मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कतारबद्दल थोडंसं... ! भाग 2 (कतार, तालिबान आणि अमेरिका)

कतार या देशाबद्दल मागच्या पोस्टमध्ये पहिल्या भागात आपण जाणून घेतलं. यावरून कतारबद्दल अंदाज यावा हा हेतू आहे. याच्यापुढे जाऊन कतार आज जागतिक राजकारणात एक महत्वाचा दुआ बनला आहे, हे लक्षात येईल. आज आपण न्यूज चॅनेलवर पाहतो की तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्ण कब्जा मिळवला आहे, तसंच अमेरिकेच्या तालिबानबरोबर वाटाघाटी झाल्या आणि दोहा करार अस्तित्वात आला. आखाती देशातल्या इतरही घडामोडीत कतारचं स्थान नक्की या सगळ्या घडामोडीत काय आहे, असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडू शकतो. कतार इतका महत्वाचा देश आज का बनला आहे, हे समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडी अभ्यासाव्या लागतील. एक गोष्ट इथे स्पष्ट करायची म्हणजे आपण किंवा आपल्यापैकी बरेच जण सध्याच्या तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्या पासून या सगळ्यात मोठी चूक कोणाची असेल तर अमेरिकेची आहे, हे म्हणतो आहोत, आणि त्यातसुद्धा अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडेंन यांची सगळ्यात मोठी भूमिका आहे, असं आपल्याला वाटतं आहे. पण हे अंशतः खरं आहे. बायडेंन यांनी अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेतल्यामुळे तालिबान सत्तेवर आलं गोष्ट जरी खरी असली तरी, याचा दोष बायडेंन याना न दे

कतारबद्दल थोडंसं...! भाग 1

  कतार हा पश्चिम आशियामध्ये स्थित असलेला देश... कतारच्या दक्षिणेला आहे सौदी अरेबिया, तर बाकी तीन बाजूनी कतार पर्शियन आखाताने वेढलेला आहे, तसंच बहरिनची सीमासुद्धा कतारला जाऊन मिळते. कतार हा आजच्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबर 1971 ला अधिकृतरित्या ब्रिटनकडून स्वतंत्र झाला. आज आपल्याला गम्मत वाटेल पण कतारच्या अधिकृत नागरिकांपेक्षा कतारमध्ये बाहेरून आलेल्या परकीय नागरिकांची संख्या ज्यास्त आहे, यात मुख्यतः नोकरदार वर्गाचा समावेश होतो. कतारमधल्या नागरिकांची संख्या जवळपास 3,00,000 एवढी आहे, तर बाहेरच्या देशांमधून कतारमध्ये कामासाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांची संख्या आहे 23,00,000... कतारमध्ये राजेशाही व्यवस्था आहे... साधारणतः 19व्या शतकापासून अल थानी कुटुंबाकडे या देशाची सत्ता आहे. सध्या थानी कुटुंबातले आठवे एमिर सत्तेवर आहेत. 1868 साली मोहम्मद बिन थानी यांनी ब्रिटिश सरकारबरोबर करार केला, त्यानुसार थानी कुटुंबाकडे देशाची सत्ता असेल असं स्पष्ट उल्लेख आहे. सध्याचे थानी कुटुंबातले, तामीम बिन हामाद अल थानी हे कतारचे राजे आहेत, त्यांनी त्यांच्या वडिलांकडून 2013 साली सत्ता हस्तगत केली. मागच्या काही व

आणि दुसरं महायुद्ध संपलं...!

  काही घटना इतिहासात घडून त्यामुळे भूगोल बदलून जातो, आणि मग आज विचार केला तर लक्षात येतं की अश्या घडामोडी इतिहासात कश्या काय घडल्या असतील...कुठलही युद्ध हे मानवी इतिहासातलं सगळ्यात मोठं दाहक वास्तव आहे, जे त्यात्या काळानुसार बदलत गेलं, पण मानवसंहार होत राहिला, याला कारण म्हणजे माणूस प्राण्याची मानसिकता, अजून ज्यास्त प्रमाणात संपत्ती मिळवण्याची लालसा, या सर्व गोष्टी वारंवार घडल्यामुळे आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचं साधन म्हणून, युद्ध, उठाव, बंडखोरी, यादवी या सगळ्या संकल्पना अस्तित्वात आल्या... जिथे मानवी हस्तक्षेप आहे तिथे संघर्ष अटळ आहे, मग तो साम्राज्यासाठी असो, किंवा मिळालेल्या भूभागापैकी असमाधानी राहून, संपत्तीची लालसा ठेवून, किंवा अधिकार गाजवण्यासाठी असो, एकच सत्य आपल्याला समोर वारंवार प्रत्ययास येतं ते म्हणजे, मानवी जीवनात संघर्ष अटळ आहे, तो साम्राज्यासाठी असो, किंवा जमिनीच्या तुकड्यासाठी असो, किंवा मग पैशासाठी असो... आधुनिक काळात मानव प्राण्याच्या इतिहासात आणि तो सुद्धा 20 व्या शतकात संघर्ष कुठं झाला असेल तर तो पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यांच्या स्वरूपात झाला. 2 सप्टेंबर

लिबियातली बंडखोरी आणि कर्नल मुअमर गद्दाफी

  लिबिया मघरेब भागातला एक उत्तर आफ्रिकेतील देश... उत्तरेला भूमध्य समुद्र, पूर्वेला इजिप्त, तर दक्षिणेला चाड, आणि पश्चिमेला अल्जेरिया! ट्रिपोली ही लिबियाची राजधानी. तसं पूर्वी म्हणजे 1947 पर्यंत आधुनिक लिबिया हा देश इटालियन वर्चस्वाखाली होता. 10 फेब्रुवारी 1947 ला लिबिया स्वतंत्र झाला. 1969 ला लिबियाच्या इतिहासात महत्वाची घटना घडली. या घटनेमागे जी व्यक्ती होती ती पुढे जाऊन जागतिक इतिहासात म्हटलं तर विख्यात किंवा कुख्यात म्हणून प्रसिद्ध पावणार होती. इंग्रजी मध्ये त्याला कल्ट पर्सन्यालिटी अस म्हणू शकतो, इतका त्या व्यक्तीचा प्रभाव लिबियाच्या राजकारणावर पडणार होता. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे कर्नल मुअम्मार गद्दाफी... हा गद्दाफी साधासुधा नव्हता... लहानपणापासूनच त्याला राजकारणाची आवड होती. त्याला अरब देश संघटित व्हावे आणि आपली छाप पाडावी असं त्याला वाटत होतं. तरुण असताना त्याने लिबियातल्या राजेशाही विरुद्ध आवाज उठवला. गद्दाफिने सैन्यात भरती होण्याचं ठरवलं. आणि तो सैन्य दलात गेला सुद्धा. 1 सप्टेंबर 1969 ला म्हणजे आजच्या दिवशी, फ्री युनिअनिस्ट ऑफिसर्स मूव्हमेन्ट असं स्वतःला म्हणणाऱ्या सिग्नल कॉर

त्साई इंग वेन- तैवानच्या पोलादी स्त्री... !

  रिपब्लिक ऑफ चायना म्हणजेच तैवान या छोट्या देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष, तसंच तैवानच्या सातव्या अध्यक्ष, महाकाय चीनला न जुमानंणाऱ्या, तैवानच्या गोलडा मायर, चीनविरुद्ध प्रखर भूमिका घेणाऱ्या, भारताबद्दल आस्था असणाऱ्या अश्या तैवानच्या पोलादी स्त्री म्हणजेच त्साई इंग वेन, यांचा आज वाढदिवस...त्यांचा जन्म 1956 सालचा... त्साई यांचं बालपण तैवानमधल्या तैपई इथं गेलं. त्यांना 6 भावंडं, एका चांगल्या कुटुंबातला त्यांचा जन्म... त्यांनी कायदा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयात शिक्षण घेतलं. LLB त्यांनी नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीतुन पूर्ण केलं, तर LLM कॉर्नेल लॉ स्कुल मधून पूर्ण केलं. पुढे त्या प्रसिद्ध अश्या लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकल्या, आणि त्यांनी कायदा या विषयात युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधून डॉक्टरेट पदवी मिळवली... काही वर्षे त्यांनी सु चौऊ युनिव्हर्सिटी आणि नॅशनल चेंगची युनिव्हर्सिटी इथे कायदा विषयाच्या प्राध्यापक म्हणून काम केलं. पुढे जाऊन यांच्याजवळ असणाऱ्या कायद्याच्या ज्ञानामुळे, प्राविण्यामुळे त्यांना WTO मध्ये वाटाघाटी करण्यासाठी तैवानकडून अधिकृत व्यक्ती म्हणून पाठवण्यात आलं. इसवी

ओरॅकल ऑफ ओंमाहा अर्थात वॉरेन बफे

  जो माणूस अजूनही स्मार्ट फोन वापरत नाही, विकत घेतलेली जुनीच गाडी चालवतो, 1958 साली 31,500 डॉलरला घेतलेल्या जुन्याच घरात आजही राहतो आणि रोज ब्रेकफास्ट मॅक्डोनाल्ड्स मध्ये बर्गर आणि कोक पिऊन करतो, आणि ज्याचं रोजच्या ब्रेकफास्टचं बिल 3.17 डॉलरच्यावर नसत असा हा जगात राहूनही जगावेगळा असतो अश्या वॉरेन बफे यांचा आज वाढदिवस... बफे यांचा जन्म 1930 चा... स्थळ ओमाहा, नेब्रास्का या राज्यातला. वडील हॉवर्ड हे गुंतवणूक दलाल म्हणून काम करत होते, तसच चार वेळा अमेरिकी काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे खासदार होते. वॉरेन बफे याना दोन बहिणी. बफेनी वयाच्या 11 व्या वर्षी आयुष्यातली पहिली गुंतवणूक केली. सिटीज सर्व्हिस या तेल कंपनीचे 3 शेअर प्रत्येकी 38 डॉलरला विकत घेतले. आणि 40 डॉलरला ते शेअर विकले, त्यांना प्रति शेअर 2 डॉलरचा फायदा झाला. जेंव्हा या सिटी कंपनीचे शेअर प्रति शेअर 200 डॉलर इतके झाले तेंव्हा आयुष्यातला गुंतावणुकीतला पहिला धडा शिकले तो म्हणजे गुंतावणूकदाराकडे प्रचंड पेशन्स पाहिजे. वयाच्या 6 व्या वर्षी बफेनी च्युइंग गम विकलं, तसाच पुढे जाऊन घरोघरी कोका कोलाच्या बाटल्या विकल्या. वयाच्या 13 व्या वर्ष

एका माणसाची गोष्ट

  सोशल मीडियाचा जमाना आल्यामुळे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कुठेही आपल्याला इंटरनेटमुळे जगाचा वेध घेता येतो. अनेक देशोदेशींच्या बातम्या एका क्लिकद्वारे आपल्याला कळू शकतात. आजच्या टेकसेव्ही जगात मीडिया या शब्दाला खूप महत्व आहे, मग तो मीडिया म्हणजे सोशल मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो... कधीही इतकी गरज आजच्या आमच्या तरुण पिढीला मीडियाची लागली नाही जेवढी ती आज लागली आहे. बरं आता तर फक्त तरुणाईचं फेसबुक वॉट्स ऍप आणि इन्स्टाग्राम वापरते असा नाही तर जे वयोवृद्ध आहेत, आपल्या आई वडिलांच्या वयाचे आहेत, किंवा काही काही तर आजी आजोबांच्या वयाचे आहेत, त्यांचेसुद्धा अकौंट्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आहेत. या नवीन सोशल मिडियाच आकर्षण लहान ते वृद्ध अश्या सगळ्या वयोगटाला आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या ज्या काही व्हायरल गोष्टी आहेत, त्या आपल्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेटद्वारे कळू शकतात. हा जो काही व्हायरल होणं प्रकार आहे, त्याने तर कित्येक सामान्य माणसांनाही सेलिब्रिटी बनवून टाकलं आहे. म्हणून काय कुठे केंव्हा कशी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा भरोसा नाही. अशीच एका व्यक्तीची व्हि

युद्ध, युद्ध आणि युद्धच!

युद्धाबद्दलच्या गोष्टी ऐकायला खूपच मजा येते. पण युद्ध मानवी जीवनावर काय परिणाम करू शकतं या बद्दल जर जाणून घेतलं तर कुठल्याही प्रकारच युद्ध नको रे बाबा अशीच आपली भावना होईल. आणि त्यात महायुद्धाबद्दलच्या कहाण्या ऐकल्या कि युद्ध नकोच अशीच बऱ्याच जणांनी भावना होईल. खासकरून पहिलं आणि दुसरं महायुद्ध याबद्दल जर सविस्तर माहिती घेतली तर आपल्याला वाटेल, का हि युद्ध लढली गेली, का इतका मानावसंहार झाला... युरोपातील अर्थव्यवस्था देशोधडीला लागल्या... लोकांची आयुष्य उध्वस्त झाली... जपानवर अणुबॉम्ब टाकल्या नंतर जे लोक वाचले ते तर आयुष्यभराठी अधू झाले, कोणी बहिरे झाले तर कोणाला व्याधी जडल्या... थोडक्यात युद्धाचे लोकांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम झाले. युद्धानंतर परत आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी विविध देशांना शून्यातून तो देश उभा करावा लागला. 20 व्या शतकात तर अनेक देशांचा असा समज होता की युद्ध हे आपला भौगोलिक क्षेत्रफळ वाढवण्यासाठीचा एक उपायच होता. युद्ध करणं म्हणजे कुठलीतरी चांगली गोष्ट करण्यासारखं आहे असासुद्धा लोकांचा समज होता. दुसऱ्या महायुद्धदारम्यान अनेक बलाढ्य राष्ट्र एकमेकांना भिडली... दोन गट

अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आणि तालिबान!

  आता कुठे अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था सावरत असताना, चिंता वाटणारी गोष्ट घडली, ती म्हणजे तालिबान परत एकदा सत्तेवर स्वार झाले, आणि आपली कुकर्म चालू ठेवत इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान असा नावाचा बदल करत पुढे काय घडू शकतं याची झलकंच तालिबानने दाखवली. अफगाणिस्तान बद्दल अत्यंत कुचकामी धोरण ठेवलेल्या बायडेंन प्रशासनाला तालिबानने हिसका दाखवला. सुरवातीला बायडेंन यांनी अफगाणिस्तानातून सैन्य माघारी बोलावताना हा निर्णय त्यांच्या आधीच्या ट्रम्प प्रशासनाने कसा घेतला या बद्दल विधानं केली. या तडकाफडकी सैन्य वापसिने तालिबानला मोकळं रान मिळालं आणि सैन्य संख्येच्या बाबतीत अफगाणिस्तानच सैन्यबळ मोठं असूनसुद्धा काही हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. 29 फेब्रुवारी 2020 ला कतार मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार झाला. पण गोष्टी इतक्या पटकन घडतील आणि अमेरिकेपेक्षा तालिबान वरचढ होईल आणि एकदम काबुल पादाक्रांत करेल हे खुद्द अमेरिका आणि बायडन प्रशासनालासुद्धा वाटलं नाही. ताज्या बातम्यांनुसार तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर अगदी काही तासांमध्ये त्यांच्या विरुद्ध अफगाणी जनता, खासकरून महिल

अशांत अफगाणिस्तान...!

हा फोटो आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष धाकटे जॉर्ज बुश साहेबांचा...ठिकाण एमा बुकर प्राथमिक शाळा, सारसोटा, फ्लोरिडा. तारीख 11 सप्टेंबर 2001. जॉर्ज बुश हे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या कामाविषयी त्यांच्या तत्कालीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती देण्यासाठी एमा बुकर या फ्लोरिडा राज्यातल्या सारासोटा इथल्या शाळेत भेट द्यायला गेले होते. सकाळची वेळ होती, बुश शाळेत दाखल, झाले. सगळे व्यवहार व्यवस्थित चालू होते. क्षणार्धात परिस्थिती इतकी बदलेल आणि काही अघटित घडेल याची सुतराम शक्यता वाटली नाही. यासुमारास बुश याना वल्ड ट्रेड सेंटर च्या पहिल्या विमान हल्ल्याबद्दल ब्रिफ करण्यात आले. सुरवातीला एखादं छोटं विमान धडकलं असेल असं वाटून त्याकडे ज्यास्त लक्ष दिलं गेलं नाही. त्यानंतर, बुश दुसरीतल्या विद्यार्थ्यांना धडा वाचून दाखवत होते. तेवढ्यात अचानक व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ अँड्र्यू कार्ड, बुश यांच्या जवळ आले, आणि कार्ड यांनी बुश यांच्या कानात हळूच सांगितले, ते शब्द होते, " दुसऱ विमान वल्ड ट्रेड सेंटरच्या दुसऱ्या इमारतीवर धडकलं आहे, अमेरिकेवर हल्ला झाला आहे" . अगदी त्याच क्षणी टिपलेला हा फोटो आ

वँग यी – जेष्ठ चीनी मुत्सद्दी

वँग यी यांची खूप मोठी ओळख करून द्यायची गरज नाही. त्याचं नांव आपण चीन संदर्भातल्या बातम्यांबरोबर    वाचत असू. वँग यी म्हणजे तीच व्यक्ती जिने चीनची बाजू डोक्लाम संदर्भात मांडली होती आणि डोक्लाम प्रश्नावर कठोर भूमिका घेतली होती. भारतासंदर्भात बोलायचं झाल्यास भारताचे जे सद्य परराष्ट्र सचिव आहेत, विजय गोखले, यांनी डोक्लाम वाटाघाटींदरम्यान महत्वाची भूमिका बजावली होती असे म्हटले जाते. विजय गोखले तेंव्हा परराष्ट्र सचिव नव्हते. असो. तर वँग यी हे चीनचे परराष्ट्र मंत्री! नुकतीच त्यांची चीनच्या ‘स्टेट कौन्सिलर’ पदी नियुक्ती झाली आहे. वँग यी यांच्याकडे दोन जबाबदाऱ्या आल्या आहेत आता. एक तर परराष्ट्र मंत्री पदाची जबाबदारी आणि दुसरी म्हणजे स्टेट कौन्सिलर पदाची जबाबदारी. अश्या जबाबदाऱ्या असणारे वँग यी ही मागच्या काही वर्षातली पहिली व्यक्ती आहे. वँग यी यांना उत्तम जपानी भाषा आणि इंग्रजी भाषा बोलता येतं. ते अमेरिकेतल्या जॉर्ज टाऊन विद्यापीठात काही काळ व्हिजिटिंग स्कॉलर सुद्धा होते. तसंच मागच्या दोन वर्षात त्यांचे चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. बर्याच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर यी

भारतीय वायुदल आणि संरक्षण सिद्धता... !

  एका अहवालनुसार भारतीय वायुदलाकडे असणारे सर्व प्रकारचे रिसोर्सेस कमी आहेत किंवा कमी होत चालले आहेत. उदाहरणार्थ. फायटर विमानांची संख्या , स्क्वाड्रंस ची संख्या , आकाशात इंधन भरण्यासाठी असणार्‍या एअर टँकर्स ची संख्या , क्षेपणास्त्र , रडार प्रणालीसाठी वापरण्यात येणारी व्यवस्था इत्यादि. खरं म्हणजे एक मुद्दा उपस्थित होतो , आणि वारंवार चर्चिला जातो तो म्हणजे संरक्षणावर एखाद्या देशाला इतका खर्च करण्याची आवश्यकता आहे का ? हे हजारो कोटी रुपये देशाच्या विकास कामांमध्ये सुद्धा खर्च करता येऊ शकतात. देशाला संरक्षण करण्याची आवश्यकताच नको भासायला... आजही स्वित्झर्लंड सारख्या देशाला स्वतःची आर्मी असून ते फक्त गरजेपुरतच त्याचा उपयोग करतात . त्यांचे सराव चालू असतात. आर्मीला बोलवण्याची फारच कमी गरज पडते. नव्हे नाहीच. आज व्हाटिकन ची सुरक्षा , पोप ची अंतर्गत सुरक्षा , हे सगळं सांभाळणारे स्वीझ गार्डस आहेत. ... असं म्हणतात डेन्मार्कमध्ये जेल बंद करण्याची वेळ आली आहे कारण तिथे गुन्हेच घडत नाहीत , त्यामुळे गुन्हेगार कुठून येणार , म्हणून मग तुरुंग बंद करण्यात येतात. विकसित देशांमध्ये खासकरून पाश्चि