , विशेषतः चीनशी आपला आर्थिक व्यवहार चालायचा , हे माहित असेलच. पण आज व्यापाराचे स्वरूप जरा क्लिष्ट झाले आहे. यात अनेक विचारप्रवाह आले आहेत आणि एक विचारप्रवाह जणू आधुनिक मर्कनटॅलीजमच वाटावा असा आहे. मर्कनटॅलीजम मध्ये आपण हे पाहीलेच कि व्यापाराला संरक्षण देणे तसेच , सोने चांदी गोळा करणे आवश्यक. पण , असं करत असताना हे सोनं चांदी बाहेर जाणार नाही आणि इतर देशांना मिळणार नाही याचीहि काळजी घेणे असा स्वार्थी दृष्टीकोण या आर्थिक विचारसरणीमध्ये होता. अश्याच काही स्वरूपाचा ज्याला मर्कनटॅलीजम