मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रशिया - यूक्रेन संघर्षाच्या निमित्ताने...

  रशियन फेडरेशनने २०१४ साली यूक्रेन मध्ये झालेल्या उठावाच्या वेळी क्रायमिया हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. तसच लगेचच तिथे जनमत घेऊन सांगून टाकलं की क्रायमियामधल्या   ९६ टक्के जनतेला वाटतं आहे की रशियाने क्रायमिया स्वतःकडे घेऊन योग्यच केलं आहे. हे सगळ जरी खरं असलं तरीसुद्धा आज आपण क्रायमिया नक्की कोणाचा हा प्रश्न विचारला तर त्यावर उत्तर देणं कठीण आहे. याचं कारण २०१५ ला रशियाने क्रायमिया ताब्यात घेतलं. पण पाश्चिमात्य देशांनी क्रायमिया हा रशियाचाच एक भाग आहे हे मान्य करायला नकार दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेसुद्धा आणि अमेरिका आणि मित्र देशांनी यूक्रेनला पाठिंबा देत क्रायमिया हा रशियाचा भूभाग आहे हे मान्य करायला नकार दिला आहे. अमेरिकादी देश अजूनही क्रायमियाला यूक्रेनचाच भाग मानतात. सध्या यूक्रेन - रशिया सीमारेषेवर तणावाचं वातावरण आहे कारण रशिया कुठल्याही परिस्थितीत यूक्रेन वर हल्ला करू शकतो असं चित्र तयार झालं आहे... रशियाने शीतयुद्ध संपल्यानंतर पाहिल्यानंदाच लाख भर सैन्य यूक्रेनच्या सीमारेषेवर आणून ठेवलं आहे. अमेरिकेला भीती आहे रशिया यूक्रेनवर हल्ला करेल याची... पण पुतीन म्हणतात की आ

इतिहासात आजच्या दिवशी झाले होते क्रायमियाचे हस्तांतरण ...

  क्रायमिया हा तसा पूर्व युरोप मधला, काळ्या समुद्राच्या उत्तरेला असलेला एक द्वीपकल्प... . याला लागून आहे अझोवचा समुद्र. आजचा क्रायमिया हा रशिया आणि यूक्रेन मध्ये विभागला गेला आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी १९५४ ला तत्कालीन सोव्हिएत रशियाने यूक्रेनला हा प्रदेश ‘मैत्रीचं प्रतीक’ म्हणून हस्तांतरित केला. क्रायमिया हा भाग नेहमीच रशिया आणि यूक्रेन यांच्यामधल्या वादाचा विषय राहिला आहे. इतिहासात, क्रायमिया कोणाचा यावरून तर युद्धसुद्धा लढली गेली आहेत. मध्ययुगापासून पुढे पाहिल्यास हा प्रदेश ऑटोमान तुर्काच्या साम्राज्याचा भाग होता. त्यानंतर सतराव्या शतकापासून पुढे रशियन साम्राज्याचा या भागावर वरचष्मा राहीला. तत्कालीन सोव्हिएत रशियाने तर १९५४ पर्यन्त क्रायमियावर राज्य केलं. क्रायमियाचं युद्ध आणि रशियातलं गृहयुद्ध यात तर क्रायमियाच्या लोकसंखेच्या विभागणीमद्धे  खूप मोठा बदल झाला. जेंव्हा ऑटोमान लोक राज्य करत होते, तेंव्हा तातार लोकांची संख्या क्रायमियामध्ये ज्यास्त होती. तातार म्हणजे मुस्लिमवंशाचे तुर्क लोक... रशियनांनी जेंव्हा क्रायमिया मिळवला, तेंव्हापासून रशियन, यूक्रेनियन आणि तातार अश

कॅनडात या गोष्टीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित

  कॅनडा हा एक पाश्चिमात्य, शांतताप्रिय असलेला देश, आज एका वेगळ्याच कारणासाठी जगभर चर्चेत आला आहे. अमेरिकेच्या खालोखाल कॅनडाकडे जगभरातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षण घेण्यासाठी कल असतो... एक पुढारलेला समाज, स्थलांतरित होण्यासाठीसुद्धा इतर देशातल्या नागरिकांची कॅनडाला पसंती... सगळ्याना सामावून घेणारा, उदारमतवादी समाज असलेला, चांगले जीवनमान असलेला कॅनडा... सुधारणवादी म्हणून सगळ्याना परिचित आहे. पण केवळ अंतर्गत कलह आणि सध्या सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपामुळे कॅनडात राजकीय वातावरण तापलं आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या मते तर सध्या सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपामुळे कॅनडाच्या उदारमतवादी आणि पुढारलेल्या प्रतिमेला छेद गेला आहे. कॅनडात एका संपामुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.   कॅनडात सक्तीच्या कोरोना लसीकरणाच्या विरोधात राजधानी ओटावात “पार्लमेंट हिल” या कॅनडाच्या संसदेजवळ ट्रक चालक विरोध प्रदर्शन करत आहेत. ज्या ट्रकचालकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल आणि जे अमेरिकेतून कॅनडात परततील , त्यांना   नियमांनुसार क्वारंटाईन व्हावे लागेल .   ट्रक चालकांच्या मते फेडरल स

कॅनडाचे पंतप्रधान झाले भूमिगत!

  मित्रांनो , आपल्यासारख्या सामान्य भारतीयांना वाटत असेल की भारतासारख्या देशात लोकशाही असूनसुद्धा सतत काहीतरी मोर्चे , बंद किंवा लॉकडाउन होत असतात. यात तथ्य आहे. पण तुम्हाला जर सांगितलं की कॅनडासारख्या पाश्चिमात्य आणि अतिप्रगत देशात वस्तूंची ने आण करणार्‍या ट्रक चालकांनी संप केला तर... बरं हा नुसताच संप नाही तर त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूड्यु यांना चक्क ओटावा या राजधांनीतल्या त्यांच्या घरातून सुरक्षा कारणासाठी दुसर्‍या सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. होय तुम्ही हे वाचता आहात हे खरं आहे. झालय असं की , कॅनडा मध्ये अन्न , जीवनावश्यक वस्तु , इतर गोष्टींसाठी तिथल्या नागरिकाना अमेरिकेवर अवलंबून राहावं लागतं. अमेरिकेतून रस्त्याच्या मार्गाने हे ट्रक्स कॅनडात आवश्यक वस्तूंची ने आण करत असतात , त्यामुळे हीच त्यांची लाइफलाइन आहे , असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ट्रक कॅनडातून अमेरिकेत जातात तिथून माल घेऊन परत कॅनडात येतात... असं हा नित्यनियमाचा उपक्रम चालू असतो... कॅनडा हा अमेरिकेचा शेजारी... दोघांमध्ये एक सीमारेषा आहे. कॅनडा- अमेरिका यांचे मैत्रीपूर्ण व सौहार्दाचे संबंध आहेत

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्यापून

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्हेगा

श्रीलंका आर्थिक गर्तेच्या छायेत... ?

  भाग-2 भारताची भूमिका- भारत आणि श्रीलंका संबंध हे अत्यंत जुने , विश्वासपूर्ण आणि परस्पर सहकार्याचे राहिले आहेत. संकृती आणि धर्म या दोन गोष्टींचा प्रभाव भारत - श्रीलंका संबंधांवर दीर्घ काळापासून होत आला आहे. सामान्य भारतीय माणसाला रावणाची लंका म्हणून श्रीलंका माहिती आहे. त्याला ऐतिहासिक महत्व आहे. श्रीलंकेत ७५% लोकसंख्या ही सिंहली आहे. तर उरलेले २५ % लोक हे तमिळ आहेत. सिंहली भाषेचं मूळ हे ब्राह्मी भाषेत आहे. या भाषा इंडो-आर्यन भाषा म्हणून ओळखल्या जातात. पण यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंहलीचा ‘ सिंहा ’ शब्द हा मूळ संस्कृत भाषेतला आहे. सिंहा म्हणजे सिंह , सिंहाचा प्रदेश म्हणून या प्रदेशाला महत्व आहे. अश्या ऐतिहासिक महत्व असलेल्या श्रीलंकेला मात्र कोरोंनाची झळ बसलेली आहे. पर्यटन क्षेत्र तर कोलमडलं आहे , पर्यटन क्षेत्राला पूर्वीसारखे सुगीचे दिवस कधी येतील याबद्दल काहीही तर्क करता येत नाही , परिणामी श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम होतो आहे. श्रीलंकेची परकीय गंगाजळीसुद्धा कमी होत चालली आहे , आणि २०२२ मध्ये तर अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडणार अशी परिस्थिती आहे. चीनकडून

श्रीलंका आर्थिक गर्तेच्या छायेत...?

  भाग-१ कोरोना जागतिक महामारीने आज संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या प्रादुर्भावाचा परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवरसुद्धा खूप प्रमाणात झाला आहे. याला कुठलाही देश अपवाद नाही. याचा सगळ्यात मोठा फटका जागतिक पर्यटन क्षेत्राला बसला आहे. अश्याच आर्थिक संकटात सापडलेला देश म्हणजे भारताचा शेजारी ... श्रीलंका! श्रीलंकेची अर्थव्यवस्था हळूहळू कोसळू लागली आहे. कोविड महामारी आल्याने अंदाजे पाच लाख लोक दारिद्र्यरेषेच्या खाली गेले आहेत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पाच वर्ष मागे फेकल्या गेल्यासारखी झाली आहे. तसच श्रीलंकेवर २६ बिलियन डॉलर इतकं परकीय कर्ज डोक्यावर आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था २०२१ मध्ये दीड टक्क्याने आकुंचीत पावली आहे. श्रीलंकेच्या डोक्यावर चीनचं ५ बिलियन डॉलर कर्ज आहे. श्रीलंका हा चीनच्या कर्ज सापळ्यात अडकून पडला आहे अशी परिस्थिति आहे. याचप्रमाणे श्रीलंकन सरकारनुसार श्रीलंका एकूण तीन देशांना देणं लागतं – हे तीन देश म्हणजे चीन , जपान आणि भारत. परकीय गंगाजळी सुद्धा खूप घसरली आहे. श्रीलंकेत पर्यटन क्षेत्राचा एकूण जिडीपी मधला वाटा हा १० टक्के इतका आहे. साहजिकच पर्यटनामुळे जे परकीय चलन पर्

या आहेत २०२२ मध्ये रात्री आकाशात घडणार्याल १५ खगोलशास्त्रीय घटना

  २०२२ हे वर्ष सगळ्या खगोल प्रेमींसाठी एक पर्वणीच असणार आहे. याचं कारण या वर्षी आकाशात वर्षभर रात्री विहंगम अशी दृश्य दिसणार आहेत आणि ती आपल्याला उघड्या डोळ्यांनीसुद्धा पाहता येणार आहेत. अश्या आकाशात घडणार्‍या घटनांबद्दल अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. १.फेब्रुवारी ते मार्च – शुक्र ग्रहाचं दर्शन. साधारणतः महिनाभर म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यातून ते मार्चच्या मध्यापर्यन्त शुक्र ग्रहाचं दर्शन होणार आहे. आकाशात दक्षिण पूर्वेला सकाळच्या वेळी पाहील्यास शुक्र अत्यंत तेजस्वी दिसणार आहे. 13 फेब्रुवारीला दिसणारा शुक्र आतापर्यंत सगळ्यात प्रकाशमान दिसणार आहे. त्याची चंद्रकोर सुद्धा या वेळी पाहता येणार आहे. 20 मार्चला शुक्र अर्धचंद्राकृती दिसेल आणि  सूर्यापासून शुक्र आतापर्यंतच्या प्रवासात सगळ्यात ज्यास्त अंतरावर असेल आणि तो पुढे विस्तारत जाईल. २. ५ एप्रिल- मंगळ आणि शनि यांची आकाशात भेट. ५ एप्रिलच्या सकाळी अगदी सूर्योदय होण्याआधी मंगळ शनिच्या खाली ०.४ अंश कोनात कललेला असेल. यात विशेष म्हणजे उघड्या डोळ्यांना मंगळ आणि शनि अगदी एकसारखेच तेजस्वी दिसतील. पण यांच्या छटा वेगळ्या असतील. शनि हा पिवळसर पा

बर्फवृष्टी अमेरिकेतली... आणि माणुसकी!

  अमेरिकेत साधारणतः डिसेंबर , जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात बर्‍याच शहरांमध्ये बर्फवृष्टी होते. आपल्याकडे भारतात फक्त हिमाचल प्रदेश किंवा कश्मीर खोर्‍यातच बर्फवृष्टी अनुभवता येते . अर्थात प्रत्येक ठिकाणचं वातावरण वेगवेगळं असतं. कुठे ऊन जास्त तर कुठे पाऊस जास्त तर कुठे थंडी जास्त. आपल्याकडे म्हणजे भारतात तीन ऋतु आपण अनुभवतो. उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा. पण इतर थंड प्रदेशांमध्ये उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतु असतात. तर सांगायचं असं की अमेरिकेत बर्फवृष्टी होणं हे नवीन नाही , परंतु प्रमाणाबाहेर बर्फ पडणं हे मात्र जनजीवन विस्कळीत होण्याचं कारण ठरू शकतं. आताही तसच घडलं. अगदी दोन दिवसापूर्वी अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतात अतिबर्फवृष्टीमुळे चक्क ५० मैलांच्या पट्ट्यात असलेल्या इंटर-स्टेट ९५ (हे तिथल्या हायवेचं नाव) या महामार्गावर ट्रॅफिक जाम झाली होती. तुम्ही म्हणाल आपल्याइथेही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटल्यामुळे किंवा कुठला अपघात झाल्यामुळे ट्रॅफिक जाम होऊ शकते. मग अमेरिकेचं काय घेऊन बसलात ? पण ही ‘ आय ९५ हायवे ’ वर ट्रॅफिक जाम झाली होती ती इतकी प्रचंड होती की लोक अक्

डोकं चक्रावून टाकणारे हे आहेत ५ विरोधाभास!

  मानवी जग हे विरोधाभासांनी व्यापून गेलं आहे... आजही जगात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपण फक्त अनुभव घेऊ शकतो , पण त्या मूर्त स्वरुपात आम्हाला दाखवा असं जर कोणी सांगितलं तर आपल्याला दाखवता येणार नाहीत . म्हणजे आपल्याला कोणी जर सांगितलं की आजूबाजूला हवा आहे का किंवा प्राणवायू आहे का तर आपण पटकन म्हणू हो आहे पण तो जर दाखवायची वेळ आली तर मात्र त्याचं रूप आपल्याला दिसणार नाही पण अनुभवता येईल. ही झाली एक गोष्ट... अश्याच प्रकारे आज अनेक गोष्टी अश्या आहेत ज्या विरोधाभासी आहेत , ज्याला तर्कसंगती काहीच नाही . त्या अस्तित्वात आहेत का आणि कश्या आहेत याबद्दल सुद्धा आपल्याला ठोस अश्या स्वरूपाचं कारण देणं अवघड आहे. असे महत्वाचे 5 विरोधाभास आहेत , अमान्य तर्क किंवा ज्याला आपण पॅराडॉक्स असं म्हणू शकतो या बद्दल आपण आज जाणून घेऊयात. 1.लायर्स पॅराडॉक्स ( Liar’s Paradox) म्हणजे एखादी व्यक्ति म्हणत असेल की ती नेहमी खोटं बोलते , तर ती जे बोलते आहे त्याला आपण ती व्यक्ति खोटं बोलते आहे असं विधान नाही करू शकत... म्हणजे ती व्यक्तिचं तिच्या तोंडून सांगते आहे की ती नेहमी खोटं बोलते आहे हेही तीच सांगत