मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वर्तमान जागतिक घडामोडी आणि स्थलांतर

       आज जग एका नव्या वळणावर येऊन पोहोचले आहे. जगात अनेक ठिकाणी यादवी सुरु आहे नाहीतर युद्धसदृश परिस्थिती आहे, म्हणजे अंतर्गत कलह आलेच. www.ourworldindata.org   या वेबसाईट नुसार, शीतयुद्ध संपेपर्यंत अनेक संघर्षांचे (इथे सैनिकी युद्ध) प्रमाण जगात वाढले होते. www.foreignpolicy.com या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विषयावर महत्वाचे भाष्य करणाऱ्या वेबसाईटने,(मासिकाने) ‘२०१७ या विद्यमान वर्षात होऊ शकणारे १० महत्वाचे संघर्ष’ यावर टिप्पणी केली आहे. त्यानुसार, सिरीया आणि इराक, तुर्कस्तान, येमेन, ग्रेटर साहेल आणि लेक चाड बेसिनचा संघर्ष, डेमोक्रॅटीक रिपब्लिक ऑफ कोंगो, दक्षिण सुदान, अफगाणिस्तान, म्यानमार, युक्रेन आणि मेक्सिको इथल्या संघर्षात वाढ होईल असे नमूद करण्यात आले आहे. हा झाला संघर्षाचा आणि युद्धाचा भाग. पण या आणि अश्या अनेक संघर्षांमुळे एक प्रश्न ऐरणीवर आला आहे, तो म्हणजे निर्वासितांचा. या निर्वासितांमध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण अधिक आहे. एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकानुसार आतापर्यंत जगाच्या अनेक भागात, इतिहासात, अशी स्थलांतरे ज्याला ‘मास मायग्रेशन’ म्हणता येईल, अशी झाली आहेत पण त्य