मुख्य सामग्रीवर वगळा

ट्रॅफिक जॅम – सुएझ कालवा...

 23 मार्चला इजिप्तच्या सुएझ कालव्यात एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या कंपनीचं एवर गिव्हन हे मालवाहू जहाज सुएझ कालवा पार करत असताना अडकून पडलं. ते जमिनीत रूतलं आणि ते अश्या पद्धतीने अडकून पडलं की दोन्ही बाजूनी येणार्‍या आणि जाणार्‍या मालवाहू जहाजांचा रस्ताच बंद झाला. यामुळे जलवाहतुकीवर परिणाम होऊन साधारणत: तीनशे मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत. यामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान जगाला झेलावं लागत आहे. तासाला 400 मिलियन डॉलर्स, तर दिवसाला 9.6 बिलियन डॉलर्स एवढं आर्थिक नुकसान होत आहे. 14 टग बोटी हे जहाज परत पाण्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, याचं कारण, ते जहाज मातीत रूतलं आहे.



काही बातम्यांनुसार यामुळे संपूर्ण जलवाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. याचं कारण असं आहे की, तज्ञांनी सांगितल्यानुसार सध्याच्या काळातली मालवाहू जहाज कमी कर्मचारी वर्ग, कमी जागेत खूप माल भरणे आणि कमी स्किल असलेला कर्मचारी वर्ग या सर्व गोष्टींमुळे जलवाहतुकीच्या क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एवर गिव्हन या जहाजाबद्दल बोलायचं झाल्यास मालवाहू जहाजाचा कर्मचारी वर्ग हा भारतीय आहे. हे कर्मचारी-अधिकारी मिळून 25 लोक या जहाजावर आहेत. जहाजाच्या कंपनीनुसार हे जहाज वादळी वार्‍यांमुळे आणि मोठ्या लाटांमुळे भरकटत जाऊन सुएझ कालव्यात अडकले. पण तज्ञानुसार मार्गातून जात असताना जहाजाचा वेग हा 8 नॉटिकल माइल्स इतका असायला होता, पण प्रत्यक्ष त्याचा वेग हा 30 नॉटिकल माइल्स एवढा होता, याचं कारण कंपनीकडून सांगण्यात आलं की मोठ्या लाटा असल्यामुळे ते अडकून पडायला नको म्हणून त्या जहाजाचा वेग वाढवण्यात आला. याबरोबर दुसरं कारण म्हणजे तज्ञानुसार, दहा वर्षापूर्वी 10000 कंटेनर वाहून नेणारी मालवाहू जहाज होती, पण आता एव्हर गिव्हन या जहाजाचं उदाहरण घेतल्यास यावर 20,000 कंटेनर्स आहेत, म्हणजे 10 वर्षात या मालवाहू जहाजांची, दुप्पट माल वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यात आली. तिसरा मुद्दा हा की, या जहाजाची लांबी 400 मीटर आहे. आता एवढे अजस्त्र जहाज सुएझ कालव्यातून सहजासहजी जाऊ शकेल का? या बद्दल सुदधा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.

सुएझ कालवा अनेक कारणासाठी महत्वाचा आहे. एकूण जागतिक व्यापारापैकी 12% व्यापार हा या जलवाहतुकीतून, कालव्यातून होतो. तसेच एकूण जलवाहतुकीच्या व्यापारापैकी 30% जलवाहतुक व्यापार हा या कालव्यातून होतो. हा कालवा इजिप्तच्या मालकीचा आहे. व्यापार ठप्प झाल्यामुळे ईजीप्त सरकारला 14 मिलियन डॉलर्स एवढं नुकसान दर दिवसाला होतं आहे. सुएझ कालवा हा एकूण 193 किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे. सुरवातीला एकच लेन या कालव्यात होती. आशिया आणि युरोप खंडांना जोडणारा दुवा म्हणून या कालव्याचं महत्व आहे. याचबरोबर भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र या दोघांना हा सुएझ कालवा जोडण्याचं काम करतो. आशिया आणि आफ्रिका खंडाना वेगळं करण्याचं कामसुद्धा हा कालवा करतो. या कालव्याच्या उत्तरेला पोर्ट सैद बंदर आहे, तर दक्षिणेला पोर्ट तौफिक बंदर आहे. याचं विशेष म्हणजे दोन्ही बाजूंना पाण्याची पातळी ही समुद्राच्या पातळी एवढी ठेवण्यात आली आहे. या कालव्यामुळे इंधनाचा खर्च, आणि वेळेची बचत झाली आहे. सुएझ कालव्यावर नियंत्रण हे सुएझ कॅनल कंपनीकडे आहे. ही इजिप्त सरकारची कंपनी आहे. जहाजांच्या आकारमानांनुसार आणि प्रकारानुसार वेळोवेळी कालव्याची रुंदी आणि खोली वाढवण्यात आली आहे. पर्शियन आखाती देशातील खनिज तेल युरोपिय देशांकडे वाहून नेणार्‍या ऑइल टँकरची संख्या यात जास्त आहे. या कालव्यातून कोळसा, खनिज द्रव्ये, धातू, तेलबिया, सीमेंट, खते, तृणधान्ये आणि यंत्रसामग्री यांची जास्त वाहतूक असते. अंदाजे दिवसाला 50 मालवाहतुक जहाजं या कालव्यातून ये जा करतात.



इजिप्तचे सर्वेसर्वा गमाल अब्दुल नासर यांनी 1956 रोजी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर इतिहासात प्रसिद्ध असा सुएझ क्रायसिस निर्माण झाला होता. या दरम्यान कालवा 8 वर्ष बंद करण्यात आला होता. 1975 ला परत हा कालवा सुरू करण्यात आला. यामुळे या कालव्याला सामरीक महत्व आहे. या कालव्यात अजून एक लेन तयार करण्यात आली जेणेकरून ट्रान्झिट टाईम वाढून यातून 100 जहाजं ये जा करू शकतील अशी योजना करण्यात आली. 1859 साली सुएझ कालवा तयार करण्याचे काम सुरू झाले. आणि 1869 ला काम पूर्ण झाले. हा मानवनिर्मित कालवा आहे.

परत मुद्दयाकडे यायचं म्हणजे, एवर गिव्हन हे जहाजाच नाव आहे, हे जहाज ऑपरेट करणारी एव्हर ग्रीन मरीन ही तैवानची कंपनी आहे, तर जहाजाची मालकी, शोई किसेन या जपानी कंपनीची आहे. हे जहाज तैवानहून निघून नेदरलँडच्या रोटरडम या बंदराकडे निघालं  होतं. सुएझ कालव्यातून या जहाजाला जायचं असेल तर एकूण 18520 किलोमीटर एवढं अंतर कापत जावं लागेल आणि यासाठी 25 दिवसाचा कालावधी लागेल. तर याचा दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण दिशेला असणार्‍या केप ऑफ गुड होप वरुन वळसा घालून मग अटलांटिक् समुद्रावरुन जाऊन रोटरडम बंदराला पोहोचता येईल, पण यासाठी 25000 किलोमीटर एवढं अंतर पार करावं लागेल आणि यासाठी 35 दिवस लागतील. एव्हर गिव्हन अडकल्यामुळे आता इतर अडकलेल्या आणि खोळंबून राहिलेल्या जहाजांसाठी दोनच पर्याय शिल्लक आहेत, ते असे की अजून एव्हर गिव्हन जहाज पूर्ण बाहेर निघून वाहतूक पूर्ववत होईपर्यंत तिथेच थांबायचं किंवा मग केप ऑफ गुड होप या पर्यायी मार्गाने आपाआपल्या ठरलेल्या स्थळी जायचं.

एकूणच काय तर एक मानवनिर्मित कालवा जागतिक व्यापार थांबवू शकतो आणि शेकडो कोटी डॉलर्सच नुकसान करू शकतो, इतका हा कालवा महत्वाचा आहे. ब्रिटनच्या एका कंपनीचं 1.7 मिलियन पौंडाचं फर्निचर या जहाजात अडकून पडलं आहे. तर महाराष्ट्रातून जागतिक बाजारपेठेत निर्यात होणारी द्राक्षसुद्धा यात अडकून पडली आहेत. या समस्येमुळे भारतीय शेअर बाजार काहीशे अंकांनी खाली गेला, तर भारतात इंधनाच्या किमती या 4 % इतक्या वाढल्या आहेत. आणि हे सगळं एक अजस्त्र जहाज अडकून पडल्यामुळे होत आहे. तज्ञांच्या नुसार प्लॅन बी म्हणजे जर सहजासहजी टग बोटींनी हे जहाज निघालं नाही तर मग मोठमोठ्या क्रेन्स आणून यावरचे कंटेनर्स काढावे लागतील. या जहाजावर 20000 कंटेनर्स आहेत. हा प्लॅन सोपा नाहीये. पण हाच एकमेव पर्याय आत्तातरी दिसतो आहे. काही आठवडे तरी जागतिक व्यापारावर याचा परिणाम होणार आहे. आणि हे कंटेनर्स जरी काढून जहाजाचं वजन कमी करायचे ठरवले तरीही त्यातसुद्धा काही आठवडे लागतील असं सगळं गणित आहे. येत्या काही दिवसात याबद्दल चित्र स्पष्ट होईल त्याची आपण वाट पाहुयात. 

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह