मुख्य सामग्रीवर वगळा

लिबियातली बंडखोरी आणि कर्नल मुअमर गद्दाफी

 लिबिया मघरेब भागातला एक उत्तर आफ्रिकेतील देश... उत्तरेला भूमध्य समुद्र, पूर्वेला इजिप्त, तर दक्षिणेला चाड, आणि पश्चिमेला अल्जेरिया! ट्रिपोली ही लिबियाची राजधानी. तसं पूर्वी म्हणजे 1947 पर्यंत आधुनिक लिबिया हा देश इटालियन वर्चस्वाखाली होता. 10 फेब्रुवारी 1947 ला लिबिया स्वतंत्र झाला.

1969 ला लिबियाच्या इतिहासात महत्वाची घटना घडली. या घटनेमागे जी व्यक्ती होती ती पुढे जाऊन जागतिक इतिहासात म्हटलं तर विख्यात किंवा कुख्यात म्हणून प्रसिद्ध पावणार होती. इंग्रजी मध्ये त्याला कल्ट पर्सन्यालिटी अस म्हणू शकतो, इतका त्या व्यक्तीचा प्रभाव लिबियाच्या राजकारणावर पडणार होता. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे कर्नल मुअम्मार गद्दाफी... हा गद्दाफी साधासुधा नव्हता... लहानपणापासूनच त्याला राजकारणाची आवड होती. त्याला अरब देश संघटित व्हावे आणि आपली छाप पाडावी असं त्याला वाटत होतं. तरुण असताना त्याने लिबियातल्या राजेशाही विरुद्ध आवाज उठवला. गद्दाफिने सैन्यात भरती होण्याचं ठरवलं. आणि तो सैन्य दलात गेला सुद्धा.

1 सप्टेंबर 1969 ला म्हणजे आजच्या दिवशी, फ्री युनिअनिस्ट ऑफिसर्स मूव्हमेन्ट असं स्वतःला म्हणणाऱ्या सिग्नल कॉर्प्स मधल्या 70 मिलिटरी ऑफिसर्सनी लिबियाच्या राजेशाहीविरुद्ध बंड पुकारलं. हे समजताच लिबियाच्या सैन्यदलानी नवीन नेतृत्वाला पाठिंबा दिला. आणि राजा इद्रीस याना पदच्युत व्हावं लागलं. या सगळ्या घडामोडींचा करता करविता होता कर्नल मुअम्मार गद्दाफी... या उठवादारम्यान गद्दाफिला काहीही एक दोन अपवाद वगळता विरोध झाला नाही, आणि केवळ 2 तासात गद्दाफिने लिबियावर कब्जा मिळवला. मला वाटतं 2 तासात बंडखोरी आणि उठाव करून सैन्यदलाच्या मदतीने राज्य प्रस्थापित करून कुठेही विरोध, धरपकड, रक्तपात, हिंसा न होता अगदी सहजपणे सत्ता स्थापन केली आणि ती सुद्धा इतक्या कमी वेळात असं इतिहासात केवळ गद्दाफीच एकमेव उदाहरण असेल.

1969 ते 2011 पर्यंत कर्नल गद्दाफिने लिबियावर राज्य केलं. तो लिबियाचा अनभिषिक्त सर्वेसर्वा म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. सत्ता स्थापन केल्यानंतर सुरवातीच्या काळात गद्दाफिने मुक्तपणे सरकार चालवलं. पण नंतर एकछत्री अंमल ठेवून सैनिकी पद्धतीने शासन केलं. म्हणूनच जग त्याला लिबियाचा हुकूमशहा म्हणून ओळखायला लागलं. गद्दाफिचं अरब राष्ट्रवाद आणि अरब समाजवाद या दोन मूल्यांवर विशेष प्रेम होतं, पण नंतर ते कमी झालं. त्याला पाश्चिमात्य राष्ट्राबद्दल राग द्वेष होता. त्याला वाटायचं या इटालियन साम्राज्यवाद्यांनी लिबियाच नुकसान केलं, तसंच ते इस्लामविरोधी वागत असल्यामुळे त्याला ते खपायचं नाही, यासाठी त्याने लिबियातून इटालियन लोकांना हाकलून लावलं. त्याला वाटायचं की आफ्रिकन आणि अरब जगताने एकत्र येऊन बरोबर काम करावं. त्याला लिबियाला समाजवादी राष्ट्र बनवायचं होत. इजिप्तचा गमाल अब्दुल नासर हा गद्दाफीचा गुरु... नासरचा गद्दाफिवर खूप प्रभाव होता. अरब समाजवादाबद्दल बांधिलकी वाटत असल्याने लिबियाचं त्याने जमिरीयात असं त्याचं नामकरण केलं.
गद्दाफिवर पाश्चिमात्य जगाचा राग होता. इस्लामीक राज्य स्थापन केल्यामुळे आणि लोकशाहीवादी मूल्यांचा स्वीकार न केल्यामुळे पाश्चिमात्य जगाला तो आवडायचा नाही. दुसरीकडे गद्दाफी अमेरिकेला, ब्रिटनला आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांना शिव्या द्यायचा. त्याला अरबांबद्दल नासरमुळे जवळीक वाटायची. गद्दाफीची कार्यपद्धती म्हणजे त्याला एक आदर्श समाजवाद लिबियात प्रस्थापित करायचा होता, तसंच त्याला अरबी राष्ट्रवादाची जोड द्यायची होती. त्याने लिबियावर राज्य करण्यासाठी स्वतः विकसित केलेली अशी थर्ड इंटरनॅशनल थेअरी मांडली, यात अंतर्भाव होता तो समाजवाद आणि अरब राष्ट्रवाद तसंच शरिया नुसार देश चालवायचा होता. अश्या विरोधाभासी राजकारण करण्यामुळे तो हुकूमशहाच बनला, पण पुढे गद्दाफिने स्वतःच्या धोरणात बदल करून पाश्चिमात्य जगाला जवळ केलं. 2009 ते 2010 असं एक वर्ष गद्दाफी आफ्रिकन युनियनचा अध्यक्ष होता. त्याच्यावर मानवाधिकार उल्लंघन करण्याचा आणि जागतिक दहशतवाद पसरवण्याचा तसंच दहशतवाद्यांना आर्थिक मदत देण्याचा ठपका ठेवण्यात आला. रहायला गद्दाफी हा एक शौकीन माणूस होता, एक तर सैनिकी वेशात तो वावरायचा नाहीतर पारंपरिक लिबियन वेशात असायचा. गद्दाफिने त्याच्या आजूबाजूला महिला सैनिकांची जणू फौजच उभारली होती, तो ठिकठिकाणी त्याच्या महिला बॉडीगार्डस बरोबर फिरायचा आणि या सगळ्याची जगभर चर्चा चालायची.
2011 ला अरब स्प्रिंग म्हणजे अरबी देशांमध्ये यादवी चालू झाली, त्याचा परिणाम म्हणून लिबियामध्ये सुद्धा यादवी उठाव झाला. त्यात वेस्टर्न देशांच्या मदतीने गद्दाफीला विरोध करणाऱ्या गटाने त्याचा बेंगाझी मध्ये खात्मा केला... रक्तरंजित इतिहासातलं एक पर्व संपलं, लिबियात लोकशाही नांदली... पण एक क्रूर हुकूमशहा म्हणूनच गद्दाफी जगाच्या स्मरणात राहील.

- निखिल कासखेडीकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

  युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्ध...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...