मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना परत आलाय... चीनमध्ये!

 ही गोष्ट आहे २३ डिसेंबर २०२१ची. उत्तर चीनमधल्या शांक्सी विभागातल्या शियान शहरात अचानक एकच धावपळ सुरू झाली. चीनी सरकारी अधिकार्‍यानी फरमान काढलं- शहरातल्या सर्व म्हणजे १ कोटी ३० लाख नागरिकांनी घराच्या बाहेर अजिबात पडू नये... कारण कोरोना या जीवघेण्या रोगाचा फैलाव होतो आहे... यावेळी वेळीच उपाय नाही केले तर खूप गंभीर परिणामांना सगळ्यांना सामोरे जावं लागेल...

  चीनमध्ये साम्यवादी सरकार असल्यामुळे आणि चीनी सरकारचं माध्यमांवर नियंत्रण असल्यामुळे बातमी खरी असली तरी ती कितपत खरी आहे याबद्दल साशंकता निर्माण होऊ शकते. अर्थात आकडे बदललेले असतील पण परत कोरोना मूळ धरू पाहतोय की काय अशी परिस्थिती आता चीनमध्ये आहे. ज्याप्रमाणे आपण सहजरीत्या फेसबुक वापरू शकतो, आपली मतं मांडू शकतो, विरोध करू शकतो, हरकत घेऊ शकतो (कारण आपल्याकडे लोकशाही आहे)... चीनमध्ये अशी परिस्थिती नाही... याचं कारण चीनला आपल्या नागरिकाना स्वातंत्र्य मिळू द्यायचा नाही... आणि सध्याच्या शी जिनपिंग यांच्या सरकारने ती पुरेपूर खबरदारी घेतली आहे. विषय आहे चीनमध्ये कोरोना परतण्याचा! अर्थातच चीनी सरकारला खरी माहिती उजेडात येऊ द्यायची नाही, असाच अर्थ यातून निघतो.

  गम्मत म्हणजे काही वृत्तवाहिन्या या व्हायरसला कोरोना व्हायरस न म्हणता वुहान व्हायरस म्हणतात. म्हणजे वुहान या शहरातून, तिथल्या प्रयोगशाळेतून हा व्हायरस सगळ्या जगभर पसरला आणि त्याचे परिणाम सगळी मानवजात भोगते आहे असा एक ठाम समज आहे. असो. तर विषय आहे कोरोना परतण्याचा... जसं जगभर सोशल मीडिया म्हणून सगळीकडे फेसबुक सर्वत्र वापरलं जातं त्याप्रमाणे चीनमध्ये फेसबुक वापरलं जात नाही याचा कारण चीनमध्ये फेसबुक या आणि इतर सगळ्या जागतिक मीडियाच्या वापरास बंदी आहे.  चीनमध्ये फेसबुकप्रमाणे वाईबो (Weibo) ही साईट स्थानिक चीनी नागरिक वापरतात॰ अर्थातच चीनी सरकारचं कडक नियंत्रण या साइटवर आहे. वाईबोला सरकारी वेबसाइट असं म्हटलं तरीसुद्धा काही हरकत नाही अशी परिस्थिती आहे.

  मात्र तुम्ही फार काळ जनतेला वेठीस धरू शकत नाही ही खरी गोष्ट आहे. चीनच्या शियान मधले नागरिक आता आवाज उठवू लागले आहेत असे चित्र आहे. नागरिकांनी तिथल्या सामाजिक माध्यमांवर आपल्या कैफियती मांडल्या. काहींनी फोटो टाकले. २३ डिसेंबर पासून सगळ्या नागरिकाना घरी बसायचे आदेश जारी केल्यामुळे त्यांची खूपच तारांबळ उडाली आहे. लोकांकडे खायला अन्न नाही. बाहेर तर पडू शकत नाही. चीनी अधिकार्‍यानी अन्नधान्याचा मोफत पुरवठा केला असून ते वाटण्यात येत आहे असं सरकारचं म्हणणं आहे. परिस्थिती तर इतकी गंभीर आहे की लोक चक्क वस्तुविनिमय (Barter) पद्धतीने रोजचं जीवन जगत आहेत. सिगरेटच्या बदल्यात कोबी, भांडीधुण्याच्या साबणाच्या बदल्यात सफरचंद, तर आपल्या व्हिडिओ गेमच्या बदल्यात नूडल्स असले भलतेच व्यवहार नागरिकाना करावे लागत आहेत. म्हणजे मध्ययुगीन परिस्थिती आहे की काय अशी शंका यावी.

  काही बातम्यांनुसार शियान इथल्या स्थानिक प्रशासनाने अन्नधान्याचे संकट उभे राहू नये, तसच लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून अन्नधान्याचे पॅकेट्स तयार करण्याचे आणि ते पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. जर व्यवस्था भक्कम असती तर लोकांनी तक्रारी केल्या नसत्या... पण तसं दिसत नाही.

  ओमायक्रोनचं थैमान सुरू आहे. अशी परिस्थिती असताना चीन सगळ्या जगाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे याची चीनलासुद्धा कल्पना नसावी...

 यावर उपाय ? आपण आपली रोग प्रतिकारक शक्ति वाढवूयात, व्यायाम करूयात, आणि आपल्या सरकारने कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि काय करू नये हे सांगितल्यानंतर त्याचं तंतोत्तांत पालन करुयात आणि सुरक्षित राहूयात एवढंच आपण करू शकतो.

  चीनने हे संकट उभं केलं आहे आणि त्याचा त्रास जगाला होतो आहे... याचा विचार चीनी सरकार करेल अशी अशा बाळगणंच आपल्या हाती आहे...

-निखिल कासखेडीकर 

(https://kfacts.in/ या पोर्टल वर हा लेख जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे.)    

(

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह