मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय वायुदल आणि संरक्षण सिद्धता... !

 

एका अहवालनुसार भारतीय वायुदलाकडे असणारे सर्व प्रकारचे रिसोर्सेस कमी आहेत किंवा कमी होत चालले आहेत. उदाहरणार्थ. फायटर विमानांची संख्या, स्क्वाड्रंस ची संख्या, आकाशात इंधन भरण्यासाठी असणार्‍या एअर टँकर्स ची संख्या, क्षेपणास्त्र, रडार प्रणालीसाठी वापरण्यात येणारी व्यवस्था इत्यादि.

खरं म्हणजे एक मुद्दा उपस्थित होतो, आणि वारंवार चर्चिला जातो तो म्हणजे संरक्षणावर एखाद्या देशाला इतका खर्च करण्याची आवश्यकता आहे का? हे हजारो कोटी रुपये देशाच्या विकास कामांमध्ये सुद्धा खर्च करता येऊ शकतात. देशाला संरक्षण करण्याची आवश्यकताच नको भासायला... आजही स्वित्झर्लंड सारख्या देशाला स्वतःची आर्मी असून ते फक्त गरजेपुरतच त्याचा उपयोग करतात. त्यांचे सराव चालू असतात. आर्मीला बोलवण्याची फारच कमी गरज पडते. नव्हे नाहीच. आज व्हाटिकन ची सुरक्षा, पोप ची अंतर्गत सुरक्षा, हे सगळं सांभाळणारे स्वीझ गार्डस आहेत. ... असं म्हणतात डेन्मार्कमध्ये जेल बंद करण्याची वेळ आली आहे कारण तिथे गुन्हेच घडत नाहीत, त्यामुळे गुन्हेगार कुठून येणार, म्हणून मग तुरुंग बंद करण्यात येतात. विकसित देशांमध्ये खासकरून पाश्चिमात्य देशांमध्ये सुबत्ता आहे, संपत्ति आहे, चांगलं जीवनमान आहे. लोक सुखी आहेत. विज्ञानाचा प्रसार झाला आहे. लोकसंखेची घनता कमी आहे. इतक्या सगळ्या अनुकूल गोष्टी असताना तिथे शेजारी देशांमध्ये पण वादविवाद तंटे नाहीत. हे सगळं सांगायचा कारण म्हणजे भारताला लाभलेले शेजारी देश.

पाकिस्तान सारखा देश आणि चीनसारखा देश हे आपले शेजारी असल्याने आपल्याला स्वसंरक्षण करण्यासाठी स्वतःचे सैन्यदल त्यासाठी लागणारी यंत्रणा बाळगण गरजेचं आहे. यापैकी चीनसारख्या देशकडून 1962 ला भारतावर आक्रमण झाले होते त्याच्या आठवणी आहेतच, म्हणून मग खबरदारी म्हणजे काय तर देश नावच्या संकल्पानेत अपेक्षित असलेली व्यवस्था उभारण्यासाठी, स्व्संरक्षणार्थ सैन्यदलानची  उभारणी करणे अत्यावश्यक झाले आहे. चीन गुप्तता पळणारा देश आहे. याचा अर्थ चीनपासून धोका आहे असं नाही, पण इतिहासातून शिकले पाहिजे या उक्तीप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून ही व्यवस्था. चीनची नीती सकारात्मक आहे, आणि चीन सुद्धा हे जाणून आहे की भारत हा शांतताप्रिय देश आहे. प्रश्न राहतो तो पाकिस्तानचा... पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचे जणू काही तळच बनला आहे. कश्मीर मध्ये आपल्याला सतत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा सामना करावा लागतो आहे. भारताची निम्मी आर्मी भारत व्याप्त कश्मीर मध्ये स्थित आहे. पाकिस्तानला कश्मीर जिंकून घ्यायचा आहे. त्यासाठी कुरापत्या काढणे काही त्यांचे थांबत नाही. त्यासाठी भारतात खोटे चलन पसरवणे, फुटीरतावाद्यांना पाठबळ देणे, काश्मिरी जनतेच्या मनात भारतीय सैन्यदलांबद्दल आकस निर्माण करणे या गोष्टी सातत्याने पाकिस्तान करत आलेला आहे. हे सगळं थांबवण्यासाठी मग स्वसंरक्षण व्यवस्थेचा भाग म्हणून आणि, भविष्यात उद्भवणार्‍या समस्यांचा भाग म्हणून स्वतःच सैन्यदल असणं आवश्यक बनल आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक देशाला त्यांची स्वतःची सैन्यदल आहेत. अर्थात त्यांचा उपयोग कमी ज्यास्त प्रमाणावर आणि गरजेनुसार केला जातो. युद्ध कोणालाही नको असतं, पण मग स्वसंरक्षण करणार तरी कसं?

मूळ मुद्यावर यायचे म्हणजे, भारतीय वायुदलाकडचे रिसोर्सेस आटत चालले आहेत, असं एक अहवाल सांगतो आहे. आपण 42 स्क्वाड्रंस ची योजना आखली होती, पण सध्या 30 स्क्वाड्रंसच आपल्याकडे आहेत. या सगळ्या लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रंस आहेत. आपल्याकडे रफेल सारखी विमान यायला काही अवधि जाणार आहे. त्याच्यावर राजकारण चालू होत मधल्या काळात. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. सत्ताधार्‍यांकडून राजकारण केला जाणे आणि विरोधी पक्षांनी अत्यंत बेपरवाईने विधाने करणे हे अत्यंत निंदनीय प्रकार आपल्याकडे चालू होता. निदान संरक्षणाच्या बाबतीत तरी असे घोटाळे आणि भ्रष्टाचार हे कुठल्याही देशाला परवडणारे नाहीत. राफेल विमानखरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला की नाही हा पूर्णतः वेगळा विषय आहे.

वायुदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी लागणारा पैसा , राजकीय इछशक्ती इत्यादि गोष्टींची आज आवश्यकता आहे.

शेवटी एकच गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे भारतीय सैन्यदलांचे राजकीयीकरण त्यांच्यावर होणारे राजकारण या बाबी थांबल्या पाहिजेत. राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची आहेच, पण म्हणून त्यावर राजकारण होता कामा नये.


निखिल कासखेडीकर.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...