मुख्य सामग्रीवर वगळा

एका माणसाची गोष्ट

 सोशल मीडियाचा जमाना आल्यामुळे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कुठेही आपल्याला इंटरनेटमुळे जगाचा वेध घेता येतो. अनेक देशोदेशींच्या बातम्या एका क्लिकद्वारे आपल्याला कळू शकतात. आजच्या टेकसेव्ही जगात मीडिया या शब्दाला खूप महत्व आहे, मग तो मीडिया म्हणजे सोशल मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो... कधीही इतकी गरज आजच्या आमच्या तरुण पिढीला मीडियाची लागली नाही जेवढी ती आज लागली आहे. बरं आता तर फक्त तरुणाईचं फेसबुक वॉट्स ऍप आणि इन्स्टाग्राम वापरते असा नाही तर जे वयोवृद्ध आहेत, आपल्या आई वडिलांच्या वयाचे आहेत, किंवा काही काही तर आजी आजोबांच्या वयाचे आहेत, त्यांचेसुद्धा अकौंट्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आहेत. या नवीन सोशल मिडियाच आकर्षण लहान ते वृद्ध अश्या सगळ्या वयोगटाला आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या ज्या काही व्हायरल गोष्टी आहेत, त्या आपल्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेटद्वारे कळू शकतात. हा जो काही व्हायरल होणं प्रकार आहे, त्याने तर कित्येक सामान्य माणसांनाही सेलिब्रिटी बनवून टाकलं आहे. म्हणून काय कुठे केंव्हा कशी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा भरोसा नाही.

अशीच एका व्यक्तीची व्हिडियो क्लिप अल झझीरा या वाहिनीवरून दाखवल्यानंतर व्हायरल झाली आहे. सदर व्यक्ती हि सायकल वरून मागे सॅक अडकवून पिझ्झा डिलिव्हरी करायला जात आहे असं या क्लिप मध्ये दिसतंय. या व्यक्तीने नारंगी रंगाचा शर्ट घातला आहे आणि एकूणच त्या व्यक्तीकडे बघून हा माणूस पिझ्झा डिलिव्हरी पर्सन आहे हे लक्षात येतं आहे. कोणालाही सुरवातीला अस वाटू शकतं कि हे सगळं सांगण्यात आणि दाखवण्यात काय विशेष आहे... असं बोलणं सहाजिक आहे. पण मित्रानो खालच्या दोन फोटोमध्ये दिसते आहे ती कोणीतरी सामान्य व्यक्ती नाही.

फोटोत जी व्यक्ती आहे, तिचं नाव आहे, सय्यद अहमद सादात... त्यांच्याकडे ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणाच्या कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मध्यल्या दोन डिग्र्या आहेत. सादत याना मागच्या 23 वर्षांपासून 20 कंपन्या आणि 13 देशांमध्ये काम केल्याचा जबरदस्त अनुभव आहे. त्यांच्या कामाचं क्षेत्र अर्थातच टेलेकम्युनिकेशन ... ही व्यक्ती उच्च शिक्षित आहे, आणि यांची दुसरी ओळख करून द्यायची म्हणजे ते 2 वर्ष अफगानिस्थान चे टेलेकम्युनिकेशन मिनिस्टर म्हणून काम पाहात होते. अश्रफ घनी राष्ट्रपती असताना 2018 ते 2020 या काळात सादत मंत्री होते. काही कारणांमुळे घनी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे सादात यांनी राजीनामा दिला आणि एक नवीन आयुष्य सुरु करण्याच्या हेतूने ते जर्मनीत स्थायिक झाले. पण त्यांच्याकडे असलेल्या पदव्यांचा आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा नोकरी मिळवताना झाला नाही, शेवटी त्यांचे पैसे संपल्यामुळे त्यांनी लिव्हरांदो या कंपनीत फूड डिलिव्हरी पर्सन म्हणून काम सुरु केलं. त्यांचे वास्तव्य लिपझिग या शहरात आहे.
कुठल्याही हाय प्रोफाइल व्यक्तीने अशा प्रकारचं काम करणं हे क्वचितच घडलं असेल. सादत याना याबद्दल कुठल्याही कमीपणाची भावना नाही, उलट ते म्हणतात की ते समाधानी आहेत, आणि त्यांची गोष्ट ही एकप्रकारे नवीन प्रेरणा देईल आणि कुठलंपण काम कमीपणाचं नाही हे अधोरेखित करेल. अफगाणिस्तानात मंत्रीपदावर असताना त्यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड असायचे पण आताच्या कामात ते त्यांच्या सायकलने पार्सल पोहोचवण्याचं काम करतात. सादत यांच्या म्हणण्यानुसार इतरही लोक त्यांचं अनुकरण करतील अशी अपेक्षा आहे.
युरोपमध्ये खासकरून शिक्षण आणि साक्षरतेमुळे सामान्य आयुष्य जगूनसुद्धा असामान्य गोष्टी करता येऊ शकतात अश्या व्यक्तीसुद्धा आहेत. बॉडीगार्ड असणं हि गोष्ट कमीपणाची आहे, असंच जणू काही सजग उच्चपदस्थ व्यक्तींना वाटत असावं. मागासलेल्या किंवा विकसनशील देशांमध्ये, राजकारण्यांना अवास्तव महत्व दिलं जातं आणि त्याच्या महागड्या गाड्या, आजूबाजूला बॉडीगार्डस, असं चित्र दिसतं. याउलट यूरोपसारख्या संपन्न खंडात उच्च विचारसरणी आणि सामान्य राहणी या तत्वाचा अवलंब करणारे कर्तृत्वाने मोठे लोक आहेत. सादत यांच्यासारख्या लोकांमुळे एक नवीन आदर्श निर्माण होऊन कित्येकांना आयुष्यात खचून न जाता परिस्तिथीचा सामना करून नवी उमेद मिळेल अशी अपेक्षा करूयात...

- निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...