मुख्य सामग्रीवर वगळा

युद्ध, युद्ध आणि युद्धच!

युद्धाबद्दलच्या गोष्टी ऐकायला खूपच मजा येते. पण युद्ध मानवी जीवनावर काय परिणाम करू शकतं या बद्दल जर जाणून घेतलं तर कुठल्याही प्रकारच युद्ध नको रे बाबा अशीच आपली भावना होईल.

आणि त्यात महायुद्धाबद्दलच्या कहाण्या ऐकल्या कि युद्ध नकोच अशीच बऱ्याच जणांनी भावना होईल. खासकरून पहिलं आणि दुसरं महायुद्ध याबद्दल जर सविस्तर माहिती घेतली तर आपल्याला वाटेल, का हि युद्ध लढली गेली, का इतका मानावसंहार झाला... युरोपातील अर्थव्यवस्था देशोधडीला लागल्या... लोकांची आयुष्य उध्वस्त झाली... जपानवर अणुबॉम्ब टाकल्या नंतर जे लोक वाचले ते तर आयुष्यभराठी अधू झाले, कोणी बहिरे झाले तर कोणाला व्याधी जडल्या... थोडक्यात युद्धाचे लोकांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम झाले.
युद्धानंतर परत आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी विविध देशांना शून्यातून तो देश उभा करावा लागला. 20 व्या शतकात तर अनेक देशांचा असा समज होता की युद्ध हे आपला भौगोलिक क्षेत्रफळ वाढवण्यासाठीचा एक उपायच होता. युद्ध करणं म्हणजे कुठलीतरी चांगली गोष्ट करण्यासारखं आहे असासुद्धा लोकांचा समज होता.
दुसऱ्या महायुद्धदारम्यान अनेक बलाढ्य राष्ट्र एकमेकांना भिडली... दोन गट तयार झाले, एकिकडे जर्मनी, इटली आणि जपान तर दुसरीकडे अमेरिका, इंग्लंड, सोव्हिएत रशिया इत्यादी... अश्याना मग मित्र राष्ट्र अस संबोधण्यात आलं.

इथे जो फोटो इथे दिसतोय तो एका तरुण रशियन सैनिकाचा आहे, हा मुलगा रशियन आहे. डावीकडचा फोटो हा 1941 ला टिपलेला आहे, त्यात तो कसा दिसतो हे आपल्यला कळू शकतं... एक प्रसन्न चेहरा, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाही, आनंदी चेहरा...तर उजवीकडचा त्याचा फोटो हा 1945 ला टिपलेला आहे... दुसऱ्या फोटोत सुद्धा तोच आहे... भयाण चेहरा... युद्धाचं भीषण वास्तव ... 4 वर्ष युद्धात लढल्यामुळे युद्धाची दाहकता सांगणारा बोलका फोटो...डोळे खोल गेले आहेत, हतबलतेचे भाव, आणि चेहऱ्यावर एकप्रकारची भावनाशून्यता दिसते आहे.
महायुद्ध माणसाला काय बनवू शकतं, आयुष्य कुठल्या वळणावर नेऊन सोडू शकतं, याचं जीवंत उदाहरण म्हणजे या तरुणाचा युद्धा आधीचा आणि महायुद्धानंतरचा फोटो... एका अर्थाने आण्विक युद्धाचं भीषण वास्तव या दोन फोटोंमधल्या फरकातून लक्षात येईल... अर्थात युद्ध करणं ही कुठलीतरी चांगली गोष्ट आहे, असा समज आजकालचा नाहीये. युद्ध काय आणि कसं कोण्या व्यक्तीला आयुष्याच्या कुठल्या वळणावर नेऊन ठेवू शकतं जणू याबद्दल फरक सांगणारा हा फोटो. मृत्यूच्या खोल दरीतून जिवंत राहिलेल्या तरुणाचा हा बिफोर आणि आफ्टर फोटो...फक्त 4 वर्षाआधी चेहऱ्यावरून तरुण वाटणारा तरुण 4 वर्षानंतर त्याच्या चेहऱ्यावरून म्हातारा झाल्यासारखा दिसतो आहे, एवढा मूलभूत आणि भयानक बदल केवळ युद्धामुळे झाला आहे. मानवी मनावर आणि शरीरावर होणारे परिणाम युद्धामुळे कसे होतात त्याचं ज्वलंत उदाहरणच जणू...

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...