मुख्य सामग्रीवर वगळा

डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन!

 दहशतवाद हा जगाला आज नवीन राहिलेला नाही. ९/११ च्या हल्ल्यानंतर सगळे जग जागं झालं. भारतासारख्या देशाने दहशतवाद फार पूर्वीच काश्मीर च्या निमित्ताने पाहिलेला आहे. जगात आज अनेक विषय ज्वलंत आहेत, मग ते राजकीय असो अथवा आर्थिक किंवा सामाजिक. दहशतवाद हा विषय जवळपास या तीनही विषयांशी निगडीत आहे आणि त्याचा सामना नाईलाजाने सैनिकी कारवाईनेच करावा लागतो. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. काही निरपराध लोकसुद्धा प्रसंगी मारले जातात. पण सैनिकी कारवाई हा शेवटचा पर्याय असतो.  

आता पर्यंत जगात अनेक सैनिकी कारवाया गाजल्या. त्यातल्या काही प्रसिद्ध पण झाल्या. यात दुस-या  महायुद्धातल्या कारवायांचा सुद्धा समावेश आहे. काही कारवाया शीतयुद्धात गाजल्या. काही मोजक्या कारवायांबद्दल सांगायचं झाल्यास ह्या सैनिकी कारवाया काही मिनिटांच्या होत्या, त्यातलीच एक म्हणजे डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन! इटलीच्या एलिट  म्हणजेच सर्वोत्तम कमांडोंच्या मदतीने केलेली अमेरिकेच्या नाटोस्थित एका सर्वोच्च सैनिकी अधिका-याला वाचवायची कारवाई. या एका विशेष युनिटने भाग घेतला. या युनिटचे नाव - इटालीअन अँटी टेरोरीस्त नुक्लिव ओपेरातीव सेन्ट्रल दि सिकुरेझ्हा (NOCS). यांना लेदरहेड कमांडो स्क़्वॅड असं पण म्हटलं जातं. लेदरहेड अश्यासाठी कि हे कमांडो लेदरची हेल्मेट्स घालतात. या सैनिकी कारवायीला विशेष असं काही नाव नाही.      

 अमेरिकेचा अपहरण झालेला सर्वोच्च सैनिकी अधिकारी ब्रिगेडीअर जनरल जेम्स डॉझीअर - एक अत्यंत लढवय्या आणि निष्णात सैनिक होता. अमेरिकेच्या दृष्टीने तो खरं तर हिरोच होता. व्हिएतनाम युद्धातील त्याच्या पराक्रमामुळे त्याला सिल्वर स्टार, ब्राँझ स्टार आणि पर्पल हार्ट या महत्वाच्या पदकांनी त्याचा गौरव केला होता. व्हिएतनाम मध्ये डॉझीअर ११ व्या आर्मर्ड कॅवालरी रेजिमेंट मध्ये मोठा पराक्रम गाजवून आला होता. पण त्याच्या वर व्हिएतनाम युद्धात मोठं हत्याकांड केल्याचे आरोप झाले आणि हेच त्याच्या अपहरणाचे कारण बनले.

 १७ डिसेंबर १९८१. काही रेड ब्रिगेडच्या सदस्यांनी डॉझीअरला वेरोना येथे असलेल्या नाटोच्या सदर्न कमांड मधून बोट ट्रंक मधून ७७ किलोमीटर पूर्वेला असलेल्या पाडूआला पकडून नेलं. त्याला मग हातकड्या ठोकून एका कॅम्पमधल्या पलंगाला अडकवून तंबूत ठेवलं.

इटालीयन पोलिसांनी मग धागेदोरे शोधण्याचा सपाटा लावला. रोम शहराच्या मध्यभागी लपलेल्या २ दहशतवाद्यांना पोलिसांनी पकडलं. याचा नंतर शोध घेण्यात आला आणि नंतर असं समजलं कि हे २ दहशतवादी अजून एका महत्वाच्या व्यक्तीचे अपहरण करणार होते. पोलिसांनी कारवाई सत्र असच पुढे चालू ठेवून रेड ब्रिगेडच्या शहरातल्या ३ महत्वाच्या ठिकाणांवर छापे घातले. ५ संशयित दहशतवाद्यांना त्याच सुमारास शहराच्या उत्तर भागातून पकडण्यात आले. आता हळू हळू मग पोलिसांना हेरांकडून टीप मिळायला लागल्या आणि पोलिसांना मग पाडूआतल्या एका वाय पिंदेमोंत रस्त्यावरच्या इमारतीवर संशय आला. इटालीअन हेरांनी मग कमांडो कारवाइच्या १२ तास आधी अचूक स्थळ शोधले. त्यावेळी एक योजना आखण्यात आली, आणि त्यात ठरवण्यात आले कि, हि कमांडो कारवाई रात्री करायची, पण यात मोठा अडथला असा होतं कि रात्री डॉझीअरला ओळखणार तरी कसा आणि त्यात तो मारला गेला तर? मग याच कारणामुळे हि वेळ रद्ध करण्यात आली आणि दुसरी योजना आखण्यात आली.

सैनिकी कारवाई अखेर पहाटे करण्याचे ठरले. वाय पिंदेमोंत रस्त्यावर ८० साध्या वेशातले पोलीस हळू हळू फिरायला लागले जणू काही हे रस्त्यावरचे लोक आपापल्या कामासाठी बाहेर पडले आहेत असे दृश्य तयार करण्यात आले. साधारण ११.३० च्या सुमारास एक बांधकाम मजुरांच्या वेशातले पोलीस पथक आले, त्यांच्या बरोबर त्यांनी बुलडोझर पण आणले होते म्हणजे गोळ्यांचा जरी आवाज झाला तरी ह्या बुलडोझर च्या आवाजामुळे तो काही कोणाला कळणार नाही. हळूहळू मग रस्त्यावरच्या नागरिकांना बाजूला हटण्यास सांगण्यात आले आणि पूर्ण रस्ता रिकामा केला. अश्यातच एक हिरव्या रंगाची रेस्क्यू स्क़्वॅड ला घेऊन जाणारी व्हॅन त्या नेमक्या इमारतीजवळ धाडण्यात आली. त्यातून मग मास्क घातलेले आणि काळ्या रंगाच्या एम १२ बंदुका घेऊन दहा कमांडो सावकाश उतरले. त्यातल्या एकाने सुपार्मार्केत कडून इमारतीकडे जाणारा रस्ता बंद केला. उरलेले ९ कमांडो दुस-या मजल्यावर कैदेत ठेवलेल्या डॉझीअरच्या दिशेने निघाले. हे कमांडो धडकन दार उघडून घुसले. या खोलीत एकूण रेड ब्रिगेडचे ५ दहशतवादी होते. त्यातला एकजण चमकला आणि मग त्याच्या कपाळावर कराटेची एक लाथ बसून खाली पडला. त्वरेने दुसरा दहशतवादी डॉझीअरच्या खोलीकडे गेला आणि त्याने डॉझीअरकडे पिस्तुल रोखून धरली, पण काही कळायच्या आतच एका इटालीअन कमांडोने बंदुकीच्या मागच्या भागाने त्याच्या हातातली पिस्तुल खाली पाडून त्याला जमिनी वर जोरात आपटवले, हा प्रकार बघून उरलेल्या तिघांनी मग घाबरुन जावून कुठलाही प्रतिकार न करता शरणागती पत्करली आणि ऑपरेशन फत्ते झाले.  

या ऑपरेशनचे वैशिष्ट म्हणजे एकसुद्धा बंदुकीची गोळी न झाडता, अत्यंत विद्युतगतीने म्हणजे फक्त ९० सेकंदात हे ऑपरेशन संपुष्टात आले.

- निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह