मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीलंका आर्थिक गर्तेच्या छायेत...?

 भाग-१

कोरोना जागतिक महामारीने आज संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या प्रादुर्भावाचा परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवरसुद्धा खूप प्रमाणात झाला आहे. याला कुठलाही देश अपवाद नाही. याचा सगळ्यात मोठा फटका जागतिक पर्यटन क्षेत्राला बसला आहे. अश्याच आर्थिक संकटात सापडलेला देश म्हणजे भारताचा शेजारी ... श्रीलंका! श्रीलंकेची अर्थव्यवस्था हळूहळू कोसळू लागली आहे. कोविड महामारी आल्याने अंदाजे पाच लाख लोक दारिद्र्यरेषेच्या खाली गेले आहेत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पाच वर्ष मागे फेकल्या गेल्यासारखी झाली आहे. तसच श्रीलंकेवर २६ बिलियन डॉलर इतकं परकीय कर्ज डोक्यावर आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था २०२१ मध्ये दीड टक्क्याने आकुंचीत पावली आहे.

श्रीलंकेच्या डोक्यावर चीनचं ५ बिलियन डॉलर कर्ज आहे. श्रीलंका हा चीनच्या कर्ज सापळ्यात अडकून पडला आहे अशी परिस्थिति आहे. याचप्रमाणे श्रीलंकन सरकारनुसार श्रीलंका एकूण तीन देशांना देणं लागतं – हे तीन देश म्हणजे चीन, जपान आणि भारत. परकीय गंगाजळी सुद्धा खूप घसरली आहे.

श्रीलंकेत पर्यटन क्षेत्राचा एकूण जिडीपी मधला वाटा हा १० टक्के इतका आहे. साहजिकच पर्यटनामुळे जे परकीय चलन पर्यटकांकडून मिळत होतं, ते तर जवळपास बंदच झालं आहे. वर्ल्ड ट्राव्हल अँड टुरिझम कौन्सिल या संस्थेच्या अहवालनुसार श्रीलंकेतल्या पर्यटन क्षेत्रामध्ये २ लाख लोकांनी आपले रोजगार गमावले आहेत.

अन्न धान्याची परिस्थिती पण अशी तशीच आहे. या सगळ्या गोष्टींचा फटका सामान्य  श्रीलंकन माणसाला बसला आहे. एकीकडे नोकर्‍या जात आहेत तर दुसरीकडे अन्न धान्य, वस्तु खरेदीसाठी सुद्धा लोकांना झगडावं लागत आहे. आर्थिक स्थिति चांगली असणार्‍या मध्यम वर्गालाही याचा फटका बसला आहे. लोक आता दिवसाला ठरवून घेतलेले अन्नचं तेवढं खात आहेत, म्हणजे अन्नाचं रेशनिंग केलं आहे. चलनवाढ झाली आहे. जे लोक दिवसातून ३ वेळा अन्न खायचे ते आता दोनच वेळा अन्न खाणार आहेत.  

खरं तर या सगळ्या नकारात्मक गोष्टींची यादी खूपच मोठी आहे. काही गोष्टींचा उल्लेख करणं इथे आवश्यक आहे. म्हणजे यावरून आपल्याला श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल कळेल. काही चमत्कारिक गोष्टी घडत आहेत याचा आपल्याला अंदाज येईल. श्रीलंका ईराण कडून तेल विकत घेतं. आता अर्थव्यवस्थेमधला रोख पैसा परकीय देणी देण्यात खर्च होऊ नये म्हणून श्रीलंका सरकार ईराणला दर महिन्याला पैसे देण्याएवजी ५ मिलियन डॉलर इतक्या किमतीचा चहा देणार आहे... थोडक्यात पैसे देण्याऐवजी, तेलाच्या बदल्यात चहा असा सगळा सौदा ठरला आहे. अशीच दुसरी चमत्कारिक आणि दु:खद गोष्ट म्हणजे लोकांना आता अन्न विकत घेणं सुद्धा बिकट झालं आहे. शहरांमध्ये ही परिस्थिति आहे. तर गावांमध्ये हालच आहेत. खेडेगावांमध्ये तर दुकांदाराकडून १ किलो दूध पावडर घेणे सुद्धा सामान्य माणसाला कठीण झाले आहे, म्हणून दुकानदार १ किलो ऐवजी दूध पावडरचे १०० ग्रॉमचे अशी १० पाकीट करून विकत आहेत. याचं कारण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे सगळं चाललेलं आहे. उद्याची शाश्वती नाही.

श्रीलंकन सरकारला कोण वाचवेल, कोण या आर्थिक गर्तेतून बाहेर काढेल हे चित्र अजूनही अस्पष्ट आहे. सरकारला आता आंतर्राष्ट्रीय नाणेंनिधीकडून मदत घेण्याची आवश्यकता आहे असं श्रीलंकेचे मंत्री सांगत आहेत. श्रीलंका सरकारने अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिति पाहून लष्कराच्या हातात काही कामकाज दिले आहे. सरकारने सैन्यातल्या एका जनरल पदाच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे जीवनावश्यक वस्तु, अन्न धान्याचे वाटप करण्याची मोठी जबाबदारी दिली आहे... पण त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही...

श्रीलंकेला आर्थिक मदतीची गरज आहे आणि शेजारील राष्ट्र ती करतील अशी आशा आहे॰ आगामी काळात जर श्रीलंकेला पुरेशी आर्थिक मदत मिळाली नाही तर अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळेल अशी युद्धजन्य परिस्थिति आहे. आंतर्राष्ट्रीय नाणेंनिधी आणि आंतर्राष्ट्रीय समुदाय तसच सार्क देश यादृष्टीने काय पावलं उचलतात हे लवकरच कळेल.

                                   क्रमशः !

-निखिल कासखेडीकर 

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे.)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह