मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युरोप आणि कॅनडाला जोडणारा सेटा (CETA) करार!

अमेरिका आणि युरोप ला केंद्रस्थानी ठेवून TTIP करार करण्यात आला होता. त्याचं पूर्ण नाव ट्रान्स अटलांटिक ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिप करार असं होय. पण मागची तीन वर्ष कसून वाटाघाटी करूनसुद्धा एकमत न झाल्याने हा करार पुर्णत्वास येऊ शकला नाही. शेवटी हा करार अमेरिकेने गुंडाळल्यातच जमा आहे. अमेरिका आणि युरोपीय महासंघात हा करार होऊ नये म्हणून दोन्ही बाजूच्या दबाव गटांनी जोरदार प्रयत्न केले होते, आणि त्यात त्यांना यश मिळाले. यामुळे युरोपला दु : ख झाले. एक मोठी बाजारपेठ गेल्याची भावना त्यामुळे वाढीस लागली. सध्याच्या नवनिर्वाचित अमेरिकी अध्यक्ष्यांचं धोरण अमेरिकेच्या आधीच्या धोरणापेक्षा निराळं आहे, त्याने जागतिक व्यापाराची दिशा बदलली आहे, असं म्हणण्यास वाव आहे. मुक्त व्यापारापेक्षा संकुचित किंवा ज्याला आपण व्यापारातील संरक्षण म्हणतो असं धोरण अमेरिका स्वीकारण्याच्या तयारीत आहे. हे प्रोटेक्शनीजमचं धोरण जागतिक व्यापारात अडथळा ठरू शकतं. या धोरणामुळेच युरोप अमेरिकेच्या दूर गेला आहे. आता जागतिक आघाड्यांची फेरबांधणी झाल्यानंतर कॅनडा पुढे सरसावला आहे. सात वर्ष कसून वाटाघाटी केल्यानंतर य