मुख्य सामग्रीवर वगळा

कतारबद्दल थोडंसं... ! भाग 2 (कतार, तालिबान आणि अमेरिका)

कतार या देशाबद्दल मागच्या पोस्टमध्ये पहिल्या भागात आपण जाणून घेतलं. यावरून कतारबद्दल अंदाज यावा हा हेतू आहे. याच्यापुढे जाऊन कतार आज जागतिक राजकारणात एक महत्वाचा दुआ बनला आहे, हे लक्षात येईल. आज आपण न्यूज चॅनेलवर पाहतो की तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्ण कब्जा मिळवला आहे, तसंच अमेरिकेच्या तालिबानबरोबर वाटाघाटी झाल्या आणि दोहा करार अस्तित्वात आला. आखाती देशातल्या इतरही घडामोडीत कतारचं स्थान नक्की या सगळ्या घडामोडीत काय आहे, असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडू शकतो. कतार इतका महत्वाचा देश आज का बनला आहे, हे समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडी अभ्यासाव्या लागतील.

एक गोष्ट इथे स्पष्ट करायची म्हणजे आपण किंवा आपल्यापैकी बरेच जण सध्याच्या तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्या पासून या सगळ्यात मोठी चूक कोणाची असेल तर अमेरिकेची आहे, हे म्हणतो आहोत, आणि त्यातसुद्धा अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडेंन यांची सगळ्यात मोठी भूमिका आहे, असं आपल्याला वाटतं आहे. पण हे अंशतः खरं आहे. बायडेंन यांनी अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेतल्यामुळे तालिबान सत्तेवर आलं गोष्ट जरी खरी असली तरी, याचा दोष बायडेंन याना न देता ओबामा याना, तसच ट्रम्प यांनासुद्धा दिला पाहिजे.

कतार हा देश आज अमेरिकेच्या तालिबानच्या आणि अफगाणिस्तानच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचा सगळ्यात मोठा एअरबेस अल उदेद या कतारमध्ये असलेल्या ठिकाणी आहे. अमेरिकेचे तिथे अंदाजे 11,000 ट्रूप्स तैनात आहेत. तसंच 100 एअरक्राफ्ट त्यांच्या दिमतीला आहेत. अफगाणिस्तान इराक मध्ये ग्राउंड ऑपरेशन्स करण्यासाठी तसंच रसद पुरवण्यासाठी या दोन देशांसकट जवळपास 18 देशांमध्ये अमेरिकेचे मिशन्स चालू आहेत. 90 च्या दशकात कतारच्या एमिरनेच अमेरिकेला एअरबेस तयार करावा अशी मागणी केली होती.
आता आपल्याला वाटेल तालिबान आणि कतार यांचा काय संबंध आहे. तर 2010 पासून कतारमध्ये तालिबानचे नेते राहात आहेत. तालिबानचं मुख्यालय हे 2010 पासून दोहामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिका आणि तालिबान यांच्या मध्ये जी शांततेची बोलणी झाली ती कतारमध्ये झाली आहेत, म्हणूनच आपल्याला दोहा करार झाला आहे हे ऐकायला मिळतं आहे. कतार अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये टॉक्स करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. 2013 मध्ये तालिबानने दोहा मध्ये आपलं ऑफिस उघडलं. पण या ऑफिसचा वापर तालिबानने अफगाणिस्तानचा दूतावास म्हणून करायला सुरुवात केली. याला तत्कालीन अफगाणिस्तान सरकारने आक्षेप घेतला. आणि म्हणून तालिबानच्या कारवाया कमी झाल्या.

साधारणतः 2010 पासून अमेरिकेची तालिबान बरोबर बोलणी सुरू आहेत, हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. यासाठी ओबामा प्रशासनाने पुढाकार घेतला. अमेरिकेचा 2010 पासूनच अफगाणिस्तानातून सैन्य काढून घ्यायचा विचार चालू होता. तालिबान, अमेरिका, अफगाणिस्तानच सरकार आणि मित्र देश यांच्या वाटाघाटी सौदी अरेबियात किंवा टर्की मध्ये व्हाव्यात अशी तत्कालीन अफगाण सरकारची अपेक्षा होती, पण ते शक्य झालं नाही म्हणून वाटाघाटींच ठिकाण कतार ठरलं. शिवाय अमेरिकेला आणि तालिबानला कतार देश योग्य वाटला. कतार न्यूट्रल वाटला. आणि चर्चा करण्यासाठी पण योग्य परिस्थिती कतार मध्ये होती.
तालिबान आणि अमेरिकेत बोलणी चालू झाली, तसंच जशी जशी बोलणी पुढे गेली तसं तसं तालिबानने त्यांचे 5 नेते ग्वातानामो बे इथून सोडावेत अशी मागणी केली. त्याच दरम्यान म्हणजे थोडं आधी 2009 ला तालिबानने यु एस मिलिटरीचा सार्जंट बो बर्गदल याचं अपहरण केलं होतं. याचा पुरेपूर वापर तालिबानने पुढे टॉक्स मध्ये केला. तालिबान या बर्गदलला सोडेल आणि त्याच्या बदल्यात अमेरिकेने 5 तालिबानी नेत्यांना सोडावं अशी अट घातली. पुढे 2014 मध्ये तालिबानने बर्गदलला अफगाणिस्तानातून सोडलं आणि अमेरिकेने 5 तालिबानी नेत्यांना सोडलं. वाटाघाटींमध्ये तालिबान अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन करेल आणि त्याला कुठलाही आक्षेप अमेरिका घेणार नाही, अशी बोलणी झाली. हा जर सगळा घटनाक्रम पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की तालिबानने आणि अमेरिकेने वाटाघाटी 10 वर्षांपूर्वीच सुरु केल्या होत्या. याच फलित म्हणजे दोहा करार जो आज आपल्याला कळतो आहे, तसंच यामुळे अफगाणिस्तानात तालिबानने प्रस्थापित केलेलं सरकार आपल्याला दिसत आहे. वाटाघाटी दरम्यान अमेरिकेने एक मागणी अशी केली होती की तालिबानचं सरकार आल्यानंतर देशात महिला मुलं सुरक्षित असतील याची हमी तालिबानने द्यावी. आणि हे तालिबानने मान्यही केलं...
कतार हा दहशतवाद्यांना पोसतो आहे, तसंच त्यांना आर्थिक मदत आणि इतरही मदत करतो आहे, असा आरोप काही आखाती देशांनी केला होता. अरब स्प्रिंग जी 2011 ला सुरु झालं त्याच्या मागे कतार होता असा संशय काही आखाती देशांना आला होता. परिस्थिती इतकी टोकाला गेली की सरळ सरळ अल कायदा आणि आयसिस ला मदत हा कतार करतोय हे लक्षात आल्यावर सौदी अरेबिया, यु ए ई, बहरिन आणि इजिप्त यांनी 2017 मध्ये कतारशी राजनैतिक संबंध तोडून टाकले...
हा सगळा सावळा गोंधळ जागतिक राजकारणात पहिल्या नंतर आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतील. अफगाणिस्तानच्या एका मंत्र्याने तर कतारवर असा आक्षेप घेतला की कतारने तालिबानला अत्यंत रॉयल ट्रीटमेन्ट दिली आहे. इथे तो मंत्री म्हणाला की आमच्या घराच्या हॉल पेक्षा तुमच्या घराचं बाथरूम मोठं आहे, हे तालिबान ला रॉयल ट्रीटमेंट देणाऱ्या कतारला समजण्यासाठी पुरेसं बोलकं वाक्य आहे. अमेरिकेने 2010 पासूनच तालिबानबरोबर बोलणी चालू केली. ते टॉक्स कतारमद्धे झाले, अमेरिकेने एका सैनिकाच्या बदल्यात 5 दहशतवादी सोडले, वाटाघाटी झाल्या आणि तालिबानने मोठ्या चलाखीने अफगाणिस्तानात सरकार बनवण्याच्या दृष्टीने पावलं उचलली.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये किती किचकट प्रक्रिया असतात हे यावरून लक्षात येईल... हे सगळं समजल्या नंतर कतारची या सर्व घडामोडींमध्ये काय भूमिका आहे हे , तसंच बायडेंन याना दोषी धरण्यापेक्षा ओबामांना दोषी धरलं पाहिजे आणि तालिबान किती चलाख आहे हे समोर लक्खपणे दिसेल... आजच्या पुरतं एवढंच...!
समाप्त

- निखिल कासखेडीकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...