मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान अमेरिका संबंध... दुरावलेलेच!

दोन सच्च्या मित्रांची जशी मैत्री असते तशीच किंवा अगदी त्याहून ज्यास्त मैत्री पाकिस्तानची अमेरिकेबरोबर होती. इथे होती असं म्हणण्याचं कारण म्हणजे पाकिस्तान अमेरिका संबंध २०११ पासून तणावपूर्ण आहेत. याला काही आंतरराष्ट्रीय तसेच काही प्रादेशिक कारणं देखील आहेत. पाकिस्तान अमेरिका संबंध – पार्श्वभूमी वास्तविक पाहता अमेरिका हा काही निवडक देशांपैकी एक देश होता, ज्याने पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाल्यानंतर त्याला मान्यता दिली. पाकिस्तान बरोबर अमेरिकेचे संबंध पुढील काळात वृद्धिंगत होत गेले. पाकिस्तानमधल्या पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाच्या अमेरिका धार्जिण्या धोरणामुळे अमेरिका आणि पाकिस्तान या दोन देशांमधले संबंध सुदृढ झाले. याला पाकिस्तान मुस्लीम लीगचे भांडवलवादी धोरण मुख्यत्वेकरून कारणीभूत ठरले. शीतयुद्ध सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत अमेरिकेला पाकिस्तानची सोबत होती. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमध्ये मोर्चा प्रस्थापित केला. आपले सैन्य पाठवले. इकडे अमेरिका जागी झाली. अमेरिकेला पाकिस्तानबद्दल चिंता वाटू लागली. जर सोव्हियेत रशियाने पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवले आण