मुख्य सामग्रीवर वगळा

त्साई इंग वेन- तैवानच्या पोलादी स्त्री... !

 रिपब्लिक ऑफ चायना म्हणजेच तैवान या छोट्या देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष, तसंच तैवानच्या सातव्या अध्यक्ष, महाकाय चीनला न जुमानंणाऱ्या, तैवानच्या गोलडा मायर, चीनविरुद्ध प्रखर भूमिका घेणाऱ्या, भारताबद्दल आस्था असणाऱ्या अश्या तैवानच्या पोलादी स्त्री म्हणजेच त्साई इंग वेन, यांचा आज वाढदिवस...त्यांचा जन्म 1956 सालचा...

त्साई यांचं बालपण तैवानमधल्या तैपई इथं गेलं. त्यांना 6 भावंडं, एका चांगल्या कुटुंबातला त्यांचा जन्म... त्यांनी कायदा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयात शिक्षण घेतलं. LLB त्यांनी नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीतुन पूर्ण केलं, तर LLM कॉर्नेल लॉ स्कुल मधून पूर्ण केलं. पुढे त्या प्रसिद्ध अश्या लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकल्या, आणि त्यांनी कायदा या विषयात युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधून डॉक्टरेट पदवी मिळवली... काही वर्षे त्यांनी सु चौऊ युनिव्हर्सिटी आणि नॅशनल चेंगची युनिव्हर्सिटी इथे कायदा विषयाच्या प्राध्यापक म्हणून काम केलं. पुढे जाऊन यांच्याजवळ असणाऱ्या कायद्याच्या ज्ञानामुळे, प्राविण्यामुळे त्यांना WTO मध्ये वाटाघाटी करण्यासाठी तैवानकडून अधिकृत व्यक्ती म्हणून पाठवण्यात आलं.

इसवी सन 2000 पासून पुढे त्साई यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 2004 ला त्यांनी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केला. पुढे त्या तैपेई शहराच्या महापौर निवडणुकीत हरल्या. पण 2012 साली राष्ट्रपतीपदासाठी त्साई यांनी निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. पण त्साई यांनी हार मानली नाही, 2016 साली त्या तैवानच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत उतरल्या आणि ती निवडणूक त्साई यांनी जिंकली. त्यांना तैवानच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला... हे कमी म्हणून कि काय 2020 सालच्या निवडणुकीत विजयी होऊन परत तैवानच्या अध्यक्ष बनल्या.

त्साई प्रकाशझोतात आल्या त्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होऊ घातलेल्या डोनाल्ड ट्रम्प याना केलेल्या
अभिनंदन
च्या फोनमुळे... ही गोष्ट घडली, 2016 मध्ये... अश्या प्रकारे प्रत्यक्ष फोनवरून अमेरिकेच्या अध्यक्षांशी 1979 नंतर बोलणंच झालं नव्हतं, पण ही कसर भरून काढत त्साई यांनी अमेरिकेशी तैवानचे संबंध मैत्रीपूर्ण राहतील याची शाश्वती दिली. यामुळे चीन नाराज झाला... 2019 साली चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी त्साई याना आवाहन केलं आणि सुचवलं कि चीन वन कंट्री टू सिस्टिम्स (म्हणजे एकसंध चीन) या धोरणाच्या बाजूने आहे. पण त्साई यांनी त्याला नकार दिला. खरं म्हणजे चीनला तैवान वर आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे, म्हणून चीन वन चायना पॉलिसी बद्दल नेहमी आग्रही असतो. चीनला तैवान बरोबर एकसंध चीनचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्साई यांनी हाँगकाँग मधल्या लोकशाहीवादी गटांना, ते हॉंगकॉंगमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी आंदोलन करत्याना पाठिंबा दिला, यामुळे चीनचा तिळपापड झाला... त्साई यांनी शी जिनपिंग यांच्या वन चायना धोरणाला केराची टोपली दाखवली, आणि सांगितलं की तैवान मेनलँड चायनाचा हिस्सा होणार नाही, आणि त्यासाठी प्रतिकार करावा लागला तरी चालेल. या विरोधामुळे चीन पेटला आणि जिनपिंग यांनी वेळप्रसंगी तैवान हो म्हणणार नसेल तर आम्ही तैवानवर आक्रमण करून तो मिळवू, अशी भाषा केली.
त्साई यांच्या सरकारने साऊथ बाऊंड पॉलिसी जाहीर केली, यानुसार तैवानला 18 देशांबरोबर मैत्रीपुर्ण संबंध हवे आहेत हे जाहीर केलं. महत्वाचं म्हणजे या 18 देशांमध्ये भारत हा सुद्धा एक देश आहे, त्याबरोबर तैवानला मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत... पूर्वी तैवान मध्ये फक्त मंडारीन ही भाषा बोलली जायची पण त्या धोरणात बदल करून त्साई यांनी हक्का, मात्सु इत्यादी स्थानिक भाषांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाऊल उचललं. सध्या तैवानचं धोरण असं आहे की त्यांना चीनवर कमी अवलंबून राहायचं आहे, यासाठी त्साई यांनी हरप्रकारे प्रयत्न चालू ठेवले आहेत. अमेरिका तैवानला पूर्ण मदत करेल, अस आश्वासन अमेरिकेनं दिलं आहे. यात सामावलेला अर्थ म्हणजे अमेरिका तैवानला शस्त्र, रणगाडे, विमान,अशी लागणारी संरक्षण सामग्री पुरवेल, आणि तैवानच्या सुरक्षेसाठी उभा राहील... हे सगळं त्साई इंग वेन यांच्या धोरणामुळे शक्य होत आहे , कोव्हिडशी सामना करून तैवानने नवीन उपलब्धी मिळवली आहे, ज्याचं जग कौतुक करत आहे... तैवानला प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही सारे कटिबद्ध आहोत असा जणू नाराच त्साई देत आहेत, अश्या या त्साई इंग वेन याना वाढदिवसाच्या शुभेच्छा...!

- निखिल कासखेडीकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

  युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्ध...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...