मुख्य सामग्रीवर वगळा

'ए ब्युटीफुल मायिंड' अर्थात जॉन नॅश !

 काल सगळ्या आंतरराष्ट्रीय मिडीया वर एक दु:खद बातमी झळकून गेली. बातमी होती, एक व्यक्ती आणि त्याच्या पत्नीचा अमेरिकेतल्या न्यू जर्सीमध्ये कार अपघातात मृत्यू. ही व्यक्ती म्हणजे जॉन नॅश. जॉन नॅश बद्दल फारस लोकांना माहिती असण्याच कारण नाही. जॉन नॅश हे नाव मुळात अर्थशास्त्राशी निगडीत असलेल. तसंच गणितीय जगात सुद्धा हे नाव परिचित असेल. पण सामान्य माणसाला हे नाव नवीन आहे. आता हा जॉन नॅश कोण? असा काही लोकांना प्रश्न पडला असेल.

जॉन नॅश ही तशी असामान्य बुद्दीमात्तेची व्यक्ती. त्यांच्या घरात पहिल्यापासून शिक्षणाला उत्तेजन देण्याचे वातावरण होते. आई वडील दोघेही शिकलेले. सुरवातीला पिट्सबर्ग विद्यापीठात शिक्षण घेऊन मग जॉन यांनी गणिताकडे आपली गाडी वळवली. त्याधी त्यांनी रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले. मग पुढे जाऊन प्रीन्स्टन या नामांकित विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 'गेम थिअरी' विकसित केली. याच त्यांच्या गेम थिअरीला अर्थशास्त्रातले 'नोबेल' मिळाले. हि गेम थिअरी व्युव्हात्मक निर्णयाशी जोडली गेली आहे. या गेम थिअरीत दोन अत्यंत हुशार व रॅशनल निर्णय घेणा-या व्यक्ती एकमेकांशी सहकार्य आणि संघर्षात्मक   परीस्थितीत कश्या वागतात व त्याचा एकमेकांवर काय परिणाम होतो याचे गणितीय स्वरुपात केलेले विवेचन. ही झाली जॉन नॅश यांची औपचारिक ओळख.

जॉन नॅश यांना छिन्नमनस्कता म्हणजेच Schizophrenia  या विकाराने तरुण असतानाच ग्रासले होते. पण तरीही जिद्द मनाशी धरून, आपल्या विकारांवर प्रसंगी दवाखान्यात जाऊन मात केली. असं म्हणतात कि नॅश यांना 20 ते २५ वर्षे हा आजार होता. याच काळात त्यांनी नवे नवे शोध लावले. वयाची तिशी उलटेपर्यंतच त्यांनी नवीन शोध लावून एक ठोस अश्या स्वरूपाचे कार्य करून दाखवले. त्यांच्या जीवन पटावर आधारित 'A Beautiful Mind'  हा हॉलीवूडचा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात त्यांची भूमिका रसेल क्रो या हरहुन्नरी कलाकाराने केली होती. या चित्रपटाला मानाच्या ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटात छिन्नमनस्कता हा विकार काय आहे याची लोकांना जाणीव झाली. पण ह्या विकाराशी सामना करून आणि त्यात यशस्वी होऊन पुढे विकारावर मात करून, तसेच आपल्या कामात नाविन्यपूर्णतेची भर घालून देणारे जॉन नॅश ही कदाचित एकमेव अर्थतज्ञ व्यक्ती असेल.     

नुकताच म्हणजे २०१५ सालचा गणितातला आबेल पुरस्कार जॉन नॅश यांना मिळाला. भूमितीय संशोधनासाठी व त्यातील non linear partial differential equation  साठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. आबेल पुरस्कार हा नॉर्वे च्या सरकारच्या वतीने गणितात असामान्य योगदान देणार-या व्यक्तीला दिला जातो. हा पुरस्कार नील आबेल या नॉर्वेजियन गणितज्ञाच्या नावाने दिला जातो. नॉर्वे सरकारने आबेल पुरस्कार २००१ सालापासून देण्यास सुरवात केली. आबेल पुरस्काराला गणितातला नोबेल पुरस्कार असं संबोधला जातं, याचंं कारण म्हणजे तो मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे आणि तो त्या तोडीच्या व्यक्तीला देणं म्हणजे त्याचा यथोचित सन्मान करण्यासारख आहे.

जॉन नॅश यांना अर्थशास्त्रात नोबेल १९९४ साली मिळाले. नोबेल पुरस्कर व 'A Beautiful Mind' या दोन गोष्टीनी जॉन नॅश प्रकाशझोतात आले. अश्या या अर्थाशात्रातील मातब्बर व्यक्तीच्या जाण्याने अर्थाशात्रीय व गणितीय जगावर नक्कीच परिणाम होईल, यात काहीच शंका नाही. अश्या मातब्बर अर्थातज्ञाला माझ्या सारख्या एका अर्थशास्त्राच्या सामान्य विद्यार्थ्याकडून श्रद्धांजली...

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह