मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'ए ब्युटीफुल मायिंड' अर्थात जॉन नॅश !

  काल सगळ्या आंतरराष्ट्रीय मिडीया वर एक दु:खद बातमी झळकून गेली. बातमी होती, एक व्यक्ती आणि त्याच्या पत्नीचा अमेरिकेतल्या न्यू जर्सीमध्ये कार अपघातात मृत्यू. ही व्यक्ती म्हणजे जॉन नॅश. जॉन नॅश बद्दल फारस लोकांना माहिती असण्याच कारण नाही. जॉन नॅश हे नाव मुळात अर्थशास्त्राशी निगडीत असलेल. तसंच गणितीय जगात सुद्धा हे नाव परिचित असेल. पण सामान्य माणसाला हे नाव नवीन आहे. आता हा जॉन नॅश कोण? असा काही लोकांना प्रश्न पडला असेल. जॉन नॅश ही तशी असामान्य बुद्दीमात्तेची व्यक्ती. त्यांच्या घरात पहिल्यापासून शिक्षणाला उत्तेजन देण्याचे वातावरण होते. आई वडील दोघेही शिकलेले. सुरवातीला पिट्सबर्ग विद्यापीठात शिक्षण घेऊन मग जॉन यांनी गणिताकडे आपली गाडी वळवली. त्याधी त्यांनी रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले. मग पुढे जाऊन प्रीन्स्टन या नामांकित विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 'गेम थिअरी' विकसित केली. याच त्यांच्या गेम थिअरीला अर्थशास्त्रातले 'नोबेल' मिळाले. हि गेम थिअरी व्युव्हात्मक निर्णयाशी जोडली गेली आहे. या गेम थिअरीत दोन अत्यंत हुशार व रॅशनल निर्णय घेणा-या व्यक्ती एकमेकांशी सहकार्य आणि संघर्षा

अर्थशास्त्रातील विचारप्रवाह - २

  फिजीओक्रॅटस चे योगदान !   मर्कनटॅलीजमच्या विरुध्द जाणारा आणि अर्थशास्त्रात एक मुलभूत स्वरूपाचे योगदान देणारा विचार प्रवाह म्हणजे फिजीओक्रसी. हा विचार प्रवाह फ्रांस मध्ये साधारणतः अठराव्या शतकात उदयास आला. झालं अस कि मर्कनटॅलीजमची हवा ओसरू लागल्यानंतर तसच मर्कनटॅलीजमच्या नियमांचा जवळपास कंटाळा आल्यानंतर फिजीओक्रसी या वेगळ्या वाटणाऱ्या आर्थिक विचारांनी लोकांचे लक्ष वेधले. लोकांना आता सोनं चांदी गोळा करा , वसाहती स्थापन करा , संपत्ती कमवा , व्यापारावर बंधने लादा या सगळ्या गोष्टींचा अगदी कंटाळा आला होता. यातून आपली सुटका कशी होईल आणि एक नवीन आर्थिक पद्धती कशी आणता येईल यासाठी मग प्रयत्न सुरु झाले. गम्मत म्हणजे या फिजीओक्रॅटसना स्वतःला अर्थतज्ञ म्हणून घ्यायला खूप आवडे.   मर्कनटॅलीजमच्या विरुध्द आवाज उठवणारा आणि आम्हाला बंधनातून मुक्त करा असा जणू नाराच देणारी व्यक्ती म्हणजे गुर्ने. याला फिजीओक्रॅटस चळवळीचा आघाडीचा नेता म्हणता येईल. त्याची वाक्य इतिहासात खूपच प्रसिद्ध झाली आणि त्याच्या या ब्रीद्वाक्याने आधुनिक अर्थशास्त्राचा पाया रचला असं आपण म्हणू शकतो. हे ब्रीदवाक्य म्हणजे ' ल

अर्थशास्त्रातील विचारप्रवाह- 1

  मर्कनटॅलीजमचा उदय !   ब-याच लोकांना अर्थशास्त्र म्हणजे फारच काहीतरी भयंकर वाटतं. काही अंशी ते खरं जरी असलं तरी अगदी ते न कळण्या इतपत अवघड नाही. हं जर आपण अर्थशास्त्रात गणित आणि संख्याशात्राचा वापर करून मोडेल्स तयार करायची म्हटलं तर ते थोडं अवघड काम आहे. अर्थशास्त्राचे अनेक प्रकार आहेत , अंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र , व्यष्टी अर्थशास्त्र ( Micro Economics), समष्टी अर्थशास्त्र ( Macro Economics), गणितीय अर्थशास्त्र , सार्वजनिक अर्थशास्त्र ई. आता अर्था शास्त्राचे वेगवेगळे प्रकार आहेत असं म्हटल्यावर त्यात विविध विचारप्रवाहसुद्धा आलेच.   यातलाच एक प्रमुख विचार प्रवाह म्हणजे मर्कनटॅलीजम ! मर्कनटॅलीजम हा प्रकार सोळावे शतक ते अठरावे शतक या दरम्यान मुख्यत्वेकरून युरोपात लोकप्रिय झाला. या मर्कनटॅलीस्ट लोकांचे साचेबद्ध असे विचार होते. व्यापार करून सोने चांदी भरपूर प्रमाणात साठवून श्रीमंत होण्याकडे त्यांचा कल होता. मर्कनटॅलीजमच्या वैशिष्ट्यांमध्ये अनेक गोष्टी सांगता येतील. यात वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या वसाहती निर्माण करणे , मक्तेदारी निर्माण करणे , त्याच प्रमाणे निर्यातीला अनुदान देणे आण

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाहरणार

आधुनिक व्यापारातील संकल्पना -1

  व्यापारातील संरक्षण !   दोन देशांचा एकमेकांशी व्यापार ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील एक मुलभूत स्वरुपाची संकल्पना आहे. व्यापाराचे महत्व तसे जुनेच. फरक एवढाच आहे कि पूर्वी व्यापार हा समुद्र मार्गाने व्हायचा तर आज तो हवाईमार्गानेपण होतो. अनेक तज्ञांना असे पुरावे मिळाले आहेत कि भारताचा व्यापार अगदी पार इजिप्त पर्यंत पसरला होता. तिथे अनेक वस्तू उत्खननात सापडल्या आहेत आणि त्या वस्तूंवरून , त्या अस्सल भारतीय आहेत , असे समजते. आपल्या सगळ्यांना पूर्वी सिल्क रुट नामक एक मार्ग होता , ज्याने आपला आणि मध्य आशिया , विशेषतः चीनशी आपला आर्थिक व्यवहार चालायचा , हे माहित असेलच. पण आज व्यापाराचे स्वरूप जरा क्लिष्ट झाले आहे. यात अनेक विचारप्रवाह आले आहेत आणि एक विचारप्रवाह जणू आधुनिक मर्कनटॅलीजमच वाटावा असा आहे. मर्कनटॅलीजम मध्ये आपण हे पाहीलेच कि व्यापाराला संरक्षण देणे तसेच , सोने चांदी गोळा करणे आवश्यक. पण , असं करत असताना हे सोनं चांदी बाहेर जाणार नाही आणि इतर देशांना मिळणार नाही याचीहि काळजी घेणे असा स्वार्थी दृष्टीकोण या आर्थिक विचारसरणीमध्ये होता. अश्याच काही स्वरूपाचा ज्याला मर्कनटॅलीजम

डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन!

  दहशतवाद हा जगाला आज नवीन राहिलेला नाही. ९/११ च्या हल्ल्यानंतर सगळे जग जागं झालं. भारतासारख्या देशाने दहशतवाद फार पूर्वीच काश्मीर च्या निमित्ताने पाहिलेला आहे. जगात आज अनेक विषय ज्वलंत आहेत, मग ते राजकीय असो अथवा आर्थिक किंवा सामाजिक . दहशतवाद हा विषय जवळपास या तीनही विषयांशी निगडीत आहे आणि त्याचा सामना नाईलाजाने सैनिकी कारवाईनेच करावा लागतो. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. काही निरपराध लोकसुद्धा प्रसंगी मारले जातात. पण सैनिकी कारवाई हा शेवटचा पर्याय असतो.   आता पर्यंत जगात अनेक सैनिकी कारवाया गाजल्या. त्यातल्या काही प्रसिद्ध पण झाल्या. यात दुस-या  महायुद्धातल्या कारवायांचा सुद्धा समावेश आहे. काही कारवाया शीतयुद्धात गाजल्या. काही मोजक्या कारवायांबद्दल सांगायचं झाल्यास ह्या सैनिकी कारवाया काही मिनिटांच्या होत्या, त्यातलीच एक म्हणजे डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन! इटलीच्या एलिट  म्हणजेच सर्वोत्तम कमांडोंच्या मदतीने केलेली अमेरिकेच्या नाटोस्थित एका सर्वोच्च सैनिकी अधिका-याला वाचवायची कारवाई. या एका विशेष युनिटने भाग घेतला. या युनिटचे नाव - इटालीअन अँटी टेरोरीस्त नुक्लिव ओपेरातीव से

युरोपीय महासंघ आणि जर्मनीची अधिकारशाही

          युरोपीय महासंघ आणि जर्मनी याचं एक घट्ट नातं आहे. युरोपीय महासंघ स्थापन करण्यात आणि युरो हे चलन आणण्यात, खुद्द जर्मनीचा पुढाकार होता. जवळपास दोन दशकांपूर्वी युरो चलन वापरात आले. अश्या वेळेस जर्मनीने महासंघाची सूत्र हातात घेऊन कारभार करणे म्हणजे काही आश्चर्यकारक गोष्ट नाही हे समजावून घ्यायला पाहिजे. या सगळ्याचा संबंध जर्मनीच्या अर्थकारणापाशी केंद्रित होत आहे. खरंतर युरोपीय महासंघामध्ये बोलबाला हा पश्चिम युरोपीय देशांचा आहे आणि असा एक समाज आहे कि युरोपीय महासंघाची धोरणं ठरवण्यामध्ये मुख्यत्वेकरून तीन देशांचा वाटा आहे, ब्रिटन, फ्रांस आणि जर्मनी. पण केवळ आर्थिक मजबुतीच्या जोरावर पुन्हा सामर्थ्यशाली युरोप निर्माण करण्याचा संकल्प जणू जर्मनी करत आहे आणि त्यासाठी युरोपीय महासंघावर पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.          जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय प्रवेशाची पार्श्वभूमी         दोन्हीही महायुद्धात सर्वस्व पणाला लावलेला युरोप खंडाचा मोठा शिलेदार म्हणजे जर्मनी. पहिल्या महायुद्धात हार पत्करावी लागल्यानंतर, त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी आणि जर्मनीला गतवैभव परत मिळवून देण्यासाठीचा

सर विन्स्टन चर्चिल - एक मुत्सद्दी राजकारणी.

  इंग्लंड ची भिस्त दुस-या महायुद्धात ज्यांच्याकडे नेविल चेम्बरलेन यांच्यानंतर सोपवली गेली आणि ज्यांनी ती कामगिरी फत्ते केली , असा हा दुस-या महायुद्धातील जगाचा शिल्पकार म्हणजे विन्स्टन चर्चिल. याच महिन्यामध्ये चर्चिल १९४० ला इंग्लंड चे प्रधान मंत्री झाले. त्यांचे पूर्ण नाव सर विन्स्टन लेओनार्ड स्पेन्सर चर्चिल. चर्चिल यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील लॉर्ड रँडोल्फ चर्चिल एक प्रभावी राजकारणी होते. ते Chancellor of the Exchequer होते , म्हणजे ज्याला आताच्या भाषेत वित्त मंत्री किवा अर्थ मंत्री म्हणता येईल. त्यांची आई जेनी जेरोम अमेरिकन सोशलाईट (फॅशन जगताशी निगडीत) होत्या. अशा अर्थाने ते एका बड्या आणि चांगल्या घरातून आले होते.   घरातल्या राजकीय वातावरणाचा चर्चिल यांच्यावर खूप प्रभाव होता. तासंतास घरी येणा-या लोकांचे त्यांच्या वडिलांशी होत असलेले संम्भाषण ते मग्न होऊन ऐकत. इथेच त्यांच्यावर एक अस्सल राजकारणी होण्याचा संस्कार झाला.   चर्चिल यांनी काही काळ आर्मी मध्ये ऑफिसर म्हणून सेवा केली. त्यांच्याकडे विविध जबाबदा-या देण्यात आल्या. ते काही वर्ष भारतात देखील राहिले , नंतर ते

आणि ट्रॅफिक सुरू झाली – सुएझ कालवा.

  23 मार्च 2021 या दिवशी एव्हर गिव्हन हे महाकाय मालवाहू जहाज 7.40 या इजिप्तच्या स्थानिक वेळेनुसार सुएझ कालव्यात अडकून पडलं होतं. हे जहाज अगदी नाट्यमयरित्या अश्या पद्धतीने कालव्यात अडकून पडलं आणि रुतून बसलं की तिरपं झाल्यामुळे सुएझ कालवा जवळपास जलवाहतुकीसाठी जणू बंदच झाला. हे जहाज त्यावेळी ‘ मनशीयेत रुगोला ’ या गावाजवळ कालव्याच्या किनार्‍यात अडकून बसलं. जवळपास सहा दिवस उलटून गेले तरीसुद्धा फसलेलं जहाज बाहेर काढण्यात अपयश येत होतं. एव्हर गिव्हनला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू होते. 14 टग बोटी या मोहिमेत जुंपल्या होत्या. टग बोटींचा उपयोगच मुळी मोठ्या जहाजाना बंदराच्या क्षेत्रात त्यांचे जहाज पार्क करण्यासाठी होतो. तसच दिशा दाखवण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. तर अश्या प्रकारे या टग बोटी रात्रंदिवस असं जवळपास 6 दिवस एव्हर गिव्हनला केबल द्वारे पाण्यात आणण्यासाठी ओढत होत्या , तर काही टग बोटी एव्हर गिव्हनला अक्षरशः पाण्यात ढकलत होत्या. या टग बोटींचा वेग खूप असल्यामुळे त्या त्यांची ताकद वापरुन जहाज ओढत तरी होत्या किंवा ढकलत तरी होत्या. हे काम रात्रंदिवस सलग सहा दिवस चालू होते. या