मुख्य सामग्रीवर वगळा

अशांत अफगाणिस्तान...!


हा फोटो आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष धाकटे जॉर्ज बुश साहेबांचा...ठिकाण एमा बुकर प्राथमिक शाळा, सारसोटा, फ्लोरिडा. तारीख 11 सप्टेंबर 2001.

जॉर्ज बुश हे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या कामाविषयी त्यांच्या तत्कालीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती देण्यासाठी एमा बुकर या फ्लोरिडा राज्यातल्या सारासोटा इथल्या शाळेत भेट द्यायला गेले होते.
सकाळची वेळ होती, बुश शाळेत दाखल, झाले. सगळे व्यवहार व्यवस्थित चालू होते. क्षणार्धात परिस्थिती इतकी बदलेल आणि काही अघटित घडेल याची सुतराम शक्यता वाटली नाही. यासुमारास बुश याना वल्ड ट्रेड सेंटर च्या पहिल्या विमान हल्ल्याबद्दल ब्रिफ करण्यात आले. सुरवातीला एखादं छोटं विमान धडकलं असेल असं वाटून त्याकडे ज्यास्त लक्ष दिलं गेलं नाही. त्यानंतर, बुश दुसरीतल्या विद्यार्थ्यांना धडा वाचून दाखवत होते. तेवढ्यात अचानक व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ अँड्र्यू कार्ड, बुश यांच्या जवळ आले, आणि कार्ड यांनी बुश यांच्या कानात हळूच सांगितले, ते शब्द होते, " दुसऱ विमान वल्ड ट्रेड सेंटरच्या दुसऱ्या इमारतीवर धडकलं आहे, अमेरिकेवर हल्ला झाला आहे" .
अगदी त्याच क्षणी टिपलेला हा फोटो आहे. बुश यांच्या चेहऱ्यावर ताण आणि चिंता या फोटोत दिसते आहे. बुश यांनी स्वतःला सांभाळत काहीही झालं नसल्याचं दाखवलं, पण त्यांच्या या चिंताक्रांत झालेल्या चेहऱ्याने तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थी, शाळेचा कर्मचारी वर्ग, प्रशासनातले अधिकारी वर्ग या सगळ्यांनाच लक्षात आलं की काहीतरी गंभीर गोष्ट घडली आहे.
या नंतर जे झालं ते सारं जगाला माहिती आहे. ज्या मूलतत्त्ववाद्यानी 9/11 चा हल्ला घडवून आणला, तेच लोक अगदी बरोबर 20 वर्षानंतर परत अफगाणिस्तान मध्ये सत्तेवर आले आहेत. अमेरिकेबद्दल काळजी वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 1996 ते 2001 या काळात तालिबान अफगाणिस्तानात सत्तेवर होती. मग वॉर ऑन टेरर चालू झालं. तालिबान सत्तेवरून पदच्युत झाली. अमेरिकेने 20 वर्ष त्यांच्या पाश्चिमात्य मित्र देशांबरोबर नाटो बरोबर अफगाणिस्तान शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले. पण अमेरिकेने तडकाफडकी अफगाणिस्तानातल्या लष्करी कमांडर्सना न कळवताच काही दिवसांपूर्वीच अचानक आपले ट्रूप्स मायदेशी पाठवले, आणि 20 वर्ष केलेल्या सत्तेवर, शांतता पसरवण्याचा आणि लोकांचं जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरलं.
या सगळ्यात सरशी झाली ती तालिबानची. याच तालिबानशी पूर्वी दोन हात केले आणि आता अमेरिकेवर अशी पाळी आली की त्यांच्याशी चर्चा करण अमेरिकेला बरोबर वाटलं.
येणाऱ्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा कस लागणार आहे, तो पर्यंत सगळी परिस्थिती निवळेल अशी आशा करून काही सकारात्मक घडेल आणि लोकशाही टिकेल, आपण एवढंच सध्यातरी बघुयात.

-निखिल कासखेडीकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...