मुख्य सामग्रीवर वगळा

आणि ट्रॅफिक सुरू झाली – सुएझ कालवा.

 23 मार्च 2021 या दिवशी एव्हर गिव्हन हे महाकाय मालवाहू जहाज 7.40 या इजिप्तच्या स्थानिक वेळेनुसार सुएझ कालव्यात अडकून पडलं होतं. हे जहाज अगदी नाट्यमयरित्या अश्या पद्धतीने कालव्यात अडकून पडलं आणि रुतून बसलं की तिरपं झाल्यामुळे सुएझ कालवा जवळपास जलवाहतुकीसाठी जणू बंदच झाला. हे जहाज त्यावेळी मनशीयेत रुगोला या गावाजवळ कालव्याच्या किनार्‍यात अडकून बसलं. जवळपास सहा दिवस उलटून गेले तरीसुद्धा फसलेलं जहाज बाहेर काढण्यात अपयश येत होतं.



एव्हर गिव्हनला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू होते. 14 टग बोटी या मोहिमेत जुंपल्या होत्या. टग बोटींचा उपयोगच मुळी मोठ्या जहाजाना बंदराच्या क्षेत्रात त्यांचे जहाज पार्क करण्यासाठी होतो. तसच दिशा दाखवण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. तर अश्या प्रकारे या टग बोटी रात्रंदिवस असं जवळपास 6 दिवस एव्हर गिव्हनला केबल द्वारे पाण्यात आणण्यासाठी ओढत होत्या, तर काही टग बोटी एव्हर गिव्हनला अक्षरशः पाण्यात ढकलत होत्या. या टग बोटींचा वेग खूप असल्यामुळे त्या त्यांची ताकद वापरुन जहाज ओढत तरी होत्या किंवा ढकलत तरी होत्या. हे काम रात्रंदिवस सलग सहा दिवस चालू होते. या मोहिमेमधे अनेक मशीन ऑपरेटर्स, इंजिनियर्स, टग बोट कॅप्टन्स आणि ज्यांना साल्व्हेज ऑपरेटर्स म्हणता येईल अश्या सगळ्या तज्ञांची फौजच जणू काम करत होती. यासाठी जेसीबी यंत्रे वापरुन जहाजाचा पुढच्या भागात जिथे त्याचं पुढचं टोक रुतून बसलं आहे तिथली वाळू आणि चिखल हे उपसण्यात आले. पण सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली ती टेंथ ऑफ रमादान आणि मशहूर या दोन ड्रेजर जहाजांनी. ड्रेजर बोटींचं कामच मुळी पाण्यातली वाळू आणि चिखल उपसून काढून तो बाजूला करणे हे असतं. आपण कल्पना करू शकणार नाही इतकी म्हणजे 30,000 घनफुट रेती बाजूच्या भागातून उपसण्यात आली. या उपश्याची तुलना करायची झाल्यास सगळ्यात मोठे असे ऑलिंपिक स्पर्धेतले 12 पोहण्याचे तलाव भरतील इतकी माती, रेती त्यातून उपसून काढण्यात आली. वेगवेगळी तज्ञ मंडळी यासाठी अहोरात्र काम करत होती. जहाजाच्या पुढची आणि मागची अश्या दोन्ही भागातली माती उपसून पाण्यामुळे आपोआपच तिरपं असलेलं हे जहाज सरळ होईल अश्या पद्धतीने हे रेस्क्यू मिशन चाललं होतं. आपल्याला माहिती आहे की भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडण्याचं काम सुएझ कालवा करत असल्यामुळे यावेळी समुद्राच्या भरतीची म्हणजेच हाय टाईडची खूप मोठी मदत या प्रसंगी रेस्क्यू टीमला झाली. भरती म्हणजे समुद्रामधील पाणी किनार्‍याच्या दिशेने वाहणे म्हणजे या उसळणार्‍या लाटा आहे त्या जागी असलेल्या वस्तूला बाहेर किनार्‍याकडे ढकलतात. या वेळेस सुपरमून असल्याने म्हणजेच पोर्णिमा असल्याने चंद्रामुळे भरती आली आणि म्हणूनच लाटांच्या वेगाने जहाजाला ढकलण्यासाठी आणि ते जहाज हलण्यासाठी मदत झाली. या सगळ्यानंतर तिरपं झालेलं जहाज थोडं सरळ झालं म्हणजे पारशली रिफ्लोट करायला मदत झाली. त्यानंतर अथक मेहनत घेतल्यानंतर सगळ्यांना सुखावणारी बातमी आली की रेस्क्यू टीमला रुतून बसलेलं जहाज बाहेर काढण्यात यश आलं. आणि एकदाचं तिरपं झालेलं जहाज सरळ झालं.  

सगळ्या प्रयत्नांना यश येऊन अखेर 29 मार्च 2021 ला दुपारी 3.05 ला इजिप्तच्या स्थानिक वेळेनुसार हे जहाज परत पाण्यात ढकलण्यात आणि वाहतूक मोकळी करण्यात यश आलं. आणि यानंतर सुएझ कनोल अथोरीटीचे प्रमुख अॅडमिरल ओसामा राबी यांनी जाहीर केले की सुएझ कालव्यातली जलवाहतुक पूर्वीप्रमाणे सुरळीत झाली आहे आणि इजिप्तच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता जहाजांच्या आवागमनासाठी कालवा सज्ज आहे.

एव्हर गिव्हन मातीतून आणि पाण्यातून निघाल्यानंतर, पुढच्या तांत्रिक गोष्टींसाठी आणि इन्स्पेक्षनसाठी ग्रेट बिटर लेक येथे नेण्यात आले. तिथे जहाजाचे काही नुकसान झाले आहे का आणि त्यावरचा सगळा क्र्यु व्यवस्थित आहेना याचीसुद्धा तपासणी करण्यात आली.

एव्हर गिव्हन जहाज आता त्याच्या मार्गावर इछित स्थळी पोहोचत असलं तरीसुद्धा साधारणतः 400 जहाजं सुएझ कालव्याच्या दोन्ही बाजूंना अडकून पडल्यामुळे त्यांना पार करायला अजून वेळ लागेल. तसंच या सगळ्यामुळे जागतिक व्यापारावर जो काही परिणाम झाला आहे तो पूर्ववत होण्यासाठी दोन महीने तरी लागतील असा तज्ञांचा कयास आहे. यामुळे एक समस्या उभी राहणार आहे, ती म्हणजे वेगवेगळ्या बंदरात त्यांच्या जागेत जहाज पार्क करण्यासाठी अडथळे येणार आहेत. याचं कारण अनेक जहाजं एकाच वेळी बंदरात दाखल झाल्यामुळे त्यांना जहाज पार्क कुठे करायचं असा (जागेचा) प्रश्न निर्माण होईल. यासाठी थोडा वेळ लागेल.

एव्हर गिव्हन हे जहाज रुतण्यामुळे निर्माण झालेली परिस्थिति हा एक अनुभव समजून त्यापासून धडा घेतला जाऊ शकतो. भविष्यात अश्या प्रकारची समस्या उद्भवली तर काय उपाय योजना करायच्या हे सुद्धा आता जगाला कळेल आणि त्या प्रमाणे संबंधित घटक पावलं उचलतील अशी अपेक्षा आहे. जागतिक व्यापारावर परिणाम झाल्यामुळे या सगळ्याचा फटका जेव्हढा शिपिंग उद्योगाला बसला तेवढाच जलवाहतुकीला सुद्धा बसला आहे. या एका गोष्टीमुळे सुएझ कालव्याचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे आणि भविष्यात उद्भवू शकणार्‍या समस्या सोडवण्यासाठी या आलेल्या अनुभवांचा उपयोग होईल, अशी आशा करुयात.

- निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह