मुख्य सामग्रीवर वगळा

अर्थशास्त्रातील विचारप्रवाह - २

 

फिजीओक्रॅटस चे योगदान !

 

मर्कनटॅलीजमच्या विरुध्द जाणारा आणि अर्थशास्त्रात एक मुलभूत स्वरूपाचे योगदान देणारा विचार प्रवाह म्हणजे फिजीओक्रसी. हा विचार प्रवाह फ्रांस मध्ये साधारणतः अठराव्या शतकात उदयास आला. झालं अस कि मर्कनटॅलीजमची हवा ओसरू लागल्यानंतर तसच मर्कनटॅलीजमच्या नियमांचा जवळपास कंटाळा आल्यानंतर फिजीओक्रसी या वेगळ्या वाटणाऱ्या आर्थिक विचारांनी लोकांचे लक्ष वेधले. लोकांना आता सोनं चांदी गोळा करा, वसाहती स्थापन करा, संपत्ती कमवा, व्यापारावर बंधने लादा या सगळ्या गोष्टींचा अगदी कंटाळा आला होता. यातून आपली सुटका कशी होईल आणि एक नवीन आर्थिक पद्धती कशी आणता येईल यासाठी मग प्रयत्न सुरु झाले. गम्मत म्हणजे या फिजीओक्रॅटसना स्वतःला अर्थतज्ञ म्हणून घ्यायला खूप आवडे.

 

मर्कनटॅलीजमच्या विरुध्द आवाज उठवणारा आणि आम्हाला बंधनातून मुक्त करा असा जणू नाराच देणारी व्यक्ती म्हणजे गुर्ने. याला फिजीओक्रॅटस चळवळीचा आघाडीचा नेता म्हणता येईल. त्याची वाक्य इतिहासात खूपच प्रसिद्ध झाली आणि त्याच्या या ब्रीद्वाक्याने आधुनिक अर्थशास्त्राचा पाया रचला असं आपण म्हणू शकतो. हे ब्रीदवाक्य म्हणजे ' लेझे फेअर ', म्हणजे बंधनातून मुक्तता. हि बंधने कशा स्वरुपाची तर आधी सांगितल्या प्रमाणे सरकारी हस्तक्षेपाची! फिजीओक्रॅटस म्हणायचे सरकारी हस्तक्षेपाच मुळात चुकीचा आहे, बाजाराला त्याचे काम करू द्या आणि अपोआप सगळ्या गोष्टी पूर्ववत होतील. इथे अर्थशास्त्रातली महत्वाची संकल्पना म्हणजे समतोल ज्याला इंग्रजीमध्ये Equilibrium म्हणता येईल.

 

बाजार व्यवस्थेमध्ये जर सरकारचा हस्तक्षेप झाला नाही तर बाजारात ( Market) गोष्टी अपोआप पूर्ववत होतात. उदाहरणार्थ, क्ष वस्तूची किंमत बाजारात वाढली तर त्या वस्तूची मागणी कमी होते आणि मग त्याचा पुरवठा आहे तसाच राहतो परिणामी क्ष वस्तूची किंमत परत कमी होते आणि मग परत मागणी वाढते, त्यानंतर पुरवठा वाढतो असं हे चक्र चालूच रहातं. पण हे सगळ होण्यासाठी मुक्त बाजार असणे मात्र बंधनकारक आहे. फिजीओक्रसी ची वैशिष्टे सांगायची झाल्यास यात प्रामुख्याने मुक्त व्यापारावर जोर दिला गेला. या फिजीओक्रॅटस मंडळींचा मुक्तता या गोष्टीवर भलताच विश्वास होतं. हि मंडळी म्हणत कि निसर्ग सगळं ठीक करतो त्यामुळे आपण ढवळाढवळ करायची गरज नाही. यांना सोनं चांदीमुळे देशाची भरभराट होते हे मुळीच पटत नसे, उलट हे म्हणत कि राष्ट्रात होणा-या उत्पादनामुळे देशाची प्रगती होते. यातली अजून काही महत्वाची वैशिष्टे म्हणजे शेतीला दिलेलं प्राधान्य, वयक्तिक संपत्तीचा अधिकार, गुंतवणुकीसाठी भांडवलाला महत्व इ. फिजीओक्रॅटसच्या मते शेतकरी आणि शेतमजूर हेच खरे उत्पादक आहेत, उद्योगाने मात्र संपत्ती वाढत नाही किंवा राष्ट्रीय उत्पादनात तितकीशी भर पडत नाही. उद्योगातील कामगार हे संपत्तीमध्ये कुठलीच भर घालत नाहीत, तर फक्त शेतकरीच संपत्तीमध्ये भर घालतात आणि त्यांचा देशाच्या आर्थिक वाढीत मोलाचा सहभाग असतो असा ठाम विश्वास फिजीओक्रॅटस मंडळींचा होता.

 

फिजीओक्रसीतले महत्वाचे शिलेदार म्हणजे फ्रांस्वा केने, तुर्गो, डूपाँ, गुर्ने आणि मिराबू. यातला फ्रांस्वा केने हा खरं नेता होता आणि त्याचे शिष्य म्हणजे वरील सगळी मंडळी. यात अजून एक महत्वाचा फिजीओक्रॅट म्हणजे व्बागील्बेर. या सगळ्या फिजीओक्रॅटसनी अर्थशास्त्रात फार महत्वाचे योगदान दिले आहे, नवीन संकल्पना ज्या आजवर माहिती नव्हत्या त्या तयार केल्या, त्यांचा अभ्यास केला, आणि त्याचा उपयोग कुठे करता येईल हे जाणले. यातल्या महत्वाच्या संकल्पना म्हणजे टॅब्लू इकॉनॉमिक म्हणजे अर्थव्यवस्थेची प्रतिकृती, चक्राकार पैशाचे स्वरूप आणि इकॉनॉमिक सरप्लस! अश्या ह्या फिजीओक्रॅटस मंडळीचे योगदान अर्थव्यवस्थेला तसेच अर्थशास्त्राला चालना देणारे ठरले.


-निखिल कासखेडीकर  

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह