मुख्य सामग्रीवर वगळा

आधुनिक व्यापारातील संकल्पना -1

 व्यापारातील संरक्षण !

 

दोन देशांचा एकमेकांशी व्यापार ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील एक मुलभूत स्वरुपाची संकल्पना आहे. व्यापाराचे महत्व तसे जुनेच. फरक एवढाच आहे कि पूर्वी व्यापार हा समुद्र मार्गाने व्हायचा तर आज तो हवाईमार्गानेपण होतो. अनेक तज्ञांना असे पुरावे मिळाले आहेत कि भारताचा व्यापार अगदी पार इजिप्त पर्यंत पसरला होता. तिथे अनेक वस्तू उत्खननात सापडल्या आहेत आणि त्या वस्तूंवरून, त्या अस्सल भारतीय आहेत, असे समजते. आपल्या सगळ्यांना पूर्वी सिल्क रुट नामक एक मार्ग होता, ज्याने आपला आणि मध्य आशिया, विशेषतः चीनशी आपला आर्थिक व्यवहार चालायचा, हे माहित असेलच. पण आज व्यापाराचे स्वरूप जरा क्लिष्ट झाले आहे. यात अनेक विचारप्रवाह आले आहेत आणि एक विचारप्रवाह जणू आधुनिक मर्कनटॅलीजमच वाटावा असा आहे.

मर्कनटॅलीजम मध्ये आपण हे पाहीलेच कि व्यापाराला संरक्षण देणे तसेच, सोने चांदी गोळा करणे आवश्यक. पण, असं करत असताना हे सोनं चांदी बाहेर जाणार नाही आणि इतर देशांना मिळणार नाही याचीहि काळजी घेणे असा स्वार्थी दृष्टीकोण या आर्थिक विचारसरणीमध्ये होता. अश्याच काही स्वरूपाचा ज्याला मर्कनटॅलीजमचे Extended version म्हणता येईल असा विचार म्हणजे व्यापारातील आर्थिक संरक्षण. इंग्रजीत सांगायचा झाल्यास या विचारसरणीला Protectionism असं संबोधता येईल. प्रोटेक्षनिजम म्हणजे परदेशी मालांच्या स्पर्धेत स्वदेशी मालाला दिलेले संरक्षण. मग या संरक्षणात अनेक प्रकार आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास वस्तूंवर टेरीफ लावण्याची पद्धत आहे. टेरीफ म्हणजे एक प्रकारच जणू टॅक्सच. आता हा टॅक्स कसा लावला जातो? तर, ज्या प्रकारच्या वस्तूंची आयात होते, त्या प्रकारच्या वस्तूंवर टॅक्स लावला जातो. यामुळे होत काय कि परकीय वस्तूंच्या किमती वाढतात आणि मग आपल्या देशातले लोक आयात केलेल्या वस्तुंच्या ऐवजी स्वदेश बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देतात आणि त्याच शेवटी विकत घेतात. बंधने घालण्याचा दुसरा एक मार्ग म्हणजे इम्पोर्ट कोटा. ह्या इम्पोर्ट कोट्याचा प्रमुख उद्देश म्हणजे, आयात केलेल्या वस्तूंची संख्या कमी करणे आणि परिणामतः त्यांच्या बाजारातील किमती वाढवणे. यामागे उद्देश हाच कि स्वदेशी व्यापाराला चालना मिळेल आणि मग लोक आपल्याच देशात तयार झालेल्या वस्तू विकत घेतील आणि मग पैसा हा आपल्याच देशात खेळता राहील, राष्ट्रीय उत्पादन वाढेल, संपत्ती वाढेल.

ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी आजचं आधुनिक अर्थशास्त्र सांगत कि व्यापाराला संरक्षण हा प्रकारच मुळात चुकीचा आहे. कारण याने नुकसान शेवटी ज्या देशाने कर लादले त्या देशाचेच होणार आहे, कारण शेवटी वस्तूंच्या गुणात्मकतेवर परिणाम होऊन जर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरायची वेळ आली, तर जवळपास आपण तयार केलेल्या वस्तू या बादच होतील आणि त्या कोणीही विकत घेणार नाही. अशा पद्धतीने ब-याच आधुनिक अर्थतज्ञांनी व्यापारात संरक्षण देण्याला विरोध केला आहे. पाश्चिमात्य देश तर या संरक्षण देण्याच्या प्रकारच्या अगदी कमालीच्या विरोधात आहेत. जी-20 समूहाने पण या संदर्भात कडक भूमिका घेऊन 'व्यापाराला संरक्षण देणे, म्हणजे संकुचितपणाचे लक्षण आहे' अशी हेटाळणीच केली आहे.

यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, जे लोक व्यापाराला संरक्षण देण्याच्या बाजूचे आहेत ते म्हणतात, जर आपल्या देशात एखादा नवीन उद्योग जर चालू झाला आणि त्यातच आपल्याला परदेशी उद्योगांबरोबर सामना करण्याची वेळ जर आली तर काय? मग नको रे बाबा स्पर्धा नकोच! आपण बऱ आणि आपले उद्योग बरे! अश्या स्वरूपाचे विचार काही तज्ञांनी मांडून ठेवले आहेत. इंग्रजीत याला Infant Industry Argument असं संबोधतात.

अशी हि व्यापाराला संरक्षण देण्याची प्रणाली आता फारच कमी देश स्वीकारण्याच्या तयारीत आहेत, कारण मुळात ज्या जागतिक संघटना तयार झाल्या त्यांचा या विचारांना प्रखर विरोध आहे आणि खरं सांगायचं झाल्यास त्या संघटनांवर पाश्चिमात्य जगाचे नियंत्रण आहे. म्हणून आता Protectionism च्या फंदात कोणी पडत नाही.

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह