मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युरोपीय महासंघ आणि जर्मनीची अधिकारशाही

          युरोपीय महासंघ आणि जर्मनी याचं एक घट्ट नातं आहे. युरोपीय महासंघ स्थापन करण्यात आणि युरो हे चलन आणण्यात, खुद्द जर्मनीचा पुढाकार होता. जवळपास दोन दशकांपूर्वी युरो चलन वापरात आले. अश्या वेळेस जर्मनीने महासंघाची सूत्र हातात घेऊन कारभार करणे म्हणजे काही आश्चर्यकारक गोष्ट नाही हे समजावून घ्यायला पाहिजे. या सगळ्याचा संबंध जर्मनीच्या अर्थकारणापाशी केंद्रित होत आहे. खरंतर युरोपीय महासंघामध्ये बोलबाला हा पश्चिम युरोपीय देशांचा आहे आणि असा एक समाज आहे कि युरोपीय महासंघाची धोरणं ठरवण्यामध्ये मुख्यत्वेकरून तीन देशांचा वाटा आहे, ब्रिटन, फ्रांस आणि जर्मनी. पण केवळ आर्थिक मजबुतीच्या जोरावर पुन्हा सामर्थ्यशाली युरोप निर्माण करण्याचा संकल्प जणू जर्मनी करत आहे आणि त्यासाठी युरोपीय महासंघावर पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.          जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय प्रवेशाची पार्श्वभूमी         दोन्हीही महायुद्धात सर्वस्व पणाला लावलेला युरोप खंडाचा मोठा शिलेदार म्हणजे जर्मनी. पहिल्या महायुद्धात हार पत्करावी लागल्यानंतर, त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी आणि जर्मनीला गतवैभव परत मिळवून देण्यासाठीचा

मिचीबिकी २!

  जसं जसं तंत्रज्ञानात रोज बदल होत चालले आहेत, तसं तसं या तंत्रज्ञानाचा माणसाला फायदा होतो आहे, असं म्हणण्यास जागा आहे. कारण शेवटी माणसाचे जीवन सुकर करण्यासाठीच तंत्रज्ञानाचा उपयोग माणूस करत आहे. पण तंत्रज्ञानाचा अतिरेक पण होता कामा नये याचीसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. पूर्वीपेक्षा आज माणसाला कुठल्याही प्रकारचे काम करण्यासाठी कमी कष्ट करावे लागत आहेत. आज वस्तूंचे उत्पादन करण्यात खुद्द माणसांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्सचा सुद्धा सहभाग आहे. पण उद्या माणसे जाऊन फक्त मशीन्सच उत्पादन करू लागले तर काय असा प्रश्न आहे. कामगारांच्या नोकर्यांवर गदा येऊ नये, यासाठी काहीतरी उपाय योजना करणे आवश्यक आहे. इथे एक फरक लक्षात घेण्यासारखा आहे. माणसाला बुद्धी आहे, माणसाला भावना आहे, या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून माणूस विशिष्ट निर्णय घेऊ शकतो. मशीन्सचा विचार करायचा झाल्यास त्यांना तांत्रिक भाषेत ज्या कमांड्स दिलेल्या असतात तेवढ्याचाच उपयोग करून मशीन्स आउटपुट देतात. म्हणजे निर्णयांती पोहोचतात. त्यांच्यात जी माहिती फीड केली जाते, तेवढे मग अनुसरण करून अंतिम वस्तू निर्मिली जाते. या मशीन्सना भावना नसतात

स्पेस टूरीजम कितपत शक्य आहे?

  मला आठवतं १० वर्षापूर्वी वर्तमान पत्रात चंद्रावर मानवाच्या कॉलनीज स्थापायचा विचार आहे असे लेख यायचे. तेंव्हा वाटायचं की असं जर खरच घडलं तर काय मजा येईल, म्हणजे चंद्रावर शेती केली, आणि तिथेच राहिलं तर एकदमच थ्रील वाटेल. तेंव्हा वैज्ञानिकांच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी चंद्र होता, आज त्याची जागा मंगळाने घेतली आहे एवढच... माणसाकडे अफाट कल्पनाशक्तीची देणगी आहे. त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तो अवकाशात जाऊ पाहतो आहे. ही बाब चांगली आहे. रोज तंत्रज्ञानात नवीन नवीन बदल होत आहेत...तसंच विश्वाकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहून, त्याला प्रयोगांची जोड देऊन मानव समस्यांची उकल करू पहात आहे. यात पूर्णपणे अवकाशशास्त्राला वाहून घेतलेली संस्था म्हणजे नासा जगात अग्रस्थानी आहे. पण काही काळापूर्वी ज्या कल्पनांच्या जोरावार वैज्ञानिक आणि संपूर्ण कम्युनिटी नव्या नव्या कल्पना करण्यात व्यग्र होती त्यांच्या समोर आज प्रश्न उभा आहे की अवकाश पर्यटन कितपत शक्य आहे? नासाने आणि रशियन स्पेस एजेन्सी च्या संयुक्त विद्यमाने सन २००० साली इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक उभारण्यात आले. त्या

उंच भरारी...!

विमानाने प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते. विमान जेंव्हा take off घेते, तेंव्हा आपण अंधातरी असल्याची भावना मनात निर्माण होऊन खाली पडू कि काय असे वाटते. थोडा वेळ हि भावना तशीच राहते. एका विशिष्ट उंची पर्यंत गेल्यानंतर   take off घेताना मागे झुकलेले विमान मग सरळ होते आणि मग कुठे बरं वाटत. विमान खाली उतरतानासुद्धा थोडी भीती वाटते. आकाशात विमानाने हेलकावे घेतल्यानंतर मग उतरताना एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे झुकून पायलट अंदाज घेऊन मग विमान runway वर उतरवतात. सगळ्यात घाबरवणारी गोष्ट म्हणजे turbulence हा प्रकार. विमान आकाशात असताना हवेचा दाब निर्माण होऊन हवेच्या पोकळीत गेल्यानंतर आपल्याला turbulence अनुभवायला येतो. ज्यांनी कोणी आतापर्यंत विमान प्रवास केला असेल, त्यांना हि गोष्ट चांगलीच माहिती असेल. खरं सांगायचं म्हणजे, turbulence आल्यानंतर कधी एकदा विमान स्थिर आणि सरळ उडते असं वाटायला लागते. महत्वाची गोष्ट म्हणजे, विमानाला काही दगा फटका झाला तर काय? आणि ते पडले तर काय? हि सतत वाटणारी भीती असते. कदाचित कोणाला हि भीती अनाठायी वाटेलसुद्धा, पण अशी भीती वाटणे हे नैसर्गिक आहे.               आ