मुख्य सामग्रीवर वगळा

या आहेत २०२२ मध्ये रात्री आकाशात घडणार्याल १५ खगोलशास्त्रीय घटना

 २०२२ हे वर्ष सगळ्या खगोल प्रेमींसाठी एक पर्वणीच असणार आहे. याचं कारण या वर्षी आकाशात वर्षभर रात्री विहंगम अशी दृश्य दिसणार आहेत आणि ती आपल्याला उघड्या डोळ्यांनीसुद्धा पाहता येणार आहेत. अश्या आकाशात घडणार्‍या घटनांबद्दल अगदी थोडक्यात जाणून घेऊयात.

१.फेब्रुवारी ते मार्च – शुक्र ग्रहाचं दर्शन.

साधारणतः महिनाभर म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यातून ते मार्चच्या मध्यापर्यन्त शुक्र ग्रहाचं दर्शन होणार आहे. आकाशात दक्षिण पूर्वेला सकाळच्या वेळी पाहील्यास शुक्र अत्यंत तेजस्वी दिसणार आहे. 13 फेब्रुवारीला दिसणारा शुक्र आतापर्यंत सगळ्यात प्रकाशमान दिसणार आहे. त्याची चंद्रकोर सुद्धा या वेळी पाहता येणार आहे. 20 मार्चला शुक्र अर्धचंद्राकृती दिसेल आणि  सूर्यापासून शुक्र आतापर्यंतच्या प्रवासात सगळ्यात ज्यास्त अंतरावर असेल आणि तो पुढे विस्तारत जाईल.

२. ५ एप्रिल- मंगळ आणि शनि यांची आकाशात भेट.

५ एप्रिलच्या सकाळी अगदी सूर्योदय होण्याआधी मंगळ शनिच्या खाली ०.४ अंश कोनात कललेला असेल. यात विशेष म्हणजे उघड्या डोळ्यांना मंगळ आणि शनि अगदी एकसारखेच तेजस्वी दिसतील. पण यांच्या छटा वेगळ्या असतील. शनि हा पिवळसर पांढरा दिसेल तर मंगळ केशरी दिसेल.

३.एप्रिलच्या शेवटी/ मेच्या सुरवातीला... उघड्या डोळ्यांनी बघता येणार धूमकेतू?

C/२०२१ ओ३ (PanSTARRS) सूर्यापासून ४२.८ लाख किलोमीटरच्या अंतरावरून हा धूमकेतू २१ एप्रिलला जाणार आहे. हे दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. एप्रिलच्या शेवटच्या किंवा मेच्या सुरवातीला हा धूमकेतू आपल्याला दिसू शकेल. उत्तर पश्चिमेला आकाशाकडे पाहील्यास सूर्यास्तानंतर थोड्या कालावधीतच या धुमकेतूचं दर्शन आपल्याला होऊ शकेल.

४.ग्रहांच्या स्वर्गीय भेटी.

एप्रिलच्या साधारण तिसर्‍या आठवड्यानंतर गुरु ग्रह दक्षिण पश्चिम क्षितिजावरून शुक्र ग्रहाजवळ येणार आहे. २७ एप्रिलला तर आकाश प्रकाशमान करणार्‍या तीन गोष्टी म्हणजे चंद्र, गुरु आणि शुक्र यांची युतीच जणू आपल्याला पहाटेच्या वेळी दिसेल.

५. ३० एप्रिल :खंडग्रास सूर्यग्रहण.

चंद्राची दाट सावली असलेला कोण पृथ्वीला चुकवून अगदी पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाजवळून अंदाजे १२०० किलोमीटर वरुन जाणार आहे. असं जरी असलं, तरीसुद्धा दक्षिण अमेरिकेतल्या देशांमध्ये आणि दक्षिण प्रशांत महासागरातल्या भागांमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दक्षिण अमेरिकेतल्या चिली, अर्जेंटीना, उरूग्वे, दक्षिण पेरु आणि दक्षिण बोलीव्हिया, पश्चिम पराग्वे आणि ब्राजीलच्या काही भागात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. तर संपूर्ण सूर्यग्रहण दक्षिण  प्रशांत महासागरात चिली देशाच्या यालचो बेसच्या दक्षिण पश्चिमेला ४८० किलोमीटरवर पाहता येणार आहे.

६. १५-१६ मे : पूर्ण चंद्र्ग्रहण

संपूर्ण अमेरिका खंडामध्ये पूर्ण चंद्रग्रहण पाहता येणार आहे. यूरोपमध्येसुद्धा संपूर्ण ग्रहण दिसणार आहे. याचं विशेष म्हणजे युरोपमध्ये या संपूर्ण म्हणजेच खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी १ तास २४ मिनिटे इतका असेल. या खग्रास चंद्रग्रहणामद्धे चंद्राचा दक्षिण भाग ज्यास्त प्रकाशमान दिसेल.

७. ३०-३१ मे: उल्का वर्षावाची शक्यता.

या उल्का वर्षावाला २०२२ सालातली एक अत्यंत नाट्यमय घटना म्हणता येईल. ३०-३१ मेच्या रात्री उत्तर अमेरिकेत हा उल्का वर्षाव दिसण्याची शक्यता आहे. गम्मत म्हणजे इतर उल्का वर्षावांपेक्षा हा उल्का वर्षाव धीम्या गतीने होणार आहे. ३०-३१ मेला होणार्‍या उल्का वर्षावाचं वैशिट्य म्हणजे तासाला डझनभर किंवा १०० उल्का पडू शकतील. या घटनेला शूटिंग स्टार्स असं संबोधलं जातं.  

८. जून महिन्याच्या मध्यात: आकाशात पाच ग्रह येणार एकत्र.

या जून महिन्यात आकाशात पाच ग्रह एकाच वेळेस एकाच रांगेत आपल्या सगळ्यांना पाहता येणार आहेत. या घटनेचं वैशिट्य म्हणजे सूर्यमंडळात सूर्यपासून ज्या क्रमाने हे ग्रह आहेत अगदी त्याच प्रमाणे ते एकाच सरळ रेषेत आकाशात आपल्याला पाहता येणार आहेत.

९. १३ जुलै: सगळ्यात मोठी पोर्णिमा / सुपरमून

या दिवशी चंद्र ९ तास आणि ३७ मिनिटं लवकर पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणार आहे. हे अंतर असेल पृथ्वीपासून ३५७,२६४ किलोमीटर इतकं... यालाच सुपरमून असं म्हणतात. या काळात महासागराना भरती आणि ओहोटी येण्याची शक्यता आहे.

१०. १२ ऑगस्ट: परसाईड उल्का वर्षाव.

दर वर्षी उन्हाळ्यात होणार्‍या या परसाईड उल्का वर्षावात या वर्षी पोर्णिमेमुळे व्यतय येऊ शकतो.

११. ओपोझिशन ऑफ जुपिटर.

ओपोझिशनचा अर्थ पृथ्वी आणि आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात मोठा ग्रह म्हणजे गुरु सूर्यमालेत एकाच दिशेला येण्याच्या घटनेला अओपोझिशन म्हणतात. १९६३ नंतर पहिल्यांदाच ऑक्टोबर २०२२ मध्ये आपल्याला ही घटना पाहायला मिळणार आहे. हे अंतर असणार आहे ५९१.२ लाख किलोमीटर एवढं ...

१२. २५ ऑक्टोबर: खंडग्रास सूर्यग्रहण.

या प्रकारच्या सूर्यग्रहणात चंद्राची सावली मुख्यत्वेकरून पृथ्वीच्या उत्तर ध्रुवातल्या भागांवर पडते. हे सूर्यग्रहण ग्रीनलंडच्या पूर्व भागातून, तसंच संपूर्ण आइसलंड आणि युरोप मधून त्याचप्रमाणे उत्तरपूर्व आफ्रिका, तर पश्चिम आणि मध्य आशियात दिसेल.

१३. ८ नोव्हेंबर: संपूर्ण चंद्रग्रहण

हे चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, हवाई बेटे, पूर्व आशिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि अर्ध्या ऑस्ट्रेलियात दिसेल.

१४. ७-८ डिसेंबर: चंद्र-मंगळ युती.

७ डिसेंबरच्या संध्याकाळी पूर्ण चंद्र मंगळ ग्रह ओलांडून प्रवास करणार आहे. यामुळे उत्तर अमेरिका खंडावर सावली पडणार आहे.

१५. १३-१४ डिसेंबर: जेमिनाईड उल्का वर्षाव

साधारणतः दर वर्षी होणार्‍या उल्का वर्षावांमधे जेमिनाईड उल्का वर्षावाना महत्वाचं स्थान आहे. अगदी डिसेंबर मध्ये हा उल्का वर्षाव मध्यरात्री होतो. अत्यंत तेजस्वी डोळे दिपून टाकेल असा हा उल्का वर्षाव असतो.

ही होती २०२२ सालात घडणार्‍या खगोलशास्त्रीय घटनांची अगदी थोडक्यात माहिती. समस्त खगोल प्रेमींसाठी ही एक मेजवानीच आहे. तर सर्वांनी या घटना नक्की अनुभवा.

-निखिल कासखेडीकर 

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे.) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह