मुख्य सामग्रीवर वगळा

कतारबद्दल थोडंसं...! भाग 1

 कतार हा पश्चिम आशियामध्ये स्थित असलेला देश... कतारच्या दक्षिणेला आहे सौदी अरेबिया, तर बाकी तीन बाजूनी कतार पर्शियन आखाताने वेढलेला आहे, तसंच बहरिनची सीमासुद्धा कतारला जाऊन मिळते. कतार हा आजच्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबर 1971 ला अधिकृतरित्या ब्रिटनकडून स्वतंत्र झाला. आज आपल्याला गम्मत वाटेल पण कतारच्या अधिकृत नागरिकांपेक्षा कतारमध्ये बाहेरून आलेल्या परकीय नागरिकांची संख्या ज्यास्त आहे, यात मुख्यतः नोकरदार वर्गाचा समावेश होतो. कतारमधल्या नागरिकांची संख्या जवळपास 3,00,000 एवढी आहे, तर बाहेरच्या देशांमधून कतारमध्ये कामासाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांची संख्या आहे 23,00,000...

कतारमध्ये राजेशाही व्यवस्था आहे... साधारणतः 19व्या शतकापासून अल थानी कुटुंबाकडे या देशाची सत्ता आहे. सध्या थानी कुटुंबातले आठवे एमिर सत्तेवर आहेत. 1868 साली मोहम्मद बिन थानी यांनी ब्रिटिश सरकारबरोबर करार केला, त्यानुसार थानी कुटुंबाकडे देशाची सत्ता असेल असं स्पष्ट उल्लेख आहे. सध्याचे थानी कुटुंबातले, तामीम बिन हामाद अल थानी हे कतारचे राजे आहेत, त्यांनी त्यांच्या वडिलांकडून 2013 साली सत्ता हस्तगत केली. मागच्या काही वर्षांपासून कतारमध्ये उदारीकरणाचे वारे वाहत आहेत. कतारचा अधिकृत धर्म आहे इस्लाम तसंच 65 टक्के लोकसंख्या ही मुस्लिम बहुल आहे, तर एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के लोकसंख्या हिंदू आहे... तर 18 टक्के लोक भारतीय आहेत.

कतारमध्ये तेल सापडलं ते 1940 मध्ये, या दुखन भागात तेल सापडलं. याआधी या देशात मासेमारी आणि मोती उद्योग मोठ्या प्रमाणात बहरला होता. या दोन उद्योगांवर कतारची भिस्त होती. जसं जसं तेल आखाती देशांमध्ये सापडत गेलं, तस तसा अमेरिकेला आखाती देशांमध्ये रस वाटू लागला. ब्रिटन तर त्यावेळची महासत्ताच होती. तेल सापडल्यानंतर अचानक अनेक देशांना आखाती देशांमध्ये रस वाटू लागला, याचं कारण या व्यापारातून चांगलं गडगंज उत्पन्न या तेल व्यवसायातून मिळणार होतं. जगातल्या एकूण तेल साठ्यापैकी 13 टक्के तेल कतारमध्ये आहे.
अर्थव्यवस्था जर बघायला गेलं तर कतार मुक्त देश आहे, तो अशासाठी की इथे उत्पन्नावर कर किंवा ज्याला आयकर म्हणता येईल अशी काही गोष्टच नाही. फक्त महागड्या वस्तूंवर तसंच लोकांना अपाय होऊ शकतो अश्याच वस्तूंवर कर लादण्यात येतो. उदाहरणार्थ जंक फूड, शीत पेये इत्यादी. हा देश सगळ्यात श्रीमंत देश म्हणून जगात ओळखला जातो... या देशाचं दर माणशी उत्पन्न पाहायला गेलं तर आपण अवाक होऊ...कतारचं दरडोई उत्पन्न आहे - 1,06,000 डॉलर... आणि सलग 3 वर्ष सगळ्यात श्रीमंत देश म्हणून कतारने यादीत स्थान मिळवलं. कतार ओपेक या तेल उत्पादित करणाऱ्या गटाचा सदस्य होता पण 2019 मध्ये कतार ओपेक मधून बाहेर पडला.
दोन महत्त्वाच्या घटकांसाठी कतारकडे जग बघतं. कारण या गोष्टीच डोळे दिपवून टाकणाऱ्या आहेत. आज कतारला मुख्य आधार आहे तो दोन गोष्टींचा, एक म्हणजे 1996 साली चालू झालेलं अल झजीरा हे चॅनल, तर दुसरं आहे कतार एअरवेज या नागरी उड्डयन क्षेत्रात जगात अग्रेसर असणाऱ्या कंपनीचा. 160 देशांमध्ये कतार एअरवेज सुविधा देते, दोहा या कतारच्या राजधानीतून 160 देशांमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ही विमान कंपनी ऑपरेट करते. या कंपनीचा कर्मचारी वर्ग आहे 46000 च्या आसपास... अल झजीरा हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं न्यूज चॅनेल... याचं कारण म्हणजे आतापर्यंत आखाती देशांमधल्या जनतेचं तसंच या देशांबद्दल बातम्या देणारं आणि आखाती देशांचा जागतिक स्तरावरचा आवाज म्हणून कुठलंही चॅनेल नव्हतं, त्याची कसर या चॅनलने भरून काढली. आजकाल CNN किंवा BBC सारखे चॅनेल जगभरात पाहिले जायचे, पण आखाती मातीतून आणि अस्सल आखाती जगाची व्यथा मांडणार चॅनेल म्हणून अल झजीराकडे लोक पाहायला लागले. या चॅनेल बद्दल सांगायचं म्हणजे, हे चॅनेल भारताबद्दल अनुकूल बातम्या देत नाही, तसंच सौदी अरेबियाने तर या चॅनेलवर काही काळ बंदी आणली होती, आणि सौदी अरेबियाचे कतारबरोबर संबंध केवळ या चॅनेलमुळे बिघडले होते, जगभरात असा समज होता की अल झजीरा हे सौदी चॅनेल आहे, पण ही गोष्ट खरी नाही.
तर कतारबद्दल अश्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया आणि सध्याच्या राजकारणात या देशाला का महत्व आहे हे बघुयात पुढच्या भागात...!
क्रमशः!

- निखिल कासखेडीकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...