मुख्य सामग्रीवर वगळा

ओरॅकल ऑफ ओंमाहा अर्थात वॉरेन बफे

 जो माणूस अजूनही स्मार्ट फोन वापरत नाही, विकत घेतलेली जुनीच गाडी चालवतो, 1958 साली 31,500 डॉलरला घेतलेल्या जुन्याच घरात आजही राहतो आणि रोज ब्रेकफास्ट मॅक्डोनाल्ड्स मध्ये बर्गर आणि कोक पिऊन करतो, आणि ज्याचं रोजच्या ब्रेकफास्टचं बिल 3.17 डॉलरच्यावर नसत असा हा जगात राहूनही जगावेगळा असतो अश्या वॉरेन बफे यांचा आज वाढदिवस...

बफे यांचा जन्म 1930 चा... स्थळ ओमाहा, नेब्रास्का या राज्यातला. वडील हॉवर्ड हे गुंतवणूक दलाल म्हणून काम करत होते, तसच चार वेळा अमेरिकी काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे खासदार होते. वॉरेन बफे याना दोन बहिणी. बफेनी वयाच्या 11 व्या वर्षी आयुष्यातली पहिली गुंतवणूक केली. सिटीज सर्व्हिस या तेल कंपनीचे 3 शेअर प्रत्येकी 38 डॉलरला विकत घेतले. आणि 40 डॉलरला ते शेअर विकले, त्यांना प्रति शेअर 2 डॉलरचा फायदा झाला. जेंव्हा या सिटी कंपनीचे शेअर प्रति शेअर 200 डॉलर इतके झाले तेंव्हा आयुष्यातला गुंतावणुकीतला पहिला धडा शिकले तो म्हणजे गुंतावणूकदाराकडे प्रचंड पेशन्स पाहिजे. वयाच्या 6 व्या वर्षी बफेनी च्युइंग गम विकलं, तसाच पुढे जाऊन घरोघरी कोका कोलाच्या बाटल्या विकल्या. वयाच्या 13 व्या वर्षी बफे यांचे कुटुंब वॉशिंग्टन डी सी ला राहायला गेलं.

वोरेन यांनी 13 वर्षाचे असताना पैसे मिळवण्यासाठी वोशिंग्टन पोस्ट हे वर्तमानपत्र घरोघरी जाऊन विकलं, त्यासाठी ते पहाटे 4.30 ला उठायचे. 15 वर्षाचे होईपर्यंत वोरेन यांनी वर्तमानपत्र विकून त्यातून 2000 डॉलर्स कमावले. 20 वर्षाचे होईपर्यंत त्यांनी 5000 डॉलर्स इतकी रक्कमेची बचत केली. आजच्या घडीला तेंव्हाचे 5000 डॉलर म्हणजे 53000 डॉलर्स होय.
1950 ला नेब्रास्का विद्यापीठातून पदवी मिळाल्यानंतर 1951 साली त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात मास्टर्स डिग्री मिळवली. पुढच्या कामासाठी म्हणून ते न्यूयॉर्क मधून परत त्यांच्या गावी म्हणजे ओमाहा ला आले, आणि त्यांनी व्यवसाय सुरु केला. 1956 ला बफेनी, बफे पार्टनरशीप हि स्वतःची गुंतवणूक कंपनी सुरु केली. 1962 ला पहिल्यांदा त्यांनी बर्कशायर हॅथवे या कंपनीत गुंतवणूक केली, हि न्यू इंग्लंड मधली टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती. 1965 ला त्यांनी बर्कशायर मध्ये त्यांच्या बफे पार्टनरशीप कंपनीकडून टेकोव्हर केली.
अशी बफे यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर घडलेल्या घटनांची यादी खूप मोठी आहे. बफे हे अत्यंत साधं राहणं पसंत करतात. त्यांच्या कंपनीतील काम करणाऱ्या लोकांची संख्या आहे फक्त 25... बफे सांगतात नजीकच्या फायद्यापेक्षा लांबच्या फायद्याकडे लक्ष देणं अधिक योग्य आणि चांगलं असतं. उगीचच शेअरमध्ये गुंतवणूक करायची म्हणून करू नये तर कंपनीची बॅलन्सशीट पाहून त्या कंपनीचा अभ्यास करूनच मग योग्य पाऊल उचलावे.
बफे यांची आजच्या काळातील संपत्ती आहे 10,390 कोटी अमेरिकी डॉलर... 2006 ला वॉरेन बफेनी ते स्वतःच्या संपत्तीपैकी 80 टक्के रक्कम हि चॅरिटी म्हणून देण्याचं घोषित केलं. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला त्यांनी सगळ्यात ज्यास्त रक्कम दान म्हणून दिली आहे. त्यांच्यानुसार ते आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात तसंच खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलं आहे.
गुंतवणूक क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व अशी बफे यांची ओळख आहे. 20 व्या शतकातील एक असामान्य गुंतवणूकदार असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. जगातल्या सहाव्या श्रीमंत व्यक्ती म्हणून बफेंकडे आज पाहिलं जातं... गुंतवणूक क्षेत्रात त्यांच्या विधानांकडे, तसंच ते काय सल्ला देतात तसंच त्यांचा पैसे गुंतवणूक करण्यासाठीचा रोख कोणाकडे आहे, हे लोक बारकाईने अभ्यासतात त्याचं विश्लेषण करतात... आज ते 91 वर्षाचे झाले आहेत, अश्या ओरॅकल ऑफ ओमाहा याना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

- निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...