मुख्य सामग्रीवर वगळा

सर विन्स्टन चर्चिल - एक मुत्सद्दी राजकारणी.

 इंग्लंड ची भिस्त दुस-या महायुद्धात ज्यांच्याकडे नेविल चेम्बरलेन यांच्यानंतर सोपवली गेली आणि ज्यांनी ती कामगिरी फत्ते केली, असा हा दुस-या महायुद्धातील जगाचा शिल्पकार म्हणजे विन्स्टन चर्चिल. याच महिन्यामध्ये चर्चिल १९४० ला इंग्लंड चे प्रधान मंत्री झाले. त्यांचे पूर्ण नाव सर विन्स्टन लेओनार्ड स्पेन्सर चर्चिल. चर्चिल यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील लॉर्ड रँडोल्फ चर्चिल एक प्रभावी राजकारणी होते. ते Chancellor of the Exchequer होते, म्हणजे ज्याला आताच्या भाषेत वित्त मंत्री किवा अर्थ मंत्री म्हणता येईल. त्यांची आई जेनी जेरोम अमेरिकन सोशलाईट (फॅशन जगताशी निगडीत) होत्या. अशा अर्थाने ते एका बड्या आणि चांगल्या घरातून आले होते. 



घरातल्या राजकीय वातावरणाचा चर्चिल यांच्यावर खूप प्रभाव होता. तासंतास घरी येणा-या लोकांचे त्यांच्या वडिलांशी होत असलेले संम्भाषण ते मग्न होऊन ऐकत. इथेच त्यांच्यावर एक अस्सल राजकारणी होण्याचा संस्कार झाला.

 

चर्चिल यांनी काही काळ आर्मी मध्ये ऑफिसर म्हणून सेवा केली. त्यांच्याकडे विविध जबाबदा-या देण्यात आल्या. ते काही वर्ष भारतात देखील राहिले, नंतर ते दक्षिण आफ्रिकेला बोअर युद्धात सहभागी झाले आणि तिथे पकडले गेले, पण त्यातून देखील सहीसलामत पण कसेबसे निसटले.

 

यामुळे चर्चिल वयाच्या २४ व्या वर्षीच प्रसिद्धीच्या झोतात आले. यानंतर त्यांचे राजकीय जीवन चालू झाले. ते संसदेवर निवडून गेले आणि ३३ व्या वर्षी काबिनेट मंत्री झाले. पण त्यांना इंग्लंडचे पंतप्रधान व्हायला पुढची ३२ वर्ष वाट पहावी लागली. चर्चिल १० मे १९४० साली अत्यंत अनिश्चित वातावरणात पंतप्रधान झाले आणि दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ते पंतप्रधान पदावर राहिले. अनिश्चित अशासाठी कि वॉर्सा वर हल्ला झाल्यापासून मित्र राष्रांप ना युद्धाचा कोणाच्या बाजूने निकाल लागेल याची अजिबात माहिती नव्हती, म्हणून अश्या प्रसंगात पंतप्रधान होणं आणि देशाचं नेतृत्व करणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती.

 

असं म्हणतात की, चर्चिल यांना भारताबद्दल प्रचंड राग होता. ते भारतीयांना ''they are gross and corrupt'' (हे भारतीय घाणेरडे आणि भ्रष्ट आहेत) असं म्हणायचे. चर्चिल यांनी काही काळ भारतात बंगलोरला घालवला. १८ मार्च १९३१ रोजी लंडन येथे झालेल्या 'Our Duty in India' या भाषणात त्यांनी भारतातल्या जाती व्यवस्थेवर कडाडून टीका केली आहे.

 

चर्चिल एक वेगळीच व्यक्ती होती, त्यांच्याकडे कणखर वृत्ती होती, ते एक उत्तम संसदपटू होते, लेखक होते साहित्यिक होते, त्यांना साहित्यातले नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांची भाषणे त्यावेळी इंग्लंडच्या संसदेत खूप गाजत. चर्चिल म्हणत ''Success consists of going from failure to failure, without loss of enthusiasm'', म्हणजे यश म्हणजे अपयाशाकडून अपयशाकडे उत्साह ढळू न देता वाटचाल करणे. लोकशाहीबद्दल चर्चिल म्हणतात कि, लोकशाही विरुद्ध उत्तम प्रतिवाद म्हणजे सर्वसामान्य लोकांशी पाच मिनिटे केलेली बातचीत. दुस-या महायुध्हामधील चर्चिल यांनी गाजवलेला पराक्रम जबरदस्त आहे. दुस-या महायुद्धातून सर्व मित्र राष्ट्रांना साहाय्य करण्यात पण त्याचबरोबर शत्रूला नामोहरम करण्यात त्यांना यश आले. हे महायुद्ध जिंकणे, हिटलरच्या जर्मनीला, मुसोलिनीच्या इटलीला तसेच जपानच्या हिरोहीतोला धूळ चाखायला लावणे हे काही येड्या गबाळ्याच काम नव्हतं.

 

दुस-या महायुद्धाचा अभ्यास केला तर लक्षात येईल कि, हिटलर ने उघडलेली आघाडी अत्यंत मजबूत होती, त्याच्याकडे पँझर डिविजन होती, गोबेल्स, रोमेल, रीबेन्त्रोप, हिमलर सारखे एकसे बढकर एक असे सेनापती होते, मुसोलीनिसारखा मित्र होता, अश्या युद्धखोर हिटलरला अडवणं आणि प्रतिहल्ला करणं म्हणजे महाभयंकर काम, पण तरीही इंग्लंड ला विजय मिळवून देण्यात आणि मित्र राष्ट्रांची मोर्चेबांधणी करण्यात चर्चिल यांचे योगदान महत्वाचे आहे. या योगदानात त्यांना रूझवेल्ट आणि स्टालिन यांची साथ होती. चर्चिल ब-याच वेळेला युद्धभूमीवर जायचे, रणनीती आखायचे आणि वेळोवेळी आपल्या सैनिकांना प्रेरणा द्यायचे. अश्या ''वॉर्सा ते हिरोशिमा'' रंगलेल्या युद्धात इंग्लंडची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात यशस्वी होणे आणि आपल्या देशाला वैभव प्राप्त करून देणे हे सर्वात प्रमुख उद्दिष्ट चर्चिल यांच्यापुढे होते. चर्चिल यांनी युध्द जिंकून हे दाखवून दिले कि इंग्लंड एक सशक्त आणि झालेला हल्ला परतवण्यास समर्थ राष्ट्र आहे. ह्या त्यांच्या सर्व कामगिरीमुळे विन्स्टन चर्चिल यांच्याकडे एक महान जेता म्हणूनच पाहिलं जाईल यात शंका नाही.

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह