मुख्य सामग्रीवर वगळा

अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आणि तालिबान!

 आता कुठे अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था सावरत असताना, चिंता वाटणारी गोष्ट घडली, ती म्हणजे तालिबान परत एकदा सत्तेवर स्वार झाले, आणि आपली कुकर्म चालू ठेवत इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान असा नावाचा बदल करत पुढे काय घडू शकतं याची झलकंच तालिबानने दाखवली. अफगाणिस्तान बद्दल अत्यंत कुचकामी धोरण ठेवलेल्या बायडेंन प्रशासनाला तालिबानने हिसका दाखवला.

सुरवातीला बायडेंन यांनी अफगाणिस्तानातून सैन्य माघारी बोलावताना हा निर्णय त्यांच्या आधीच्या ट्रम्प प्रशासनाने कसा घेतला या बद्दल विधानं केली. या तडकाफडकी सैन्य वापसिने तालिबानला मोकळं रान मिळालं आणि सैन्य संख्येच्या बाबतीत अफगाणिस्तानच सैन्यबळ मोठं असूनसुद्धा काही हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. 29 फेब्रुवारी 2020 ला कतार मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार झाला. पण गोष्टी इतक्या पटकन घडतील आणि अमेरिकेपेक्षा तालिबान वरचढ होईल आणि एकदम काबुल पादाक्रांत करेल हे खुद्द अमेरिका आणि बायडन प्रशासनालासुद्धा वाटलं नाही.
ताज्या बातम्यांनुसार तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर अगदी काही तासांमध्ये त्यांच्या विरुद्ध अफगाणी जनता, खासकरून महिला, तसच नोर्दन अलायांस इत्यादींनी काही ठिकाणी निदर्शनं केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यात मसूर नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या ताब्यात सुत्र हाती घेऊन आपण तालिबानला विरोध करत असल्याचे आणि अफगाणी सैन्यातून पळ काढलेल्या सैनिकांना एकत्र करून तालिबान विरुद्ध आम्ही प्रतिकार करू असेही सांगितले.


ते काहीही असो... एवढं सगळं घडल्यानंतर एक मोठा प्रश्न हा जसा जागतिक समुदायाला पडला तोच प्रश्न तालिबानला सुद्धा पडणार आहे. तो म्हणजे सरकार तर तालिबान स्थापन करेल, पण सत्ता चालवण्यासाठी देश चालवण्यासाठी पैसे हवे... ते कसे आणणार? बरं अर्थव्यवस्था सुद्धा इतकी सक्षम नाही जेणेकरून राष्ट्रीय उत्पन्नाचा काही भाग हा खर्च करण्यासाठी वापरता येईल. हे तालिबानी तर बंदुकीच्या जोरावर खंडणी मागून, लुटालुटी करून करून आणि स्वतःची अफूच्या शेतीतून काही प्रमाणात पैसे जमवू शकतील पण तो पुरेसा नाही.
जसा तालिबानने काबूलवर कब्जा केला, तसं अमेरिकेतल्या 18 सिनेटर्स नि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह च्या अध्यक्ष जेनेट येलेन या अनुभावी बाईंना अफगाणिस्तानला मिळणाऱ्या परकीय मदतीच्या पैशाच्या बाबतीत कठोर पावले उचलून हा पैसा तालिबानला मिळणार नाही याची तजवीज करा असे पत्र लिहून कळवले. यानुसार अमेरिकेने अफगाणिस्तानची खाती गोठवून हा पैसे तालिबानला कसा मिळणार नाही याची चोख व्यवस्था केली. साधारणतः अफगाणिस्तानला 650 बिलियन डॉलरच्या समान असलेले स्पेशल ड्रॉईंग राईट्स हे आय एम एफ ने गोठवले, आणि ते तालिबानच्या हाताला लागणार नाही अशी व्यवस्था केली. पुढच्या काही दिवसांमध्ये हे पैसे अफगाणिस्तानला मिळणार होते, पण सध्याची परिस्थिती बघून तात्काळ पावलं उचलून मदत थांबवली. एस डी आर हे एकप्रकारचं कृत्रिम चलन आहे जे वापरून त्याबदल्यात डॉलर्स ची खरेदी करता येऊ शकते, ती तात्काळ थांबवून अफगाणिस्तानला जरी हि रक्कम वर्ग झाली असली तरी तिचा वापर आणि उपयोग तालिबानच्या सरकारला करता येणार नाही अशी तजवीज केली आहे.
अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था मुळात शेती, आधारित आहे. मोठ्या मोठ्या अफू,हेरॉईन सारख्या अमली पदार्थांची शेती करून अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था चालते. याच्या जोडीला सुका मेवा म्हणजे (ड्राय फ्रुट्स) खजूर, बदाम, काजू, मनुका, अक्रोड इत्यादी आणि काही पदार्थ अस विकून जे काही थोडेफार पैसे येतात, आणि पर्यटन आणि शेतीशी निगडित उद्योगातून उत्पन्न अर्थव्यवस्थेला मिळतं. वल्ड बँकेनुसार एकूण खर्चाच्या 75 टक्के रक्कम हि अफगाणिस्तानला मिळणाऱ्या परदेशी आर्थिक मदतीतून येते. साधारणतः 50 टक्के अफगाणिस्तानची जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. 2020 ला अफगाणिस्तानात 11 टक्के बेरोजगारीचा दर होता, तो आता तालिबान आल्यामुळे खूप वाढू शकतो. अफगाणिस्तानच्या चलनाच नाव आहे 'अफगाणी' , याचा विनिमय दर आहे, 70 अफगाणी- 1 डॉलर... सध्याच्या अनागोंदीमुळे या देशात चलन दर वाढून अन्न धान्याच्या किमतीत वाढ होऊ शकते, असा धोका संभवतो. अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचं नाव आहे- 'द अफगाणीस्थान बँक' .
तालिबानचा विचार करायचा झाल्यास अमेरिका आणि जागतिक समुदायाने तसंच आंतराष्ट्रीय संघटनांनी, अशी काही व्यवस्था केली आहे की तालिबांवर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे फार फार तर एकूण पैश्यापैकी फक्त 0.1 टक्के रक्कमच तालिबान वापरू शकतो, जी आजच्या घडीला अत्यंत नगण्य आहे.
यामुळे अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कोसळू शकते, तालिबानकडे सत्ता आली तरीसुद्धा, निर्बंध लागू केल्यामुळे, त्यांना सहजासहजी काहीही करता येणार नाही. सरकार चालवता आलं म्हणजे अर्थव्यवस्था सुद्धा चालवता आली, असा अर्थ होत नाही. त्यामुळे आर्थिक नाकेबंदीमुळे तालिबान झुकू शकतं, अशी शक्यता नाकारता येणार नाही. आगामी काळात तालिबान कश्या प्रकारे सरकार चालवत यानुसार त्यांचं भवितव्य कळेल, आणि आर्थिक कोंडी समोर तालिबान झुकतं का याचासुद्धा प्रत्यय येईल. तो पर्यंत खूप मोठ्या घडामोडी घडतील अशी शक्यता आहे. अशी एक शक्यता आहे की अफगाणिस्तानच्या माजी सैनिकांना एकत्र करून आणि नोर्दन अलायन्सला मजबूत करून तालिबानला हटवता येतं का किंवा एअर स्ट्राईक करता येतो का हे पहावं लागेल. सध्यातरी वेट अँड वॉच हे धोरण ठेवून आगामी काळात काही सकारात्मक बदल घडतील अशी आशा करूयात...!

-निखिल कासखेडीकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...